श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग ५

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग ५

पश्चिमेचि नि पाठे । उन्मनीचेनी प्रेम लोठे ।

खोलोनि ब्रह्मरंध्र कपाटे । समधीसुखा कारणें ॥५॥

टीकाः

अवघड त्रिकुटांचा घांट । चढोनियां नाम चोखट । मनपवन अवचट । ऊर्ध्व जाले ॥१॥

आकाशाचे उपरि मागे । पश्चिमेची रहा चांग । अलटपलट सवेग । होवोनि ठेला ॥२॥

जेथ अमृतजीवनकळा । ऊर्ध्वामुख वाहे डोळा । जेथ जंडानि गेला डोळा । भृकुटीचा ॥३॥

योगिजन जे प्राशति । ते अमृतकळा अमरस्थिती । काळावरी मात करिती । निरोधुनि ॥४॥

यया त्रिकुटांचें उपरि । उन्मनी प्रेमाची वाहे झरी । जे कां पातलों ब्रह्मरंघ्रीं । समाधिसुखा ॥५॥

ब्रह्माकपाट गेली फोडोनी । ऐसी उन्मनीची स्मरणी । मनधाले रामकृष्णी । हृदयातु ॥६॥

चैतन्याची करोनी सूस । आंत ओतिला ब्रह्मारस । भाते लाविले जयास । प्राणापान ॥७॥

तेणें जठरीं पेटल अग्नि । सप्तथातुसी आटवोनी । जीवनकळींचें जीवन गाळोनी । ओसंडिलें हृदयातु ॥८॥

मग होवोनि मनाची शुद्धि । सांधोनि झाडिलो नाडीची सांधी । मनपावनाच अवधी । एक केला ॥९॥

मग जो चाले पवन सुषुम्नोसि रोखुन । सकळ द्वारंचे करोनि रोधन । सुषुम्नाकार जलासे ॥१०॥

तंव ते सुषुम्ना चालली । जेथेनि प्राणकळा धांवली । होवोनि गेली ते तुली । जीवनकळा ।\११॥

तया रामकृष्णकळेमाझारी । मनाची जाली उन्मनपरी । अंकुठगति ते साचारी । जीवनकळा ॥१२॥

ओलांडिलें गगनशुन्य । पुढें लाधलें शुद्धगगन । पुढें सांडिलें अःशुन्य । निरशुन्या ॥१३॥

ब्रह्मकपाट फोडोनि नयनीं । जीवन गेलें महाशुन्यीं । तेंचि ब्रह्मारंध्र खोलोनि । समाधि आले ॥१४॥

ब्रह्मकपाटीं त्रिनेत्र । लावितां खोलिलें ब्रह्मारंघ्र । जें काय ब्रह्माचे द्वार । बिंदुमात्र ॥१५॥

पहाता दिसे अणुप्रमाण । परी सामावलें गगन । तेच पातुलें जीवन । समाधिसुखा ॥१६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:40.8070000