पंचवठीचे शेवठी । उभे तुर्येचे पाठी ।
लखलखीत पाठीपोटी । वस्तु उभी ॥४॥
टीकाः
पंचमातृका ते पंचवठी । तयाचिया जे शेवठी आकाशाचिये दिठी । शुब्दाकाश ॥१॥
पंचमातृके लाभें उन्मनी । तयातु पांडुरंग गगनीं । देखिली संतजनी नयनीं । आदिबीज ॥२॥
आकाशीं सुर्यचंद्र लोपला । तरी तो गगनगाभा राहिला । जरि तो अग्नि निवटला । तरी गगन तैसेचि ॥३॥
उरवडिले स्फुरण कोभा । तरी तो राहिला गगनभागा । अरुप नाम दिव्य शोभा । गगनातु ॥४॥
जेथें दिव्य तेज झळाले । आदिमध्यांत नाडळे । अवकाश स्फुरणासि आले प्रणव बीज ॥५॥
जेथ पंचमातृका निमाली । तेथ नामवस्तुची राहिली । जे कां उन्मनीसी टेकुली । स्मरणरुप ॥६॥
तरी तें स्मरण कैसे । जें वस्तुरुप प्रकाशे । दृश्यपडळ जालेसे । जये ठायी ॥७॥
प्रकृतात्मा जन्मे मरे । भासे विस्मरणाचे वारें । तयासि सारोनि परजे उरे । तेंचि स्मरण ॥८॥
म्हणोनि सांगतो ज्ञानेश्वर समर्थ । तेंचि परात्पर वस्तू । जेथ आपण होये विवांतु । गुरुकृपें ॥९॥
ते तो वस्तू अव्यक्त । जेथ नुरलेंसें द्वैत । कल्पनेचा लवहेत । उळोनि गेला ॥१०॥
जें दृष्टीमाजी कोंदलें । नवजे दोही हातीं लोटलें । अंगसंगे स्वयें खेळं । तेचि वस्तु ॥११॥
भागिलें तरी भागिता नये । पहांता एकीएकचि होये । शद्वरहित शुद्धाचि स्वये । एकमेव ॥१२॥
पाणी दोहातीं लोटलें । तरी पाणी पाणीया मिसळे । तैसे आकाश दुभागिलें । नोहेचि कदा ॥१३॥
शुद्धाकश जें निघोट । स्वयंप्रकाश घनदाट । म्हणोनि त्यांचे पाठपोट । दावावें काय ।\१४॥
म्हणोनियां पाठीपोटी । जाला अवघा जगजेठी । संतजनांचिये गोठी । जाणती संत ॥१५॥