गुरूचरित्र - श्रीटेंभेस्वामीमहाराजांचे मत
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
महाराजांचे शिष्य वैद्यभूषण ग. व्यं. सातवळेकर यांचे पुत्र रा. नरहरपंत यांजकडून आलेल्या पत्रावरून)
श्रीमत् परमहंस प० वासुदेवानंद-सरस्वती महाराजांनी 'स्त्रीशिक्षा' म्हणून पुस्तक लिहिलें आहे त्यांत खालील स्पष्ट आशा लिहिलेली आहे---‘‘पतिव्रताधर्म काशीखंडी व गुरुचरित्रांत सांगितला आहे, तो ब्राह्मणद्वारा ऐकावा. वाचतां आले तरी स्वतः स्त्रियांनी गुरुचरित्र वाचूं नये. विवाहानंतर मर्त्याबरोबर वेदमंत्राने वैदिक कर्म करण्यास व यज्ञांग स्वकीय मंत्र म्हणण्यास स्त्रियांना अधिकार येतो. त्याशिवाय वेदमंत्र ऐकण्याचासुद्धा अविकार नाहीं. वेदमंत्र पुरुषाचे ऐकून म्हटले तर आर्षद्रव्य चोरीचा दोष येतो."
आमच्या संग्रहीं स्वामीमहाराजांचे हातचीं चारएकशें पत्रें उतरून ठेवलेलीं आहेत. त्यावरून गुरुचरित्र वाचण्यासंबंधी खालील उल्लेख निरनिराळ्या इसमांना केलेला आढळतो:---“कशेपशमनार्थ यथाशक्ति गुरुचरित्र पठण करणे."…अप्रसिद्धपणें गुरुचरित्र वाचण्यास सात ब्राह्मण नेमावे.’’............"चित्ताला समाधान वाटत नसेल तर गुरुचरित्राची एक आवृत्ति करावी."…‘‘गुरुचरित्राच्या पांच ओंव्या नित्य चुकवूं नयेत"……"रुद्राभिषेक व गुरुचरित्रपाठ सुरू ठेवावे.’’ इत्यादि.
महाराजांविषयींची एक गोष्ट---शके १८१३ मध्यें महाराज जालवण मुक्कामीं आल्यावर लोकांचे अत्याग्रहास्तव त्या ठिकाणीं कांही दिवस राहिले व रामदास-नवमीचे दिवशी रात्री दासबोध सांगूं लागले. त्या ठिकाणी असलेल्या एका शास्त्री इसमाला ही गोष्ट आवडली नाही. त्यांचें म्हणणें प्राकृत ग्रंथ वाचूं नये. परंतु महाराजांस हें इतर लोकांकडून समजतांच महाराजांनी दासबोध वाचीत असतांना श्रुति म्हणून तिचें भाष्य सांगितलें आणि त्याच अर्थाची ओंवी वाचून दाखविली. पुराण समाप्त झाल्यावर महाराज शास्त्रीबुवांस म्हणाले, "दासबोध ग्रंथ प्राकृत आहे की संस्कृत आहे ?" तें ऐकून शास्त्रीबुवा खजील झाले. ‘‘ग्रंथाच्या भाषेकडे लक्ष द्यावयाचें नसून अर्थाकडे लक्ष द्यावयाचें. दासबोध ग्रंथास प्रभु रामचंद्रांचा आशीर्वाद आहे." वगैरे बर्याच गोष्टी सांगून त्यांचें समाधान केलें. (शास्त्रीबुवांच्या घरीं समंधबाधा होती ती कशी जाईल याविषयी म्हणाले)---
‘‘या कलियुगांत वर्णाश्रमधर्मानें वागल्याशिवाय वेद म्हटले तरी ते उपयोगी पडत नाहींत. ('आचारहीनं न पुनन्ति वेदा:’) तसें साधुपुरुषांनी केलेल्या प्राकृत ग्रंथांचें नाहीं. तुम्ही वेदपारायणें करतां व इतरही प्रयत्न करतां, पण तुमच्या घरांतील ब्रह्मसमंध को जात नाहीं ? तरी आत आपण सांगतों त्याप्रमाणें करून अनुभव पाहा. प्राकृत गुरुचरित्राचा सप्ताह करा म्हणजे त्यास गति मिळून तो निघून जाईल.” नंतर शास्त्रीबुवांनी प्राकृत गुरुचरित्राचा सप्ताह केला. त्यामुळें ब्रह्मसमंध निघून गेला. त्यापुढें शास्त्रीबुवा गुरुचरित्र नियमाने वाचूं लागले व प्राकृत ग्रंथाबद्दल निंदा करण्याचे त्यांनी सोडून दिले. असो.
सात किंवा तीन दिवसांत वाचण्याचा अध्यायानुक्रम स्वामीमहाराजांचे घराकडील पोथीशिवाय इतर ठिकाणच्या पोथींत मिळत नाहीं. मात्र स्वामीमहाराजांनी गुरुचरित्र अध्याय २०|२१ तसेच ३०|३१।३२ आणि ३५ हे अध्याय म्हणजे ज्यांमध्ये मृतसंजीवन झालेलें आहे, ते कधीही अर्धे ठेवू नयेत, असे सांगितलेलें स्मरतें. यावरून ७ किंवा ३ दिवसांच्या पारायणाचा अध्यायानुक्रम सोईवार पडेल असा मागाहून आखलेला दिसतो. सबंध गुरुचरित्रांत ७ दिवसांत ग्रंथ पूर्ण करण्याबद्दल दोनच ठिकाणी उल्लेख सांपडतो. अ. १, ओं. ५९ व अ. ३, ओं. ११. स्वामीमहाराजांच्या पोथींत ७ व ३ दिवसांत वाचण्याचा क्रम पुढें लिहिल्याप्रमाणें सांपडतो---७+११+१०+६+३+६+८=५१:२२+१४+१५=५१. इत्यादि.
(पत्र-दिनांक २७-१२-३९).
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2023
TOP