मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| श्री महालक्ष्मीची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती श्री महालक्ष्मीची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartimahalakshmiआरतीमहालक्ष्मी श्री महालक्ष्मीची आरती Translation - भाषांतर जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी ॥करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता ।कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां ॥ जय देवी जय देवी... ॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी ।माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ जय देवी जय देवी... ॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी ।गायत्री निजबीजा निगमागम सारी ।प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ जय देवी जय देवी... ॥ अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं ।मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ।वारी मायापटल प्रणमत परिवारी ।हें रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥ जय देवी जय देवी... ॥ चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी ।लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ।पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ।मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ जय देवी जय देवी... ॥ N/A References : N/A Last Updated : November 16, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP