दिव्याची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


पंचप्राणांचे नीरांजन करुनी ।
पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ॥
मोहममतेचें समूळ भिजवोनि ।
अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥१॥
 
जय देव जय देव जय नीरांजना ।
नीरांजन ओंवाळूं तुझिया समचरणां ॥ध्रु०॥
 
ज्वाला ना काजळी दिवस ना राती ।
सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ॥
पूर्णानंदें धालों बोलों मी किती ।
उजळों हे शिवराम भावें ओंवाळिती ॥ जय देव जय देव० ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP