मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
नागद्वारची आरती

नागद्वारची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा,
सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा ।
आरती नागद्वारा ॥धृ ॥

मेरुच्या शिखरी जडले, सिंहासन भारी ।
त्यावर बैसुनिया, सृष्टी रचली या सारी ॥१॥
आरती नागद्वारा……

श्रीराम अवतारी, बंधू लक्ष्मण होशी ।
पाळली राम आज्ञा, पुर्ण कार्य तू करशी ॥२॥
आरती नागद्वारा……

श्रीकृष्ण अवतारी, ज्येष्ठ बंधू बळीराम ।
प्रताप थोर होतो, जगी मिळविले नाव ॥३॥
आरती नागद्वारा……

श्रावण महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र ।
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ॥४॥
आरती नागद्वारा……

शेष सिंधु सागरात, शेषसाई अनंत ।
तेथे तुम्ही नांदता हो, ज्याला म्हणतात लक्ष्मीकांत ॥५॥
आरती नागद्वारा……

कालीया नांव तुझे, घेता उतरले ओझे ।
स्मरण केली या हो, देवा सार्थक होई माझे ॥६॥
आरती नागद्वारा……

देवा मी ज्ञान धरीले, दुःख माझे हरीले ।
हरीला सेवा केली, शंकर मजला पावले ॥७॥
आरती नागद्वारा……

वैशाख महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र ।
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ॥८॥
आरती नागद्वारा……

आज देव शेषराये, भक्ती तुझी पुर्ण होय ।
नवखंड पृथ्वीशी, देवा भरुनी आला आहे ॥९॥
आरती नागद्वारा……

पाचतत्व पंच ज्योती, ओवळीले नागनाथा ।
भक्तजन आरत्या गावी, जागा चारणापाशी द्यावी ॥१०॥
आरती नागद्वारा……

आरती नागद्वारा, गणेश गायन करी ।
नित्य नेम महाभारी, सर्वदिन सेवा करी ॥११॥
आरती नागद्वारा……

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP