मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥
उजळल्या पंचप्राण ज्योती । सहजचि ओवाळू आरती ।
मिटवूनी क्षणिक नेत्र पाती । हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती ।
श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी । जणू का भाविकास जननी ॥
संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास ।
करी कामधेनु आमुची । करू या ज्ञानसागराची ॥१॥
 
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥
ध्यान हे रम्य मनोहर से । ध्यान धृड जडले नयनिसे ।
भक्त हृदयाकाशी विलसे । तेज ब्रम्हांडी फाकतसे ।
पितांबर शोभवित कटीला । भक्त मालिका हृद पटला ॥
भक्त जन तारी, नेई भवतीरी, पतित उद्धरी ।
करू नित्य सेवा चरणांची । करू या ज्ञानसागराची ॥२॥
 
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥
लक्षी जग प्रचंड नीज नयनी । लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी ॥
हरिहर विधी, दत्त त्रिगुणी । आठवी नित्यभूवन सुमनी ॥
दत्तमय असे योगिराणा । ओम कारीचे तत्व जाणा ॥
धारा दृढचरण, दास उद्धरण, जनार्दन शरण ।
आस पुरवावी दासांची । करू या ज्ञानसागराची ॥३॥  
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ॥
 
॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP