मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
ऋषी पंचमी आरती मराठी

ऋषी पंचमी आरती मराठी

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जय जय ऋषि राजा, प्रभु जय जय ऋषि राजा ।
देव समाजे आदरिले मुनि, केले देवांचे कार्य राजा ॥
 
जय दध्यंच, वर्णी भारद्वाज, गौतम ।
जय शृंगी, पराशर, अगस्ती मुनि सत्तम ॥
 
वसिष्ठ, विश्वामित्र, अंगिरा, अत्री जय जय ।
कश्यप, भृगु अन् कृपाचार्य, तपसंचय ॥
 
वेद मंत्र द्रष्टे तुम्ही, सर्वांचे भले केले ।
सर्व जनतेला तुम्ही, वैदिक ज्ञान दिले ॥
 
सर्व ब्राह्मण जनतेचे, मूळ पुरुष स्वामी ।
ऋषि संतती आम्ही, व्हावे ज्ञानी सत्पथगामी ॥
 
आमच्यात प्रभु आस्तिकता, लवकर तुम्ही भरा ।
शिक्षित व्हावे सर्व नर, हा वर आम्हा द्या ॥
 
धरणीधर कृत ऋषि जनांची, आरती जो गाईल।
त्या नरावर मुनि कृपेने, सुख संपत्ती येईल॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP