साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटाणे, इ. धान्यें; पांढरा मुळा, सुरण, इ. कंद, सैंधव व समुद्रोत्पन्न नहीं लवने गायींची अशीं दहीं, दूध आणि तूप; फणस, आंबा, नारळ, हरीतकी, पिंपळी, जिरें, सुंठ, चिंच, केळें, रायआंवळे हीं फळें व साखर हीं सर्व अतैलपक्व हविष्यें जाणावी (गायीचें ताक व म्हशीचें तूप हीं हविष्यें होत असेंही कोणी म्हणतात.)---ध. सिं. प्रथम परिच्छेद, व्रतपरिभाषा.