गुरूचरित्र - संस्कृत श्लोकाष्टकें
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
४० व ४१ अध्यायांतील संस्कृत भाषेच्या अष्टकांत भाषादृष्टीनें व काव्यांतील छंदःशास्त्र दृष्टीने अनेक चुका असलेल्या दिसतात; पण त्या दुरुस्त करणें म्हणजे आपले शब्द नवीन तयार करून घालणे होय. पहिलें 'महास्तोत्र' ('इंदुकोटितेज०’) हें एका विद्वानानें तशा रीतीनें शुद्ध करूनही पाठविले आणि तसें छापण्याबद्दल मला प्रेमानें सूचनाही केली. पण माझ्यानें तसें करवलें नाहीं. याचें कारण मी मागें भागवताचा श्र्लोक--- “तद्वाग्विसगों जनताघविप्लवो, यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि । नामान्यनन्तस्य यशोऽकितानि शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः" हा देऊन सांगितलेंच आहे. इतर सर्व ओंव्यांप्रमाणे ह्या अष्टकांतही अनेक प्रति पाहून---‘मूळ ग्रंथकाराचा शब्द कोणता व लेखकांचा हस्तप्रमाद कोणता ' हें शोधून काढण्याची पराकाष्टा केली आहे. त्यांतील कठीण शब्दांवर विस्तृत टीपा देऊन लोकांचा भावार्थ वाचकांना स्पष्ट समजेल असा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. असे करतांना असर्वज्ञतेमुळें चुकाही होण्याचा किंवा राहाण्याचा संभव आहे. त्यांची श्रीगुरुदेव, ग्रंथकार व कृपाळु वाचक हेतूकडे लक्ष देऊन क्षमा करतील अशी आशा करितों. तसेंच नजरेस आलेल्या चुका वाचकांनीं कृपा करून कळवाव्या अशीही प्रार्थना करितों.
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2023
TOP