श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २४

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


नवाचे माझारी । औटपीठकळसावरी ।

गजें सोहं नाद मोहरी । स्वरुपधेनु पहावया ॥२४॥

टीकाः

चिणितिपासोनियां भेरी । ऐशा उठती नादलहरी । नवनादाचिया उपरि । औटपीठ ॥१॥

औटपीठकळसावरी । पहातां ते अतिकुसरी । नवल तेजाचिया परी ।वर्णवेना ॥२॥

जीवनरस स्थिरावला । ऐसा कळस पहाला । महाशुन्यातु उजाला । तेजोरुप ॥३॥

म्हणोनि औटपीठकळसावरी । म्हणिजे सहस्त्रदळामाझारी । गंर्ज सोहम; नाद भारी । सोहस्वरुप पहावया ॥४॥

त्रिपदा तेचि गायत्री । सोहं स्वरुपिणी साचारी । देखावयां चिन्मयनेत्री । नेत्र कैचीं उन्मीलत ॥५॥

म्हणोनि ते स्वरुपधेनु । गायनतंत्री करी गानु । सोहंनादगजर घनु । कोंदाटला ॥६॥

सोहंतत्वीम चिदाकाश । तेणोंचि महानादघोष । येथ जें अधिष्ठान अवकाश । चिदमुल ते ॥७॥

सोहतंत्व जें पहाले । गुरुकृपेंचि आकळें । नामीं स्वरुप बिंबलें । प्रत्यक्षचि ॥८॥

नामरुप दोनी एक । प्रत्यय ह येथ चोख । नवलाचे नवल देख । सकळाहोनि ॥९॥

पहातां हें सम्यकुज्ञान जेथ नुरेचि विज्ञान । सगुण निर्गुण आटोन । गेलें जेथ ॥१०॥

ऐसें सोहंतत्वरुप । पुर्ण ब्रह्मा निर्विकल्प । तेचि स्वतंत्रता अपाप सदगुरुराजें दिधलीसे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP