मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
एकवीरा देवीची आरती

एकवीरा देवीची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


आरती एकवीरा । देवी देई मज वरा । शरण मी तूजलागी ।
देई दर्शन पामरा । आरती एकवीरा ॥ धृ.॥
कार्ला गडी वास तुझा । भक्त सह्याद्रीच्या पायीं॥
कृपा दृष्टीने पाहोनी। सांभाळिसी लवलाही ॥१॥
चैत्राच्या शुद्ध पक्षी । जेव्हा उत्सव तव होई ॥
भक्तगण मिळताती । पालखीतें मिरवती ॥२॥
दर्यावरचे शूरवीर । तुझ्या पायीचे चाकर ॥
तव कृपा तारी त्यासीं । त्याना तुझाची आधार ॥३॥
हस्तनक्षत्राचा वारा । ऊठे जिवा नाही थारा ॥
क्षण एक आठवितां । त्यासी तारिसी तूं माता ॥४॥
तव पुजनीं जे रमती । मनोभावें स्मरोनी चित्तीं ॥
जड संकटाचे वेळी । कडाडोनी प्रकट होसी ॥५॥
शांत होई तृप्त होई । सेवा मान्य करी आई ॥
अभयाचा देई वर । ठेवी तव चरणी मी शीर ॥६॥
 
************************
 
एकवीरा देवीची आरती
येई हो एकवीरा देवी माझे माऊली ये ।
माझे माऊली ये ॥
दोन्ही कर जोडुनि तुमची वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलीया गेलीया अंबे धाडी निरोप ।
कारल्यामध्ये आहे माझी एकवीरा माय ॥ १ ॥
पिवळी साडी ही अंबे कैसी गगनी झळकली ॥
व्याघ्रावरी बैसोनी माझी एकवीरा देवी आली ॥ २ ॥
एकवीरेचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥
एकवीरा देवी नाम तुमचे भावे ओवाळी ।
येई हो एकवीरा देवी. ॥ ३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 12, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP