मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| गणपतीपुळेची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती गणपतीपुळेची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartiganapatiradhaआरतीगणपतीराधा गणपतीपुळेची आरती Translation - भाषांतर आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।स्वयंभू पश्चिम दिग्विसी । प्रकटला भक्त रक्षणासी ।सन्मुख सागर समदृष्टी । शोभतो हरित गिरिपृष्टी ।विराजे सिंदुर सर्वांगा । वाहते सव्य नाभीगंगा ।वर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ ।स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले ।त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले । देखता मूर्ती गणेशाची । होईना तृप्ती नयनांची ।आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।जय जय सुमुख एकदंता । वरदा ऋद्धिसिद्धीकांता ।जपता द्वादश नामांसी । कामना सिद्धी पदा नेसी ।शोभवी प्रणव रुप वदना । क्षाळितो तीर्थराज चरणां ।अहा ती अस्तसमय शोभाऽऽऽ ।पूजितो तरणी। स्वर्णमय किरणी । निनदे गगनी । गर्जना मंद अंबुधीची । चालते दिव्य दुंदुभीची ।आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।भाद्रपद शुद्ध चतुर्थीला । भक्तगण येत दर्शनाला ।उगवता धन्य माघमास । लागते रीघ यात्रिकांस ।सकलजन नारी-नर येती । दर्शने पाप मुक्त होती ।काय तो यात्रेचा दिवस ऽऽऽ ।मिळेना वाट, उसळली लाट, स्वारीचा थाट, दाटते गर्दी भाविकांची । पालखी निघे मोरयाची ।आरती गाऊनी सदभावे । त्रिविक्रम शांतिसुखा पावे ।आस ही पुरवी दासाची । भक्ती दे अखंड चरणाची ।आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।रचना- त्रिविक्रम परशराम केळकर, गणपतीपुळे N/A References : N/A Last Updated : November 12, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP