श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ११

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


चहुं देहाची साक्षिणी । उभी असे गोल्हाटगगनीं ।

अवस्था तें उन्मनी । भोगिती योगी ॥११॥

टिकाः

चहुं देहाची साक्षिणीं । उभी गोल्हाटीचें गगनीं । गोत्‍हाट गगन गेलें भरोनि । सुशुप्तिया ॥१॥

अवकाश अथिष्ठान । तेणेंचि अस्तिभाति गुण । सकळही अवस्था संपन्न । तेणेंचि योगें ॥२॥

तेणेंचि प्रियाप्रिय जालें । तेणेंचि सत्य उदया आलें । नामरुप गुणें केलें । झाकोळलें ॥३॥

तेणेंचि जाले बोलाबोल । निर्मियेंलें दृश्यपडळ । सुषुप्ति व्यापिलें केवळ । गोल्हाटा गगन ॥४॥

तेथ चित्काळ साक्षिनी । चहुं देहांची स्वामिणी । सुखदुःखाची कहाणी । सांगतसे ॥५॥

सुखदुःखाची जाणीव तेथ । तेचि होय परावर्त । तेणेचि सुखदुःख भासत इंद्रियासी ॥६॥

पहातां सुखीदुःखी कोणी । व्हावे कायसे म्हणोनि । भ्रांतियोंगे जाणीवपणी । सुखदुःख ॥७॥

सुखदुःख जाय जेथें । चित्कळेंपाशिया निरुते । साक्षीरुप चित्काळा तें । सवेंद्य कोण ॥८॥

म्हणोनि सुखदुःख पाही । कांही उरलेचि नाहीं । आपाआपण या ठायीं । आपणाचि ॥९॥

म्हणोनि या निशिदिनी । पावली अवस्था उन्मनी । मन घालें रामकृष्नीं । हृदयातु ॥१०॥

मनाचें हरलें मनपण । म्हणोनि अवस्था उन्मन । सकळ इंद्रिये समाधान । हरिनामें ॥११॥

ऐसी उन्मन अवस्था योगी । रामकृष्णनामीं भोगी । सकळ इंद्रिये असंगी । सर्व संगीं ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP