Dictionaries | References

म्हैस

   
Script: Devanagari

म्हैस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   buying a pig in a poke. मेल्या म्हशीस दाहा शेर दूध or दूध बहु praise is lavished upon the dead. म्हशीवर पाऊस पडणें applied to unproductive efforts or unavailing advantages.

म्हैस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  she-buffalo.
पाण्यात म्हैस न् बाहेर मोल   buying a pig in a poke.
मेल्या म्हशीस दहा शेर दूध   praise is lavished upon the dead.
म्हशीवर पाऊस पडणें   applied to unavailing efforts.

म्हैस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  रेड्याची मादी   Ex. गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध पचण्यास जड असते
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  म्हशीचे मांस जे खाल्ले जाते   Ex. काही लोक म्हैसदेखील खातात.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasمٲش , مٲشہِ ماز
kokम्हशीचें मास
urdبھینس , بھینس کاگوشت , بڑاگوشت

म्हैस

  स्त्री. 
  1. महिषी ; रेड्याची मादी ; म्हसरु ; म्हस .
  2. एक प्रकारचा सहा पायांचा माशीपेक्षां मोठ्या आकाराचा व वरचा पृष्ठभाग कठीण असलेला किडा .
  3. केळफुलावरील निबर , काळसर रंगाची पारी . पांढर्‍या रंगाच्या पारीस गाय म्हणतात .
म्ह०
  1. मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध . [ सं . महिष प्रा . महिस ]
  2. पाण्यांत म्हैस बाहेर मोल - म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें .

म्हशीचा प्राणनाथ वि. पु. 
  1. रेडा .
  2. ( ल . ) सुस्त ; मस्त . तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे .

म्हैस पावल्या वि.   ( व . ) म्हशीसारखा जड प्रकृतीचा .
म्हैस आटणें    दूध द्यावयाचें बंद होणें ; दूधनिघणें . गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे
म्हशीनें पाय दिलेलें नाक  न. नकटें किंवा बसकें नाक .
म्हशीवर पाऊस पडणें    बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द
म्हैस पाहणें    ( व . ) म्हशीचें दूध काढणें
   केळफुलावरील निबर , काळसर रंगाची पारी . पांढर्‍या रंगाच्या पारीस गाय म्हणतात . म्ह० मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध . [ सं . महिष प्रा . महिस ] पाण्यांत म्हैस बाहेर मोल - म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें . म्हशीवर पाऊस पडणें - बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द . म्हशीचा प्राणनाथ - पु . रेडा . - वि . ( ल . ) सुस्त ; मस्त . तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे . म्हशीनें पाय दिलेलें नाक - न . नकटें किंवा बसकें नाक . म्हैस आटणें - दूध द्यावयाचें बंद होणें ; दूधनिघणें . गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे . म्हैस पावल्या - वि . ( व . ) म्हशीसारखा जड प्रकृतीचा . म्हैस पाहणें - ( व . ) म्हशीचें दूध काढणें . म्हैस पिळणें - धार काढणें . मी म्हैस पिळून येतों . म्हैस हात पारखते - ( व . ) म्हैस धार काढणार्‍याचा हात ओळखते . म्हशीची शिंगें म्हशीला जड होत नाहींत - मुलें अधिक असली तरी तीं आईबापाला जड नसतात . म्हशा - पु .
   ( व . ) रेडा ; हल्या ; जड , दांडग्या व कुरुप रेड्याबद्दल किंवा इतर पशूबद्दल तुच्छतेनें योजावयाचा शब्द .
 वि.  ( ल . ) रेड्यासारखा धष्ट पुष्ट मतिमंद ; म्हशीसारखा जड प्रकृतीचा .
   सुस्त ; दांडगा आणि घाणेरडा अशा इसमाबद्दल योजावयाचा तुच्छतादर्शक शब्द ; मूर्ख अचरट मनुष्य . कीं म्हशाचें गण्या नाम । - नव १८ . १७२ . [ म्हैस ] म्हशागुग्गुळ , गुगुळ - पु .
   एक प्रकारचा गुग्गुल .
   ( म्हशा किंवा म्हैस ) धिप्पाड गलेलठ्ठठोंब्या इसमाबद्दल निर्भत्सनापूर्वक योजावयाचा शब्द . [ म्हशा , म्हैस ; मशी आणि गुग्गुल ] म्हशाबोळ - पु . एक प्रकारचा बोळ ; एक औषधी वनस्पती ; एका झाडाच्या चिकापासून हा होतो . याचा रंग काळा असतो . हें औषध गुरांचे पोटदुखीवर चालतें . म्हशासुर - पु . देवीनें मारलेला एक दैत्य ; म्हसोबा . [ सं . महिषासुर ] म्हशी केळें , म्हशेळी , म्हशळें , म्हसकेळें - न . एक जातीचीं मोठीं व जाड केळीं . म्हशीचा खटारा म्हशीचें खोड , म्हशीचें डोबड - पुन . म्हशीबद्दल उपहासानें म्हणतात . म्हशीचें मेळवण - न . ( विनोदानें ) अव्यवस्थित जेवण ; पात्रावर खाद्यपदार्थांची अव्यस्थित रेलचेल . म्हस - स्त्री . ( व . ) म्हैस ; महिषी ; म्हसरु ; म्हसरुड ; म्हसर ह्या शब्दाकरितां म्हैसरुं इ० शब्द पहा . [ म्हैस ] म्हसकी , म्हसक्या - वि . म्हैस राखणारा , चारणारा . म्हसडी , म्हसडें - वि . म्हशीचें कातडें ; महिषचर्म . [ म्हैस - म्हस - म्हसडी ] म्हसर - ढोर ; लांबसापट ( म्हशीच्या पाठी प्रमाणें ) ह्या अर्थीं नामाशीं सामासिक शब्दांत म्हैस किंवा म्हस शब्दाचें तुच्छतादर्शक रुप ; कंटाळवाणें व न संपणारें लांबलचक . जसे - म्हसरमाळ , म्हसर मैदान , म्हसररान . कधीं कधीं म्हसरभुई व म्हसरजमीन , म्हसरशेत , म्हसरवाट , म्हसररस्ता , म्हसर मजल , म्हसरकोस , म्हसरपल्ला इ . [ एकवचन म्हसरु ] म्हसरे - म्हैस , टोणगे . म्हसड्या - वि . ( व . ) म्हशीसारखा जड प्रकृतीचा . म्हसासूर , म्हसोबा - पु . एका असुराचें किंवा दैत्याचें नांव , यास देवीनें मारलें . कांहीं हलक्या जातीचे लोक ह्याची पूजा करितात ; एक पिशाच्च . [ महिष ] म्हसोबाला नाहीं बायको व सटवाईला नाहीं दादला . म्हसोबा कोपविणें , पेचविणें - कृष्णानदी तटाकास अक्कलखोप गांवीं म्हसोबा आहे त्याला आपल्या शत्रूचा सूड घेण्याकरितां नारळ फोडणें ; देव घालणें म्हैशा - पु . अंगानें मोठाकुरुप अशा रेड्याबद्दल किंवा इतर नर जातीच्या पशूबद्दल रागानें किंवा उपहासपूर्वक योजावयाचा शब्द . - वि . ज्याचें शरीर पुष्ट असून जो आळशी आहे त्यास निंदेनें म्हणावयाचा शब्द . [ म्हैस ] म्हैसभादर्‍या - वि . आपल्या कामांत निपुण नसलेल्या न्हाव्याबद्दल उपहासानें योजावयाचा शब्द ; वाईटपणें खाडाखोड करुन लिहिणार्‍या लेखकाबद्दल योजतात . म्हैसमंगळ - वि . मठ्ठ . म्हैसमाळ - पु प्रवासामघ्यें लवकरसंपणारा मोठा माळ किंवा ओसाडनापीक जमीन . म्हसर पहा . म्हैसरट , म्हैसरुड , म्हैसर - न . म्हैस शब्दाचे नर किंवा मादी वगैरे भेद लक्षात न घेतां लाडिकपणानें योजावयाचा शब्द . म्हैसवा - पु . ( महानु . ) एक प्रकारचा पाषाण . कीं आव्हाटी म्हैसवा थर । नव्हतां दृष्टी गोचरु । - ऋ ४८ . म्हैसवल - स्त्री . एक झुडूप . म्हैसा - पु . टोणगा ; रेडा ( हा शब्द मराठींत विशेष रुळलेला नाहीं . ) रांड - भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा ? ( हिंदी म्हण ) नको देऊं म्हैसा । - प्रला . म्हैसासुर - पु . एक पिशाच्च ; क्षुद्रदेवता . म्हैसासुर मलिकार्जुन । - दावि ६३ . [ महिषासुर ] म्हैसिक - वि . म्हशीचा . म्हैसोबा - म्हसोबा . मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP