मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती| छत्तिसाव्या अध्यायांतील गायत्रीच्या चोवीस मुद्रांची माहिती विशेष माहिती समवृत्त भाषांतर अष्टकाचें समवृत्त भाषांतर चतुर्थावृत्तीची प्रस्तावना पुष्पांजलि (पुरस्कार) अपूर्व वैशिष्ट्य श्रीगुरुचरित्र ग्रंथप्रवेश सामग्री व इतिहास गुरूचरित्राचा महिमा व कारण सिद्धमंत्र संशोधन म्हणजे काय? नजरचुका व जावईशोध भयंकर चूक 'बहुमत' म्हणून प्रमाण धरतां येत नाही जांवईशोधाचा दाखला कोणाच्या घरचें अन्न घ्यावें ! एक मोठाच गमतीचा प्रसंग छत्तिसाव्या अध्यायांतील एक मोठें न्यून अध्याय ३७ मधील एक अत्यंत महत्त्वाचे गूढ तत्त्व अडतिसाव्या अध्यायांतील एक शंका संस्कृत श्लोकाष्टकें श्रीसरस्वती-गंगाधराच्या भाषेचे नमुने जुन्या लेखकांच्या हस्तप्रमादांचे चमत्कार सहाव्या अध्यायातील रावणाचे गायन कानडी पदांचे शुद्धीकरण व भाषांतर हस्तलिखितांची यादी सप्ताहाचा अध्यायानुक्रम शास्त्रोक्त 'संकल्प' नियम धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे जिन्नस छत्तिसाव्या अध्यायांतील गायत्रीच्या चोवीस मुद्रांची माहिती सप्ताह कसा करावा ? सरस्वती-गंगाधरकृत दोन पदें सभाग्य रसिक दत्तभक्तांसाठीं प्रेमाच्या दोन सूचना श्रीगुरुचरित्र-वाचकांना प्रेमाच्या विशिष्ट सूचना श्रीगुरुचरित्र ग्रंथांतील कांहीं अध्यायांचें विशेष माहात्म्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीकृत तीन संस्कृत श्लोकात्मक मंत्र सोवळ्या-ओवळ्याचे निर्बंध कुठल्या देवाला लागतात ? श्रीटेंभेस्वामीमहाराजांचे मत श्रीनृसिंहसरस्वतींनी सांगितलेली प्रीतीची 'एक खूण' गायनी विद्या आभार व प्रार्थना गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्ता सप्तस्वरादिकांचा तक्ता सप्ताहाचा अध्यायानुक्रम व ओवीसंख्या गुरूचरित्र - छत्तिसाव्या अध्यायांतील गायत्रीच्या चोवीस मुद्रांची माहिती श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi. Tags : gurucharitrapothipuranगुरूचरित्रपुराणपोथी छत्तिसाव्या अध्यायांतील गायत्रीच्या चोवीस मुद्रांची माहिती Translation - भाषांतर छत्तिसाव्या अध्यायांत गायत्रीच्या ज्या २४ मुद्रा सांगितल्या आहेत, त्या कशा कराव्या हें पुष्कळांना माहीत नसते. ज्याच्या संख्येच्या पाठांत ह्या मुद्रा सांगितल्या आहेत ते तोंडानेंच मुद्रांची नांवें घेऊन संध्या करतांना दृष्टीस पडतात. संध्येतील मंत्र म्हणणे हें जितके जरुरीचें आहे, तितकेच त्यांत सांगितलेले तंत्र करणेही महत्त्वाचें आहे. एवढ्याकरितां मुद्रा या तंत्रानेही करून दाखवावयाच्या असतात. म्हणून त्या कराव्या कशा याबद्दलची माहिती खाली दिली आहे. त्याप्रमाणें मुद्रा करावयास सर्वांनी शिकावें. प्रत्यक्ष गुरूकडून म्हणजे जाणणार्याकडून समक्ष पाहून करणें हा उत्तम पक्ष; पण ज्याला ही अनुकूलता नाहीं त्यानें खाली दिलेलें वर्णन लक्षपूर्वक वाचून पाहिल्यास त्या तंत्राचा बोध होणें शक्य आहे असें वाटल्यानें हें वर्णन मुद्दाम दिले आहे. चोवीस मुद्रा - " सुमुखं संपुटं चैव, विततं विस्तृतं तथा । द्विमुखं त्रिमुखं चैव चतुःपंचमुखं तथा ॥पण्मुखाऽधोमुखं चैव, व्यापकजिलिकं तथा । शकटं यमपाशं च, ग्रंथितं चोन्मुखोन्मुखम् ॥ प्रलंबं मुष्टिकं चैव, मत्स्यः कुर्मी वराहकम् । सिंहाक्रांतं महाक्रांत, मुद्गरं पल्लवं तथा । एता मुद्रा न जानाति, गायत्री निष्फला भवेत् । एता मुद्रास्तु कर्तव्या, गायत्री सुप्रतिष्ठिता ॥" १ सुमुखं--- दोन्ही हात एकमेकांवर बरोबर बोटें ठेवून (हृदयाकडे नमस्कारासारखे) जोडावे. २ संपुटं---खालीं डावा हात उताणा करून त्यावर उजवा हात दोन्ही हातांमध्ये पोकळी ठेवून उपडा ठेवावा. याची आकृति मोल्यांच्या दोन शिंपा एकमेकांवर झांकल्यानंतर जशा दिसतात त्याप्रमाणें असते. ३ विततं---दोन्ही हात मनगटाच्या ठिकाणीं जोडून पुढील भाग (म्हणजे दोन्ही हाताच्या तळव्यासहित बोटें) उघडा ठेवावा. ४ विस्तृतं---डावा हात खालीं व उजवा हात वर करून दोन्ही हातांमध्ये एक फूट अंतर ठेवून समांतर दोन्ही हात ताठ करावे... ५ द्विमुखं---दोन्ही हात एकमेकांना जोडून म्हणजे हाताचीं परस्पर बोटें एकमेकांना चिकटवून जोडावीं व दोन्ही तळव्याच्या मध्यभागाला खालीं व वर दोन मुखें राहतील अशी पोकळी ठेवावी. ६ त्रिमुखं---वरीलप्रमाणे दोन मुखे ठेवून तिसरें मुख दोन आंगठ्यांमध्ये पोकळी सोडून ठेवावें. ७ चतुर्मुखं---वरीलप्रमाणें ३ मुखें ठेवून तर्जनी व मध्यमा यांमध्ये पोकळी ठेवून चौथें मुख ठेवावें. ८ पंचमुखं---वरीलप्रमाणे ४ मुखे ठेवून मध्यमा व अनामिका यांमध्यें पांचवें मुख ठेवावें. ९ षण्मुखं---वरीलप्रमाणे ५ मुखें ठेवून अनामिका व कनिष्ठिका यांमध्ये सहावें मुख ठेवावें. १० अधोमुखं---दोन हात मनगटाजवळ जोडून पुढील भाग उघडा ठेवून खालीं जमिनीकडे मुख दाखवावें. ११ व्यापकांजलिक---दोन हात एकमेकांना सारखे उताणे जोडून म्हणजे ओंजळ करून आंतील बाजूनें गोल फिरवावे. १२ शकटं---दोन्ही हाताचे आंगठे व तर्जनी जोडाव्या व डावा हात उपडा करून त्याच्या त्या मध्यमा व अनामिका यांवर उजवा हात उपडा घालून उजव्या हाताच्या मध्यमा व अनामिका डाव्या हाताच्या अनामिकेवर व मध्यमेवर अनुक्रमें ठेवाव्या आणि दोन्ही हाताच्या कनिष्ठिका आंतील बाजूस वांकवून धराव्या. १३ यमपाशं---दोन्ही हातांच्या मध्यमा व अनामिका या मिटून त्यावर आंगठा मिटून दाबून धराव्या. नंतर डावा हात उताणा ठेवून व त्यावर उजवा हात उपडा ठेवून एकमेकांना भिडवून जोडावे म्हणजे अनामिका व मध्यमा आणि मध्यमा व अनामिका या एकमेकांना भिडून राहतील. नंतर डाव्या हाताची मध्यमा व अनामिका या उजव्या हाताच्या आंगठ्याखालीं दाबून धराव्या व उजव्या हाताच्या मध्यमा व अनामिका डाव्या हाताच्या आंगठ्याखाली दाबून धराव्या. १४ ग्रंथितं---डाव्या व उजव्या हाताची तर्जनी सोडून बोटें आंगठ्याखाली दाबून धरावीं व डावा हात उताणा ठेवून उजवा हात उपडा ठेवावा आणि दोन्ही हाताच्या तर्जनी एकमेकांत सांखळीच्या दुव्याप्रमाणे अडकवाव्या. १५ उन्मुखोन्मुखं---डाव्या व उजव्या हातांचीं पांच बोटें एके ठिकाणी जोडून धरून डावा हात खालीं व उजवा हात वर करून दोन्ही हातांच्या बोटांची अग्रें एकमेकांवर ठेवावीं व तशा स्थितीत उजवा हात खालीं व डावा हात वर आणि डावा हात खालीं व उजवा हात वर असें खालीं वर करावे. १६ प्रलंबं---डावा हात उजव्या कुशीकडे उताणा ताठ आडवा ठेवून त्याच्या पंज्यावर उजव्या हाताचे कॉपर ठेवून तो हात सरळ उभा करावा (ही आकृति काटकोनासारखी होते.) १७ मुष्टिकं---दोन्ही हाताच्या मुठी करून डाव्या हाताच्या मुठीवर उजव्या हाताची मूठ ठेवणे. १८ मत्स्य---दोन्ही हातांची बोटें ताठ करून डावा हात पालथा करून त्यावर उजव्या हाताचा पंजा तसाच ठेवावा, म्हणजे दोन बाजूला दोन हातांचे आंगठे येतील व डाव्या हाताची कनिष्ठिका, अनामिका, मध्यमा, तर्जनी यांवर उजव्या हाताची तर्जनी, मध्यमा, अनामिका व कनिष्ठिका या अनुक्रमें येतील. नंतर दोन्ही अंगठे माशाच्या पंखाप्रमाणें हालवावे. १९ कूर्म---दोन्ही हातांचीं बोटे ताठ फांकून डावा हात खालीं व उजवा हात त्यावर पालथा घालून सर्व बोटे एकमेकांवर चांगलीं चिकटवून तळव्याच्या मध्यभागी पोकळी ठेवावी.२० वराह---दोन्ही हातांची बोटे एकमेकांना चिकटवून धरावीं व डावा हात खालीं उताणा व त्यावर उजवा हात पालथा ठेवून पुढील बोटांच्या टोकाला वराहाच्या तोंडाप्रमाणे निमुळतेपणा दाखवावा. २१ सिंहाक्रांता---दोन्ही हातांच्या कनिष्ठिका व आंगठे परस्परांशी जोडावे व मनगटे एकमेकांशी चिकटवून बाकीची बोटे पुढे सिंहाच्या उपका तोंडाप्रमाणे ताठ करून फांकून ठेवावीं. २२ महाक्रांता---डावा हात ताठ करून उताणा ठेवावा व उजवा हात ताठ करून मध्यंतरी एक फुटाचे अंतर ठेवून पालथा धरावा. २३ मुद्गरं---डाव्या हातावर उजव्या हाताचें कॉपर ठेवून उजव्या हाताची मूठ मिटून तो कोंपरापासून सरळ उभा धरावा. २४ पल्लवं---डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताच्या अंगठ्यांत पकडून दोन्ही हात आंतील बाजूनें बाहेर फिरवावे. म्हणजे आंगठे एकमेकांत अडकून राहून दोन्ही हातांचे पृष्ठभाग एकमेकांना जोडले जातील. नंतर पंखाप्रमाणे दोन्ही हातांची बोटे हालवावी.. ----(श्रीयुत पांडुरंग गोपाळ रानडे, मालक---महाराष्ट्र औषधी कारखाना, बेळगांव यांनी छापून प्रसिद्ध केलेल्या श्रीयजुर्वेदान्तर्गत “माध्यंदिनी शास्त्रोक्त क्षत्रिय- आन्हिक-कर्मविधि" या पुस्तकावरून हा उतारा घेतला आहे. याबद्दल रा. रानडे यांचे आभार आहेत. संस्कृतज्ञांनी याबद्दलची माहिती स्मृतिचंद्रिका ग्रंथांत पाहावी. ----अथ मुद्राकारः चंद्रिकायां ब्रह्मकल्पे च । अथातो दर्शवेन्मुद्राः संमुखं संपुटं तथा । ततो वितत-विस्तीर्णे द्विमुख-त्रिमुखे ततः ॥१॥चतुर्मुखं पंचमुखं षण्मुखाधोमुखे ततः। व्यापकांजलिकाख्यं च शकटं तदनंतरं ॥२॥यमपाशं च ग्रंथितं ततः स्यात्संमुखोन्मुखं । प्रलंबं मुष्टिका मीनः कूर्मो वाराह एव च । सिंहाक्रांत महाक्रांतं ततो मुद्रपल्लवा ॥३॥इति ॥तल्लक्षणं तत्रैव-संमुखं संघितो हस्तावुत्तानौ कुंचितांगुली (कुंचिता वक्रा:) । संपुटं पद्मकोशाभौ करावन्योन्यसंहतौ ॥विततं संहतौ हस्तावृत्तानावायतांगुली। विस्तीर्णे संहतौ पाणी मिथो मुक्तांगुलिद्वयौ ॥(अंगुल्यौ कनिष्ठे) संमुखासक्तत्योः पाण्योः कनिष्ठाद्वययोगतः । शेषांगुलीनां वैकल्ये द्विमुखत्रिमुखादयः (कनिष्ठयोयोंगेअंगुष्ठवोयोंगेच शेषांगुलीनां वैकल्ये द्विमुखं । तर्जन्योयोंगे त्रिमुखं । मध्यमयोयोंगे चर्तुमुखं । अनामिकयोयेंगि पंचमुखं ।) शेषांगुलीनां संयोगे कनिष्ठा योगनाशने । तिर्यक्संयुज्यमानाग्रौ संयुक्तांगुलिमंडलौ । हस्तौ षण्मुखमित्युक्ता मुद्रा मुद्राविशारदैः ॥या आकुंचिताग्रौ संयुक्तौ न्युब्जौ हस्तावधोमुखं । उत्तानौ तादृशावेव व्यापकांजलिकं करौ ॥अधोमुखौ बद्धमुष्टी मुक्ताप्रांगुष्ठकौ करौ ॥ शकटं नामकथितं यमपाशमतःपरं ॥ बद्धमुष्टिकयाः पाप्योरुत्ताना वामतर्जनी ॥कुंचिताग्रान्यथायुक्ता तर्जन्यान्युब्जवक्रया ॥ उत्तानसंधिसंल्लीन बद्धांगुलिदलौ करौ ॥संमुखौ घटितौ दीर्घागुष्ठौ ग्रथितमुच्यते ॥ संचितोर्ध्वोगुलिर्वामस्तादृशा दक्षिणेन तु ॥ अधोमुखेन संयुक्तः संमुखोन्मुखमुच्यते ॥(संचिता संवद्धा) उत्तानोन्नतकोटी च प्रलंबः कथितौ करौ ॥( उत्तानाऽनामिकाकनिष्ठिकावित्यर्थः) मुष्टी चान्योन्यसंबद्धावुत्तानौ मुष्टिको भवेत् ॥मत्स्यस्तु संमुखीभूतौ युक्तानामाकिनष्ठिकौ ॥ ऊर्ध्वसंयुक्तवत्रात्रौ शेषांगुलिदलौ करौ ॥अधोमुखः करो वामस्तादृशा दक्षिणेन तु ॥ पृष्ठदेशे समाक्रांतः कूर्मो नामाभिधीयते ॥ऊर्ध्वमध्ये वामभुजः पक्षाभ्यामाश्रयेत् करं ॥ वराहः कथ्यते कक्ष समीपाश्रयके करे ।सिंहाक्रांतं समाख्यातं कर्णार्पितकरावुभौ ॥ किंचिदाकुंचितात्रौ च महाक्रांतं ततः परं ॥ऊर्ध्वे किंचिंद्रतौ पाणी मुद्गरो वामतर्जनी ॥ ग्रस्ता दक्षिणहस्तेन पल्लवो दक्षिणः करः ॥(मूर्ध्नि अधोमुखस्थितो दक्षिण करः पल्लव इत्यर्थः) ॥ इति गायत्रीमुद्रा-मूलवचनानि ॥(हीं वचनें सावंतवाडीचे प्रसिद्ध विद्वान वे. शा. सं. अळवणी शास्त्री यांनीं लिहून पाठविलीं याबद्दल त्यांचे फार आभार आहेत.) N/A References : N/A Last Updated : June 27, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP