मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
श्री जोगेश्वरीची आरती

श्री जोगेश्वरीची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी ।
आरती ओवाळितो तुझीया पावन चरणी ॥धृ॥
 
तूच निर्मिलेस विश्व सारे ।
आकाश, प्रकाश, कोटी कोटी तारे ।
तुझ्या हाती जन्म मरणाचे फेरे ।
रंग रसानी नटविलीस सारी ही अवनी ॥१॥
 
शिवशक्ति आई, तू योगिनी ।
मुक्त केलीस सारी धरणी ।
आदि जननी तूच, जीवन संजीवनी ।
करुणा कर, शरण शरण तव चरणी ॥२॥
 
सहस्त्र सूर्यांचे तेज तव शरीरात ।
शीतलता शत चंद्रांची नयनात ।
ग्रह नक्षत्रांच्या माळा तव कंठात ।
सर्व तीर्थांचे मांगल्य तुझीया चरणी ॥३॥
 
कर आई विघ्नांचे निरसन ।
दूर्धर रोगांचे निर्मूलन ।
दुःख दारिद्रयाचे दहन ।
फळा फुलांनी, धन धान्यांनी बहरु दे धरणी ॥ ४ ॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP