सदगुरुवाणी बैसे गगनगोळी । वस्तु कोठडी नयन खोली ।
आजपजपाचा तागडी तोली । ग्राहीक कोण मिळेना ॥३०॥
टीकाः
पहातां गगनाचे गोळीं । बैसलोसे गुरुमाऊली । सुर्यचंद्र डोळीयां खोली । निजवस्तु ॥१॥
सुर्यचांद्रचिये पोटीं । पहातां गगनाची दिठी । सुर्यचंद्राचे शेवटी । अग्नि आत्मा ॥२॥
सोहं अनुवृत्ति निज । जेथ जालें द्वैतबीज । कोहधारणा सहज । उदया आली ॥३॥
इंद्रिया सवडी जे निज । लपोनि ठेले वस्तुबीज । उघड डोळिया उघड सहज । दावियेले ॥४॥
सकार हकार तागडी तोली । पाहे ग्राहीकाची वाटुली । परि ग्राहक इयेवेळीं । मिळेचिना ॥५॥
वैष्णवावाचोनि आवडी । कोणा नामामृताची गोडी । रामनामाची तागडी कळेल कोणा ॥६॥
जरी उगवेळ प्रारब्ध । तरीच उमजेल हा बोध । जरी आपुला भाव शुद्ध । गुरुकृपा सहजेचि ॥७॥