मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
आरती श्रीकालिकाम्बेची

आरती श्रीकालिकाम्बेची

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


ओंवाळूं ओंवाळूं आरती कालिका अंबा । कालिका अंबा ।
मागें पुढे पाहूं जातां अवघी जगदंबा ॥धृ.॥
 
आदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी ।
अणु रेणु जीव तुझा तया न त्यागिसी । ओवाळूं ॥१॥
 
भास हो आभास जीचा सौरस सारा । अंबे सौरस सारा ॥
सारसार निवडूं जातां न दिसें थारा । ओंवाळू ॥२॥
 
कळातीत कळानिधींपर्वती ठाण । अंबे पर्वतीं ठाण ॥
भक्त शिवाजीसी दिधलें पूर्ण वरदान ॥ ओंवाळूं ॥३॥
 
चिच्छक्ते चिन्मात्रे चित्तचैतन्य बाळे ।अंबा चैतन्य बाळे ॥
विठ्ठलसुतात्मजासी दावीं पूर्ण सोहाळे ॥ ओंवाळूं ॥४॥
जगदंब ! जगदंब ! उदयोऽस्तु !

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP