श्रीज्ञानदेवतेहत्तिशी - अभंग २

"श्रीज्ञानदेवतेहत्तिशी" या पुस्तकात श्रीज्ञानेश्वरांनी तेहतीस अभंगांतून जगाला अध्यात्मज्ञान दिले.


अभंग २

पैल तुर्येच माझारी । औटपीठाचें शेजारी ।

अर्ध मात्रेचे महाद्वारी । निजरुप उभे दिसे ॥२॥

टीका

तुर्य्पैल औटपीठ । नाद भरलासे घनदाट । तेचि मुळ मायेचे पीठ । जाणति संत ॥१॥

नाद होताती अचाट । परि जाणावी आडवाट । पाणी शिरलें जें निघोट । दोन नयनीं ॥२॥

नयनातु कळिया सांठ । पाणी वाहे अवचट । कानीची मुझोनि वाट । वाट काय सांगो ॥३॥

जीवन झालें श्रवणरुप । जीवन काळिया तद्रुप । सकळ संसार संकल्प । हारपले ॥४॥

लटिका होय जो व्यवाहार । जो कां त्रिपुटीचा व्यापार । हरिविण येरझार । जे का जाय ॥५॥

ऐशा संसार संकल्पलहरी । हारपल्या औटपीठामाझारी । अनुहताचेनी गजरी । मनाचि धाले ॥६॥

अर्धमात्ना शक्तिरुपिणी । जेथें उदेली प्रणवखाणी । गगणासहीं जेथुनी । जन्म झाला ॥७॥

उष्ण शीत आभा । अरुप आकारिला नभा । शब्द स्वरुप आरंभा । जेथें जाले ॥८॥

आधीं पाहातं स्वयंप्रकाश । जेथ जन्म शीतोष्ण कळेस । प्रकाश लहरी डोळियास । दाविता न ये ॥९॥

यालाच बोलती पहाणें । जें कां आकाशाचें देखणें । ज्या चे नि परानर्तगुणें ।दर्शनवस्तु ॥१०॥

स्वप्रकाशी शीतोष्ण कळा । तेथेंचि जाला गगनडोळा । प्रकाश फुटोनि आकारिला । पोकळ भाग ॥११॥

आकाशी सांचली हवा । जीवनकळीं वायु बरवा । वायु तो नटका आधवा । नानागुणी ॥१२॥

वायु तेज आणि आप । रुपें नटलें प्रणवरुप । बारियानें हें अपाप । दृश्य जालें ॥१३॥

पृथ्वी धारणा आपें केली । आपापासोनि पृथ्वी जाली । अणुरेणुही पोकळी । व्याप्त व्याप्त झाली ॥१४॥

अर्धमात्रा तें गहन । सकळ दृश्यांचे कारण । ईकार एंकार मातृका दोन । जयलागी ॥१५॥

याचि अर्धमात्नेचें द्वार । महाशुन्याचा विस्तार । जेथ जाली प्रकाश लहर । अशब्दरुप ॥१६॥

तेथ पहातां निजरुप । जें सगुणां आले अपाप । नानागुणें दृश्यरुप । धारण केलें ॥१७॥

जेथ एकत्वाचि सहज । तेथ काय म्हणोनि निज । शुब्द संकल्प स्वरुप ओज । आपण वस्तु ॥१८॥

जेथ आपणी आपण । सर्वत्र राहिला भरोन । जेथ बुडालें चिदघन । निजत्व काय दावावे ॥१९॥

जेथ दृश्य, द्रष्टा आणि दर्शन । पहाणें लागे आपणां आपण । तेथिचि निःशब्द समाधान । निशब्द ते ॥२०॥

निःशब्द कैसे आले शब्दि । अस्ति भाति प्रियोपाधी । जोडिली कैसी संधी । दर्शनाची ॥२१॥

आकाश वायुचीया गाठी । आत्मा सामावला हृदयपुटी । वायुप्रकाश आकाश दिठी । अरुप आत्मा ॥२२॥

निजांचें तेज कीं तेजांचे निज । ऐसे आहे येथिचे गुज । आप आपणा सहज । पहाणें जेथें ॥२३॥

निजापासोनि तेज जालें । तेजीं निज सामावलें । रविशशी उजाळले । भार्ग ज्यांचे ॥२४॥

श्रवणां तोनि नयनी आला । नयनीं निजाते मिळाला । पहातां पहाणेपणा गेला । दृश्य भागु ॥२५॥

पाहातां पहाणे सरता साक्षी । निजीं निजस्वयें लक्षी । लक्ष्य जहाले अलक्ष्मी । स्थिर कैसे ॥२६॥

नयनासी मिळता नयन । तेथ पाही कवणा कोण । दोही डोळीया आपण साक्षीरुप ॥२७॥

पहाण्यापासोनी जाला डोळा । जो कां पहाणेपणा आला । आतु महाशुन्य गोळा । काय सांगू ॥२८॥

नीलबिंदुचे आवरण । महाशुन्य तें गहन । जेथ भरला साक्षी आपण । निजरुप ॥२९॥

चिग्दुण वैभवांचे तेज । तेचि आपुलें स्वरुप निज । जेथ दिननिशी सहज । प्रगट झाली ॥३०॥

नयनीं चिन्मयाचा मार्ग । पाहतां कैचा निजयोग । पहाणे प्रकृती सवेग । निज आत्मा ॥३१॥

साक्षी पासोनि पहाणें । जें कां नटलें पहाणे पणे । पहाणेपणाचे देखणे निजरुप ॥३२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:02:39.7430000