मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
श्री म्हाळसा देवीची आरती

श्री म्हाळसा देवीची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


म्हाळसा आणि बाणाई

ओम जय माता म्हाळसाई, जय माता म्हाळसाई,
पिंपरखेड वासिनी, उंबरखेड वासिनी । गिरणा तीरी राही ॥
ओम जय माता म्हाळसाई ॥१॥ [धृ.]
प्रथम चरित्री कालिका झाली, ओम कालिका झाली,
कलकत्ता वासिनी, देवावरदायिनी । गंगा तीरी राही ॥
ओम जय माता म्हाळसाई ॥२॥
द्वितिय चरित्री रेणुका झाली, ओम रेणुका झाली,
जमदग्नीच्या लागी चरणी, परशुरामाची झाली जननी । माहूर गडी राही ॥
ओम जय माता म्हाळसाई ॥३॥
तृतीय चरित्री भवानी झाली, ओम भवानी झाली,
श्रीरामा वरदायिनी, शिवराया वरदायिनी । तुळजापुरी राही ॥
ओम जय माता म्हाळसाई ॥४॥
चतुर्थ चरित्री म्हाळसाई झाली, ओम म्हाळसाई झाली,
मणिमल्ल दैत्य वधुनी, भक्ता सुख दायिनी । जेजुरी गडी राही ॥
ओम जय माता म्हाळसाई ॥५॥
पंचमस्थानी दास गोरक्षवरदायी, ओम गोरक्षवरदायी
मम कुल वरदायिनी, सेवका वरदायिनी । भक्ता सदनी राही ॥
ओम जय माता म्हाळसाई ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP