सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २८५१ ते २८७५
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
आच्छादें तरी केवीं त्या स्फूर्तीपासून मनबुद्ध्य़ादि ।
उठतां विषयध्यासातें संपादी । तया स्वप्नावस्थेमाजीं । अनादी ॥२८५१॥
देखणा तया व्यापारामन बुद्धि चित्त अहंकार ।
ध्यासें जो जो आठवी प्रकार । देहक्रिया विषय समग्र ।
साक्षित्वें देखे ॥५२॥
तैसेचि जागरीं प्रत्यक्ष विषय । इंद्रियद्वारा वृत्ति जाय ।
त्यांत ज्ञानज्ञान हें द्वय । प्रकाशी निजात्मा ॥५३॥
एवं स्फूर्तीपासून जे विकल्प । विषयापर्यंत सर्व संकल्प ।
उठती निमती जे आपेआप । ते ते जाणे प्रकाशें ॥५४॥
तयासी कोठें असे न कळणें । सर्वांसी अकृत्रिम देखणें ।
ऐसें असतां साधक अज्ञानें म्हणे प्रतीति न ये ॥५५॥
येर तत्त्वें हें न जाणती । म्हणोनि साधका पडली भ्रांती ।
हाचि मी त्या मज न ये प्रतीती ।
आत्मप्रकाश कैसा तो ऐशिया मंदप्रज्ञ साधकासी ।
अभ्यास पाहिजे दिनदिशीं । विकल्प निमित्तां साक्षेपेंसी ।
उरे तो आत्मा भेटे ॥५७॥
जैसें गगन मेघें आच्छादितां । न दिसे असून आहाच पाहतां ।
ते मेघ सर्व वितळून जातां । स्वच्छत्वें दिसे ॥५८॥
तैसे विकल्प निमतां समूळ । उरे निर्विकल्प ब्रह्म केवळ ।
तेंचि आपेआप कळे प्रांजळ । साध्य तें साधकां ॥५९॥
तस्मात् विकल्प हा मोडावया । अभ्यास पाहिजे शिष्यराया ।
तोचि बोलिजे सहज उपाया ।
कवणेरीतीं अभ्यास नलगे प्राणाचा निरोध ।
नलगे आसनादि मूळ बंध । सहजीं सहजत्वें प्रसिद्ध ।
विकल्प तरी मावळे ॥६१॥
ऐसा अभ्यास समाधीचा । जेणें हळुहळु घात विकल्पाचा ।
तोचि बोलिजे स्पष्ट वाचा ।
त्या रीतीं साधकें अभ्यासावा येथें कोणी चार्वाक म्हणती ।
अभ्यासाची जयास भीति । कीं कासया पाहिजे अभ्यासरीतीं ।
आत्मा सर्वों व्याप्त असतां ॥६३॥
तरी आत्मा पहिलाचि व्याप्त । मग विवेचन तरी कासया अपेक्षित ।
कीटकही ब्रह्मचि परी मुक्त । कल्पांतीं नव्हे जैसा काष्ठीं असोनि दाहक ।
मंथनेंविण निरर्थक । तेवीं सर्वत्रीं ब्रह्मात्मा व्यापक ।
परी नेणतां मुक्ति कैची ॥६५॥
तिळामाजीं तेल असे । परी गाळिल्याविण प्राप्त कैसें ।
तेवीं कीटकही ब्रह्म परी अभ्यासें । विण मोक्ष कैंचा ॥६६॥
नदीचें पत्रांत पाणी आहे । परी खांदिल्याविण केवीं लाहे ।
तैसें ब्रह्मत्व असून प्राप्त नव्हे । अभ्यासाविणें ॥६७॥
दुग्धामध्यें असे घृत । परी क्रियेविण नव्हे प्राप्त ।
तेवीं अभ्यासेंवीण कृतकृत्य । कल्पांतीं नव्हे ॥६८॥
सर्व हे ब्रह्मचि असती । येथें संशय नाहीं रती ।
तरी जन्मती आणि मरती । कासया नाना योनी ॥६९॥
तस्मात् जयासी खरें तरावें । तेणें बोलिल्या रीतीं अभ्यासावें ।
अभ्यासें यथार्थ ज्ञान पावावें । तोचि मुक्त साधक येर शब्दज्ञानेंही बडबडितां ।
दृढ केवीं होय अपरोक्षता । अभ्यासेविण न जाय तत्त्वतां।
देहबुद्धि जे दृढ ॥७१॥
असो रविदत्ता येर मूढासी । काय प्रयोजन शुष्क उपदेशी ।
खरी अपेक्षा जरी तुजसी । तरी अभ्यासी यथाक्रमें ।
ऐसें ऐकतांचि रविदत्त । साष्टांगें करूनि दंडवत ।
विनविताहे सद्रदित । म्हणे दयाळा कृपा करी ॥७३॥
ज्या ज्या रीतीं अभ्यासलक्षण । तें तें सांगावें कृपा करून ।
तैसें तैसें मी अभ्यासीन । अंतर न पडतां ॥७४॥
ऐसा आदर जाणून रविदत्ताचा । श्रीगुरू बोलते झाले वाचा ।
अनुक्रमें क्रम अभ्यासाचा । समाधीचा प्रकार ॥७५॥
एकंदर २८७५ ओव्या
N/A
References : N/A
Last Updated : October 20, 2010
TOP