गणपती निरोप आरती
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो ।
देवा तुजलाची ध्यातो ।
प्रेमें करुनियां देवा,
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ॥१॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
तरी न्यावी सिद्धी देवा हेचि वासना ।
देवा हेचि वासना ।
रक्षूनियां सकळा,
रक्षूनियां सकळा द्यावी आम्हांसी आज्ञा ॥२॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
मागणें ते देवा आता एकची आहे ।
आता एकची आहे ।
तारुनिया सकळां,
तारुनिया सकळां आम्हा कृपादृष्टी पाहें ॥३॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया ।
देवा ऐशा या ठाया ।
प्रेमानंदें लागू ,
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती वर्णाया ॥४॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
सदां ऐसी भक्ती राहों आमुच्या मनी ।
देवा आमुच्या मनी ।
हेचि देवा तुम्हां,
हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी ॥५॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
वारुनियां संकटें आतां आमुची सारी ।
आता आमुची सारी ।
कृपेची सावली,
कृपेची सावली देवा दीनावरी करीं ॥६॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी ।
चिंता तुम्हां असावी ।
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥७॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी ।
आम्हा आज्ञा असावी ।
चुकले आमुचे काहीं,
चुकले आमुचे काहीं त्याची क्षमा असावी ॥८॥
जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां ।
आम्ही नमितो तव चरणां ।
वारुनिया विघ्ने,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दिना ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 12, 2026

TOP