श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २०

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग २०

इडापिंगालासुषुम्नामेळीं । खेळी महाचातुयेंचे खेळी ।

मग सहजस्वरुपी लागली टाळी । योगीराजा ॥२०॥

टीकाः

इडापिंगलाचे मेळीं । सुषुम्ना वाहे उर्ध्व गोळी । महातुरीय खेळीखेळी । जीवन हें ॥१॥

इडापिंगली जीवन । परि तयांचे पृथकपण । दोनो माजी समसमान । सकळ पिंडीं ॥२॥

रामकृष्न नामेंकरुन । होतां तयांचे मीलन । सहज होय परिपुर्ण । गिळोनि गगन या देहीं ॥३॥

गगने तयांचे पृथःकरण । चिढांश पहातां अपूर्ण । तयाचियें अधिष्ठान । गतिरुप ॥४॥

पहातां इथे चंचळगती । शद्बगुणांची हे स्थिती । घेतली रोकड प्रचिती । संतजनीं ॥५॥

इडापिंगला एक होवुन । जाले पुर्ण गुणी जीवन । ऊर्ध्वमुख करी गमन । गगनातु ॥६॥

मग स्वरुपीं लागली टाळीं । अद्वय नामचिये मेळी । हरिनामांचें कल्लोंळीं । सहजेचि ॥७॥

सकार हकार जन्मा आले । तेचि सहजरुप आतुडलें । परम योगिया लाधलें । सहजपणें ॥८॥

सहज लाधली चित्काळा । गवसिली योगिया कळा । तेथ जडोनि गेला डोळा । गगनाचा ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:47.2870000