|
पु. १ मनुष्य . २ ( माणूस , जनावर , पक्षी इ० तील ) पुरुष ; पुरुषजात ; सर्वजातीय पुरुष व्यक्तिमात्र . ३ ( तुंबजोड इ० ) जोडीच्या पदार्थातील मोठा पदार्थ . ४ अर्जुन . वत्सांच्या बहुशोकी कृष्णा बुडतां तिला म्हणे नर तो । - मोसंभा १ . १६ . ५ पुराणपुरुष ; आदिपुरुष ; परमपुरुष . ६ घोडा . कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित । - ऐपो २०० . ७ ( ल . ) मळसूत्री खिळा ; दाराच्या झडपांना असलेल्या लोखंडी पट्टीत - मादीत बसणारा चवकटीचा खिळा . ८ ( ल . ) उंसाच्या चरकांतील तीन लांटांपैकी मधली किंवा दोन लाटांतील उजवी लाट ; नवरा . ९ बुद्धिबळातील सोंगटी . १० ( मुद्रण ) ( ल . ) टंककृतीत पोलादी खिळ्यावर घासून तयार केलेला ठसा ; इं . पंच ; याच्या उलट मादी = मेट्रिस . ११ मोती डोळ्यासमोर धरल्यास आंतील बाजूस चिरल्यासारखी दिसणारी रेघ ; करवा पहा . १२ अंकुर ; कोंब . - शे ३ . ६ . १३ ( कु . ) वाशांतील , वाळलेल्या कळकांतील उभा घट्ट तंतु . १४ नखाच्या मुळावरचे उचकटलेले कातडे . १५ ( ज्यो . ) उन्नतांश ज्या . [ सं . नर = पुरुष , मनुष्य ; फा . नर ] ( वाप्र . ) ०मोडून घडणे - ( एखादी वस्तु इ० ) घडणे व मोडणे व पुन्हां घडणे ; त्याच त्याच गोष्टीची घडामोड करणे . नराचा आंख - पु . ( बिडाचा कारखाना ) उंसाच्या चरकाच्या मधली वृत्तचिती किंवा नर बसविण्यासाठी त्याच्या मधोमध असलेल्या भोंकात बसविण्याचा आंख . नराचे चाक - न . ( बिडाचा कारखाना ) चरकांतील वरची पाटली आणि मधली वृत्तचिती यांच्या दरम्यान बसविण्याचे दंतुर चाक . नरो वा कुंजरो वा - ( अश्वत्थामा या नावाचा मनुष्य की हत्ती युद्धांत मारला गेला हे मला माहित नाही अशा प्रकारचे गुळमुळीत उत्तर धर्मराजाने द्रोणाचार्यास देऊन त्यांना चकविले त्यावरुन ) एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण अज्ञान , औदासिन्य इ० दर्शविण्याकरितां दिलेले संदिग्ध उत्तर ; कानावर हात ठेवणे ; माहीत नाही असे दाखविणे . म्ह ० १ नरा हराहुन्नरा = मनुष्याला हजारो धंदे व क्लृप्त्या करतां येण्यासारख्या आहेत . २ ( हिंदी ) नर करे तो नरका नारायण होजाय = मनुष्याने मनावर घेतले तर तो वाटेल ते कार्य करुं शकेल , किंबहुना तो ईश्वरहि बनूं शकेल . सामाशब्द - नारायण घडणे - ( एखादी वस्तु इ० ) घडणे व मोडणे व पुन्हां घडणे ; त्याच त्याच गोष्टीची घडामोड करणे . नराचा आंख - पु . ( बिडाचा कारखाना ) उंसाच्या चरकाच्या मधली वृत्तचिती किंवा नर बसविण्यासाठी त्याच्या मधोमध असलेल्या भोंकात बसविण्याचा आंख . नराचे चाक - न . ( बिडाचा कारखाना ) चरकांतील वरची पाटली आणि मधली वृत्तचिती यांच्या दरम्यान बसविण्याचे दंतुर चाक . नरो वा कुंजरो वा - ( अश्वत्थामा या नावाचा मनुष्य की हत्ती युद्धांत मारला गेला हे मला माहित नाही अशा प्रकारचे गुळमुळीत उत्तर धर्मराजाने द्रोणाचार्यास देऊन त्यांना चकविले त्यावरुन ) एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण अज्ञान , औदासिन्य इ० दर्शविण्याकरितां दिलेले संदिग्ध उत्तर ; कानावर हात ठेवणे ; माहीत नाही असे दाखविणे . म्ह ० १ नरा हराहुन्नरा = मनुष्याला हजारो धंदे व क्लृप्त्या करतां येण्यासारख्या आहेत . २ ( हिंदी ) नर करे तो नरका नारायण होजाय = मनुष्याने मनावर घेतले तर तो वाटेल ते कार्य करुं शकेल , किंबहुना तो ईश्वरहि बनूं शकेल . सामाशब्द - ०कपाल न. ( मृत ) माणसाच्या डोक्याची अस्थिमात्रावशिष्ट कवटी . [ सं . नर + सं . कपाल = कवटी ] ०कुंजर पु. १ गणपति ; गजानन ; गजवदन . ते कंबल आणि अश्वतर । त्याही हृदयी चिंतिला नरकुंजर । - कथा ५ ६ . १२४ . २ नरश्रेष्ठ ; मनुष्यांत श्रेष्ठ ; नरवर . [ सं . नर + कुंजर = हत्ती ] ०केसरी पु. १ नरसिंह . २ सिंहाप्रमाणे शूर मनुष्य ; नरश्रेष्ठ . [ सं . नर + केसरिन = सिंह ] ०जन्म पु. मनुष्ययोनि ; मनुष्याचा जन्म . नरजन्मामधि नरा करुनि घे नरनारायण गडी । - राला ८७ . [ नर + जन्म ] ०तनु स्त्री. मनुष्यदेह . दैवे नरतनु सांपडली मूढा कशि तुज भूल पडली . - शिवदिन केसरी ( नवनीत पृ . ४४६ ) [ नर + सं . तनु = देह ] ०तबेला पु. ( व . ) फक्त , पुष्कळ पुरुषच राहतात अशी जागा ; पुरुषांचे वठार . [ नर + फा . हिं . तबेला ] ०तुरंगम पु. ( ज्यो . ) एक नक्षत्रपुंज . सप्तर्षि , ध्रुवमस्य , ययाति , नरतुंगम वगैरे राशींची ओळख मुलांना करुन देतां येईल . - अध्यापन २०० . [ नर + सं . तुरंगम = घोडा ] ०त्व न. पौरुषत्व . नराच्या ठायी नरत्व । अहंभाविये सत्व । - ज्ञा ७ . ३५ . ०देव पति पु . मनुष्यरुपांतील देव ; राजा ; नृपति . कां तया नरदेव म्हणो नये । - दावि ३०५ . [ नर + सं . देव , पति ] ०देह पु. नरजन्म ; मनुष्याचे रुप . नरतनु पहा . नरदेह वायां जाय । सेवी सद्गुरुचे पाय । - तुगा ४४९७ . [ नर + देह ] ०नारायण पुअव . विष्णूच्या अंशापासुन उत्पन्न झालेले दोन प्राचीन ऋषी . यांचेच अवतार पुढे अर्जुन व श्रीकृष्ण हे झाले अशी पुराणांतरी कथा आहे . - शर . अर्जुन व श्रीकृष्ण . नरनारायण सेनानी , ज्या जगती जोड दिसेना । - विक ७४ . [ नर = अर्जुन + नारायण = श्रीकृष्ण ] ०पट्टी पाटी - स्त्री . आटे पाडावयाची वस्तु घट्ट धरणारे यंत्र . यांत दोन बाजूस हात व मध्ये चपटा भाग असतो . चपट्या भागांत निरनिराळ्या आकारमानांची भोके असतात . [ नर (= नर अर्थ ७ पहा . )+ पट्टी , पाटी ] ०पति पु. १ राजा . २ पायदळांतील सैनिकांचा मुख्य . - हंको . [ नर + पति ] ०पशु पु. ( निंदार्थी ) पशुप्रमाणे वर्तन करणारा ; मूर्ख व अधर्मी मनुष्य ; दांडगा व निर्दय मनुष्य ; नराधम . [ नर + पशु ] ०पाते न. न . नखे काढण्याचे यंत्र ; नराणी . ०बलि पु. १ यज्ञांत बलि द्यावयाचा मनुष्य . २ ज्यांत मनुष्यास बळि देतात तो यज्ञ . नरमेध . [ नर + सं . बलि = आहुति ] ०भू स्त्री. प्राचीन काळी हिंदूंना माहित असलेल्या जगाचा मध्यभाग ; मध्यवर्ती देश ; भरतखंड . [ नर + सं . भू = जमिन , पृथ्वी ] ०मादी स्त्री. १ जोडीच्या दोन पदार्थांतील ( युग्मांमधील ) पुरुष व स्त्री . उदा० पायांत घालावयाचे जोडे , बूट , अंगरख्याच्या बाह्या , उंसाच्या चरकांतील लाटा इ० . यांपैकी नर मोठा असतो व मादी नरापेक्षा किंचित लहान असते ; दोन वस्तू मिळून होणार्या पदार्थापैकी नर हा भारी असून मादीत शिरणारा असतो . उदा० बिजागरीचा खिळा , कुरडईच्या सोर्यांतील दट्ट्या इ० . २ जोडीच्या दोन पदार्थांतील स्त्रीपुरुषसंबंध ; लहानमोठेपणा . ३ ( व्यापक ) ( दोन पदार्थ , व्यक्ति इ० कांतील ) श्रेष्ठकनिष्ठभाव ; तरतमभाव ; बरेवाईटपणा ; उजवा - डावा प्रकार . मोत्यांत नरमादी असतच आहे . ४ उंसाच्या चरकांतील लाटा . ५ बिजागरी . ६ एक प्रकारचे कुलूप . [ नर + मादी ; फा . नर्मादा ] ०मेध पु. मनुष्ययज्ञ ; ज्यांत नरबली देतात तो यज्ञ . युद्धांत पराभव होऊं नये म्हणून प्राचीन ग्रीक , सेमाईट व हिंदु लोक नरमेध करीत असत . - ज्ञाको न २६ . [ नर + सं . मेध = यज्ञ ] ०यान न. मनुष्यांनी वाहून नेण्याचे वाहन , बसून जाण्याचे साधन . उदा० पालखी , मेणा , डोली , रिक्षा इ० . अश्वगजादि आरोहण । शेषशयन गरुडासन । महामहोत्सव नरयान । रथोत्सव जाण करावा । - एभा २९ . २६० . [ नर + सं . यान = वहन , वाहन ] ०योनि स्त्री. नरजन्म ; मनुष्ययोनि . [ नर + सं . योनि = जन्म ] ०लवंग स्त्री. लवंगाची जात . - मुंव्या १५० . ०वर वि. नरश्रेष्ठ ; थोर उदार ( मनुष्य ). नरवर कृष्णासमान । स्वयंवर नाटक . [ नर + सं . वर = श्रेष्ठ ] ०वाहन नरयान पहा . [ नर + सं . वाहन ] ०सिंह नरशा नरशिंय नरसिंय - पु . विष्णूचा चवथा अवतार . भाऊनि नरसिंया केला नवस । तो प्रगटोनि स्वप्नी वदे मातेस । - दावि १९ . २ ( ल . ) सिंहासारखा उग्र व पराक्रमी पुरुष ; पुरुष श्रेष्ठ . [ नर + सं . सिंह ] ०सिंहजयंती पु. नृसिंहावताराचा दिवस ; वैशाख शुद्ध चतुर्दशी . [ नरसिंह + जयंती = जन्मदिवस ] ०सिंहावतार पु. दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपु याचा वध करण्यासाठी श्रीविष्णूने धारण केलेले सिंहाकृती मनुष्याचे रुप , अवतार . [ नरसिंह + अवतार = प्रकट होणे , रुप घेणे ] ०सिंहावतार - ( ल . ) अतिशय रागावणे ; कोपाविष्ट होऊन उग्र स्वरुप धारण करणे . घेणे - ( ल . ) अतिशय रागावणे ; कोपाविष्ट होऊन उग्र स्वरुप धारण करणे . ०हर हरदेव पु . नरसिंह अर्थ १ पहा . [ नर + हरि , हर , हरदेव ] ०हरदेवाची - स्त्री . नरसिंहाची पालखी . हिला उचलण्याचे पुण्य स्वतःला लाभावे म्हणून हिच्या दांड्यास खांदा लावण्यास भक्तमंडळी फार उत्सुक असते . तेव्हा साहजिक गोंधळ , अव्यवस्था होते . २ ( त्यावरुन ल . ) जे काम करावयाला बर्याच लोकांची मदत अवश्य आहे व ज्याची जबाबदारी कोणा एका विशिष्ट व्यक्तिवर नसते व जे काम चांगल्या रीतीने झाल्याची किंवा न झाल्याची कोणी पर्वा करीत नाही असे - अर्थात वेळी , अवेळी , केंव्हा तरी कसे तरी व्हावयाचे - काम ; अव्यवस्थित रीतीने केवळ लोकांच्या मर्जीनुरुप घडून येणारे काम , गोष्ट ; बारभाई कारभार . पालखी - स्त्री . नरसिंहाची पालखी . हिला उचलण्याचे पुण्य स्वतःला लाभावे म्हणून हिच्या दांड्यास खांदा लावण्यास भक्तमंडळी फार उत्सुक असते . तेव्हा साहजिक गोंधळ , अव्यवस्था होते . २ ( त्यावरुन ल . ) जे काम करावयाला बर्याच लोकांची मदत अवश्य आहे व ज्याची जबाबदारी कोणा एका विशिष्ट व्यक्तिवर नसते व जे काम चांगल्या रीतीने झाल्याची किंवा न झाल्याची कोणी पर्वा करीत नाही असे - अर्थात वेळी , अवेळी , केंव्हा तरी कसे तरी व्हावयाचे - काम ; अव्यवस्थित रीतीने केवळ लोकांच्या मर्जीनुरुप घडून येणारे काम , गोष्ट ; बारभाई कारभार . ०हरी पु. नरसिंह . [ नर + सं . हरि = सिंह ] नराधिप , नरेंद्र , नरेश , नरेश्वर पु . राजा ; नृपति . - १५ . ४५ . तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती । - एभा १ . १८३ . [ नर + सं . अधिप , इंद्र , ईश , ईश्वर = श्रेष्ठ , पालनकर्ता , रक्षणकर्ता ] नरेंद्रमंडळ न . माँटफर्ड सुधाराणान्वये दिल्लीस स्थापन केलेले हिंदी संस्थानिकांचे मंडळ ; राजांची सभा . ( इं . ) चेंबर ऑफ प्रिन्सेस . [ नरेंद्र + मंडळ = सभा , समिती ] नरोत्तम पु . १ नारायण ; पुरुषोत्तम . २ - वि . नरश्रेष्ठ ; मनुष्यांत उत्तम असलेला . [ नर + उत्तम ] नरोबा पु . नरसिंह ; नरहरि . नरोबाची कृपादृष्टी । जाल्या कोण्ही नाही कष्टी । - मध्व ३०६ .
|