श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग १९

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


स्वरुप उभे तुर्येचे मेळे । अर्धपर्नीं अरुप खेळे ।

दसवे द्वारीं ढळढळ उसळे । महातेज ॥१९॥

टीकाः

तुरीयेचिया साधनमेळी । साधन साधोनि उर्ध्व ओळी । गुरुकृपें चालितां चालीं । स्वरुप दिसे ॥१॥

अंगुष्ठ चोखित श्रीहरी । वटपत्रीं क्रीडा करी । सहस्त्रदळाचिया उपारे । नवल जालें ॥२॥

निर्गुणाची नवलपुरी । देखियेली चिन्मयनेत्री । जीवन हें तयामाझारी । मिळोनि गेलें ॥३॥

दसवे द्वारातोनि जातां सहजानुभव देखतां । शुन्य देखणें शुन्या मिळतां । शुन्यचि जालें ॥४॥

तंव ते जीवन ब्रह्मारंघ्रीं । केवळ पहाणिया माझारी । तेथेंचि स्वरुप साक्षात्कारी । सहस्त्रदळीं ॥५॥

पहातां हें दशमद्वार । नवल तेजाचा प्रकार । ढळढळ महातेजसागर उंचबळला ॥६॥

महासागर दाटला । तो नयनपुटां मिळाला । नयनातोनि जीव घाला । निजसुखें ॥७॥

आत्मयाची केवल दृष्टी । त्याचें अग्र शुन्य दिठी । जेथ होय उठाउठी जीवनाची ॥८॥

तेथ आपणपे पहाणें । आपाअपणां भेटणें । अशमद्वारीं ऐक्यपणें । एकात्मते ॥९॥

दृष्टी अग्रशुन्यसार । तेचि सत्य दशमद्वार । जये ठायी मधुकर । खेळतसे ॥१०॥

दशमद्वार अति सान । जेथ रिघालें गगन । जेथ शुन्याहि विलीन । होवोनि ठेलें ॥११॥

बोजामाजीं सकळवृक्ष । तैसेंचि तेथ दृश्यादृश्य । व्यक्तव्यक्त हे लयास । जाईजे पा ॥१२॥

तरंग उदकीं निर्मिला । तो तेथिचि लया गेला । तैसा प्रत्ययो येतुला । दशमद्वरीं ॥१३॥

पिपिलिका मार्ग गहन । तयेपरी होवोनि लीन । ऐल सोडिलें गगनीं गगन । अवघेचि ॥१४॥

ग्रासिली जीताची ओवरी । रामकृष्ण शुन्यामाझारी दोन शुन्यातु साचारी । एकाचि शुन्य ॥१५॥

रामकृष्ण हें जीवन जहालें इये शुन्यातुन । गोगान शद्व वोलीन । इये पाठीं ॥१६॥

ऐसे दशमद्वारीचें छिद्र । यासीच । बोलती ब्रह्मरंघ्र । पैल सहस्त्र दळचक्र । आत्मयाचें ॥१७॥

संतजनी प्रत्यय बोलिला । जो कां सहस्त्रदळीं आला । दशमद्वार शब्द योजिला । ब्रह्मारघ्रा ॥१८॥

ऐसें येथिचें दशमद्वार । जेथ निर्गुण साक्षात्कार । स्वयंब्रह्मा ज्ञानेश्वर होविनि ठेले ॥१९॥

नवल येथिचे निगुण । जेथ निमाले सगुण । अरुप ते अति गहन । क्रीडा करी ॥२०॥

जया विशेषरुप नाहीं । तेचि अरुप बालिलें पाहीं । निगुणाची नवालाई । काय सांगो ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP