मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
अंबाजोगाई योगेश्वरी देवीची आरती

अंबाजोगाई योगेश्वरी देवीची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.

आरती धन्य अंबापूर महिमा विचित्र । पार्वती अवतार योगिनी क्षेत्र
दंतासुरमर्दोनी केले चरित्र । सिध्दांचे स्थळ ते महापवित्र
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी । महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी
 
पतित पावन सर्व तीर्थ महाद्वारी । माया मोचन सकळ माया निवारी
साधका सिद्धीवाणेच्या तिरी । तेथील महिमा वर्णू न शके वैखरी
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी। महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी
 
सिद्ध लिंग स्थळ परम पावन । नृसिंह तीर्थ तेथे नृसिंह वंदन
मूळ पीठ रेणागिरी नांदे आपण । संताचे माहेर गोदेवी स्थान ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी । महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी
 
महारुद्र जेथे भैरव अवतार । कोळ भैरव त्याचा महिमा अपार
नागझरी तीर्थ तीर्थाचे सार । मार्जन करिता दोष होती संहार
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी । महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी
 
अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते । योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते
व्यापक सकळा देही अनंत गुण वर्णिते । निळकंठ ओवाळू कैवल्य माते ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी ।
महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी ।
जयदेवीजयदेवीजय योगेश्वरी

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP