मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
तुळशीची आरती

तुळशीची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जय देवी जय देवी जय माय तुळशी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ॥धृ॥
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी ।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी ॥
सेवा करिती भावे सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी ॥१॥

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी ।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ॥
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥२॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी ॥३॥    

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP