श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २५
"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.
अंगुष्ठप्रमाण रारायंत्र । मसुरप्रमाण शिखा ।
पवित्र सनद दिधली स्वतंत्र । सदगुरुराजें ॥२५॥
टीकाः
स्वयें भगवान शुद्धबुद्ध । ज्ञानेश्वर अवतार पसिद्ध सदगुरुं जयांचें अगाध निवृत्तिनाथ ॥१॥
होतां गुरुकृपाबोध । कां जले स्वयंसिद्ध । दिधली स्वतंत्र सनद । सदगुरुजें ॥२॥
स्वानंद साम्राज्यीं आरुढ केलें । जगदोद्धारा आज्ञापिले । अंगुष्ठा रारायंत्री नेलें । नवल दाविलें स्वरुपाचें ॥३॥
पवित्र ज्वाला मसुरप्रमाण स्वरुप । तेजाळ गहन । गुरुरायें दाविला आपण । तेजोबंबाळ झगटला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 15, 2010

TOP