मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| श्रीराम आरत्या मराठीत विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती श्री एकनाथ महाराज आरती एकवीरा देवीची आरती गजानन महाराज काकड आरती श्री गजानन महाराज आरती गणपती निरोप आरती गणपतीपुळेची आरती गंगा आरती गीतेची आरती श्री गोपालकृष्ण आरती संत गोरा कुंभार आरती गुढीपाडवा आरती हरतालिका आरती संत संताजी जगनाडे महाराज आरती जितिया व्रत आरती जिवतीची आरती श्री जोगेश्वरीची आरती ज्येष्ठा गौरी आरती आरती काळभैरवाची काली माता आरती आरती श्रीकालिकाम्बेची कालरात्री देवी आरती काळूबाईची आरती कामधेनुची आरती कार्तिकेय आरती ( मराठी ) श्री खंडेरायाची आरती श्री खंडोबा महाराज तळी आरती मां कूष्मांडा आरती ललिता देवीची आरती महालक्ष्मी आरती मराठी श्री महालक्ष्मीची आरती मकर संक्रांत आरती मंगळागौरी आरती मंगळागौरीची आरती मनोबोधाची आरती मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची श्री म्हाळसा देवीची आरती नागपंचमी आरती नागद्वारची आरती नागनाथ आरती यम देव की आरती भगवान नृसिंह आरती नवरात्री देवीची आरती नवनाथांची आरती निरांजन आरती श्री नित्यानंद राया आरती भगवान नृसिंह आरती श्री परशुरामाची आरती पार्वती देवी आरती पिठोरी अमावस्या आरती श्री पितर आरती श्री प्रेतराज सरकार की आरती रामचंद्राचीं आरती राधाजी की आरती प्रभू श्री रामाच्या आरत्या श्रीराम आरत्या मराठीत श्री रामाची आरती श्री रेणुका देवी आरती ऋषी पंचमी आरती मराठी साईबाबाची आरती आरती संतांची सप्तश्रृंगी देवी आरती सरस्वतीची संगीत आरती सत्यनारायणाची आरती संत सावता माळी महाराजांची आरती श्रीराम आरत्या मराठीत देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartiramआरतीराम श्रीराम आरत्या मराठीत Translation - भाषांतर दशरथे रामचंद्रा कौसल्या प्रियसुता ।ओंवाळूं प्रेमभावें जगताचा तूं पिता ॥ धृ. ॥भक्तांतें तोषवाया अवतरसी रघुवरा ।प्रेमानें पूजिती जे वर देसी त्यां नरां ॥घेतांची नाम तुझें सुख झाले शंकरा ।संकटि तू धांव घेई विनवितो अच्युता ॥१॥दशवदना मर्दुनिया सोडविले सुरवरा ।घेउनिया जानकिला आलासी निजपुरा ॥तोषवुनी सर्व लोका बोळविले वानरां ।प्रार्थितसे दत्तदास लावी या सत्पंथा ॥२॥ ****************************श्रीमद्रामचंद्रा अयोध्यापुरवासी ।जन्म दशरथकूळी चैत्र नवमीसी ॥उत्साह सुखकर झाला मनासी ।थोर आनंद सकळा जनांसी ॥१॥जय देव जय देव रामचंद्रा, श्रीरामचंद्रा ।कृपानिधान विभो करुणासमुद्रा ॥ धृ. ॥रामलक्ष्मण असतां वनवासी ।रावण भिक्षे आला होउनि संन्यासी ।राम मृगा वधूं गेला वनवासी ॥मागें हरिलीं सीता दुष्टें त्वरेसी ॥ जय. ॥रामें त्वरित मिळवुनि वानरसेनेसी ।सागरिं सेतू रचविंला आपुल्या नामेसी ॥तयांवरुनि सत्वर गेलां लंकेसी ।राक्षससैन्य वधोनी आणिलि सीतेसी ॥ जय. ॥३॥अधिकारी केला बिभिषण लंकेसी ।सीता घेउनि आला आयोध्यापूरासी ।थोर आनंद सकळा जनासि ।कृष्ण गोपाळ लागे चरणांसी ॥ जय. ॥४॥ ****************************स्वात्मसुखामृत सागर जय सदगुरुराया ।वेदांतार्णव मथितां तिलगुह्यापरमा ॥निज निंर्गुण जगलीला जगदाकृति हेमा ।जगदिश्वर तद्रूपा वरमंगल धामा ॥१॥जय देव जय देव जय सद्गुरुराया ।ब्रह्म सुधाऽमर चिद्घन जय सार्वभौमा ॥ धृ. ॥चिन्मय वस्तु तुं अगुणी सगुणाकृति धरिसी अगणित गुणगंभीर गुरु ईश्वरही होसी ।अज्ञानांध सुशिष्या स्वप्रकाश करिसी ॥शरणागत भवपाशापासुनि सोडविसी ॥ जय. ॥२॥स्वस्वरु पोन्मुखबुद्धी वैदेहि नेली ।देहात्मका भिमाने दशग्रीवें हरिली ॥सद्विवेक मारुतिनें सत्शुद्धी आणिली ।तव चरणांबुजि येउनि वार्ता श्रुत केली ॥ जय. ॥३॥देहादिक अहंकार रावणवध करिसी ।केवल स्वमुखानंदी वससी अयोध्येसी ॥सर्वांतरि व्यापुनियां सबाह्य तूं अससी ।गुरुभक्तीहिन पुरुषा कोठे आढळसी ॥ जय. ॥४॥देहत्रय व्यतिरिक्ता साक्षी समसंता ।परमा नंदाऽनंता अद्वयरस भरिता ॥करुणाऽगर भयनाशन श्रीदैशिक नाथा ।स्वानंद्रे पद मौनी वंदित रघुनाथा ॥ जय. ॥५॥ ****************************आजि रघुपति तव चरणीं करितों ही आरती ।ओंवाळिसें प्रेमभरें प्रभु तुज लागो रति ॥ धृ. ॥तव नामामृत पानें करूनी जड मुड उद्धरले ।दुष्ट निशाचर वधुनि सुरांचे रक्षण त्वां केलें ॥'बलवंत गाई प्रीती ॥आजि. ॥१॥ ****************************बंबाळ कर्पुराचे । दीप रत्नकीळांचे ॥उजळले दिग्मंडळ । मेघ विद्यूल्लतांचे ॥भासती तयांपरि । भालचंद्रज्योतीचे ॥अवचिते झळकताती ।घोंस मुक्ताफळाचे ॥१॥जय देवा दीनबंधू । राम कारुण्यसिंधू ॥आरति ओवाळीन । शिव मानसी वेधु ॥ धृ. ॥त्राहाटिली दिव्य छत्रें । लागल्या शंखभेरी ॥तळपताती निशाणें । तडक होतसे भारी ॥तळपती मयूरपिच्छें । तेणें राम थरारी ॥ जय. ॥२॥मृदंगटाळघोळ । उभे हरिदासमेळ ॥वाजती ब्रह्मवीणे । उठे नादकल्होळ ॥साहित्य नटनाट्य । भव्यरंगरसाळ ॥गर्जती नामघोष लहानथोर सकळ ॥ जय. ॥३॥चंपकपुष्पजाती ॥ मेळविले असंख्यांत ॥दुस्तर परिमळाचे ॥ तेणें लोपली दीप्ती ॥चमकती ब्रह्मवृंदे ॥ पाउलें उमटती ॥आनंद सर्वकाळ ॥ धन्य जन पाहाती ॥ जय. ॥४॥ऋषिकुळी वेष्टित हो ॥ राम सूर्यवंशीचा ॥जाहलीं अतिदाटी ॥ पुढे पवाड कैसा ॥सर्वही एकवेळ ॥ गजर होतो वाद्यांचा ॥शोभती सिंहासनीं ॥ स्वामीं रामदासाचा ॥ जय. ॥५॥ ****************************रत्नांची कुंडलें माला सुविराजे ॥झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ॥घंटा किंकणी अंबर अभिनव गति साजे ।अंदु वांकी तोडर नुपुर ब्रिद गाजे ॥१॥जय देव जय देव जय रघुवर ईशा ।आरती निर्जरवर ईशा जगदीशा ॥ धृ. ॥राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी ।परातपर अभयंकर शंकर वरधारी ।भूषणमंडित उभा त्रीदशकैवारी ।दासा मंडण खंडन भवभय अपहारी ॥ जय देव. ॥२॥ ****************************आरती करितों राघवचरणीं ।राहुनि अनिदित नामस्मरणीं ॥ धृ. ॥ब्रह्मादिक मुनि सुर गाती ज्यातें ।कैलासाधिप करिं ध्यानांते ॥ आरती. ॥१॥रावण मारुनि सुरां सुखी केलें ।बिभीषणासी राज्यिं स्थापिलें ॥ आरती ॥२॥शरणागत मीं तुज बलवंता ।पाहिं कृपेने या बलवंता ॥ आरती करितो. ॥३॥ ****************************काय करुं माय आतां कवणा ओवाळूं ।जिकडे पाहे तिकडें राजाराम कृपाळू ॥ धृ. ॥ओवाळूं गेलिया सद्गुरुरामा ।क्षमा रूप निजपण न दिसे आम्हां ॥ काय. ॥१॥सुर नर वान्नर राम केवळ ।खेचर निशाचर तेही राम केवळ ॥ काय. ॥२॥त्रैलोकी रामरुप साचार एक ।सद्गुरुकृपें केशव राज आनंददीप ॥ काय करू माय. ॥३॥ **************************** दशरथराजकुमारा धृतमुक्ताहारा । शरयूतेरविहारा शमितक्षितिभारा । करुणापारावारा कपिगणपरिवारा । निर्गतनिखिलविकारा निगमागमसारा ॥१॥जय देव जय देव जय सीतारामा ॥ सजलबलाहकश्यामा सच्चित्सुखधामा० ॥ध्रु०॥रविकुलराजललामा रम्यगुणग्रामा । रूपविनिर्जितकामा रुद्रस्तुतनामा । परिपालितसूत्रामा पूर्णसकलकामा । विश्वविलासविरामा विठ्ठलविश्रामा ॥जय देव जय देव० ॥२॥A N/A References : N/A Last Updated : November 18, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP