पायातळीं तळपें ब्रह्मामपि । मकारोहो उंच गगनीं ।
आदिमध्य अवसानी । त्याचा मार्ग न सांपडे ॥१६॥
टीका
पायीं तळपे ब्रह्ममणि । अकारपैलाडु गगनी मकाराहोनि । अति उंच ॥१॥
मकारी पहातां उकार । उकारीं पहाता अकार । प्राणपण जे साचार । शद्वपणाचे ॥२॥
अकार स्वर शब्द प्राण । स्वयें बोलिले भगवान । नातरी शब्दा शब्दपण । केविं येई ॥३॥
मकार तो नादस्थिति । उकार ते पाहातां गति । अकार अधिष्ठान प्रचिती । गगनाची ॥४॥
तयापैल ब्रह्मामणी । तळपें कैंचा उन्मन गगनी । चंद्रसुर्य हारपोनि । गेले जेथ ॥५॥
जेथ जाले पा अद्वैत परिपुर्णचि निभ्रांत । वर्तुळातु आदिमध्यांत । दावावें काय ॥६॥
जाले एकादी अवसान । आदिमध्या अंत दावी कोण । निशिदिनीचे पहाणें आटोन । गेलें जेथ ॥७॥
जेथ आदिमध्यांत ऐलीकडे । तेथ मार्ग केंवि सांपडे । ब्रह्मामणीचिया उजेंडे । गगन लोपे ॥८॥