श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ८

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


खोलोनि दसवेद्वारांचे कवाडपाठीं । मन उन्मन परेच्या तठीं ।

अरुप दिसतसे जगजेठी । चहूंकडे ॥८॥

टीका

पडचक्राची जे फिरकी । तेथें खावोनि एक गिरकी । त्रिवेणी या उर्ध्वमुखी । व्हावे कारे ॥१॥

त्रिगुणांचे उल्लंघन । करुनि त्रिकुटीं आरोहरण करितां सदगुरु सुप्रसन्न । कृपा करिती ॥२॥

श्रीहाट गोल्हाट औटपीठ । ओलांडोनियां अवचट । मनाचे करोनि उन्मन निघोट । द्शद्वार दावियलें ।\३॥

नवद्वारांचे निरोधन । करोनि साविलिया आसन । धारणा जलीया धारणा । द्शमद्वार अतुडलें ॥४॥

जेआं पहातं अतिगहन । अणुहोनि तुक्ष्मप्रमाण । जेथ निवटे अहंपण । मुळीचे मूळीं ॥५॥

जेथ दिसे पांडुरंग । दावी अपुलें पांडुरं अंग । श्वेतकळा जे अव्यंग । ग्गन दिठी ॥६॥

दशमद्वारातु हे स्थिती । दशमद्वारी उन्मनवृत्ति । परे पासोनियां चित्तीं । स्मरण चाले ॥७॥

जेथ आकाशचि निमालें । ऐसे दशमद्वार आतळे । चौशून्याचे लया गेले । बीज जेथें ॥८॥

तेथ श्वेत कळेविण । काय द्खवावें आन । अरुप आत्मा जो अगुण । तोचि उरे ॥९॥

विहंगम कपि मीन । मार्ग परतले जेथुन । पिपिलीका मार्ग गहन । तोहि अरुता राहिला ॥१०॥

खत्वार देहाचा निरास । होवोनि सांडितां हें दृश्य । अरुप दशमद्वारीं प्रकाश । कांदलें कळे ॥११॥

मग ते चहुं ठायीं जाले । तयाबिना कांहीं नाडळे । ऐसें सत्य सत्य केलें । सदगुरुनाथे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP