मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
काळूबाईची आरती

काळूबाईची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


वरदहस्त देउनी छाया धरी पामराशी ।
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती ॥१॥
 
गोजिर मांगीर बुवा आहे गड राक्षनासी ।
लाखो भक्त येती आई तुझ्या दर्शनासी ।
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती ॥२॥
 
मांढर देवी गाव पवित्र तुझ्या पायथ्याशी ।
करवंदीची जाळी भोवती डोंगर माथ्याशी ।
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती ॥३॥
 
लिंब नारळ चोळी पातळ मान तू घेसी ।
पौषी पौर्णिमेला भक्ता दर्शन तू देसी ।
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती ॥४॥
 
चाफ्यावरती नाग डुलतो पोर्णिमेदिवशी ।
मांढरदेवी माता आई स्वरूप दावीशी ।
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती ॥५॥
 
करता भक्ती तुझ्या द्वारी प्रसन्न तू होशी ।
विघ्न टाळून आई इडा पीडा नेशी ।
जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP