मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १९५१ ते २०००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १९५१ ते २०००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


एकाच्या सुखें सर्व न होती ।
एकाच्या सुखें सर्व न राहती ।
एकाच्या सुखामाजीं न सांठवतीं ।
अंतकाळी ॥५१॥
एकाचें सुख तें प्रवेशानंतर । मग हो कां ब्रम्हादि कीटकांत समग्र ।
परी तेथून नव्हे भूतांचा विस्तार । जरी आनंदमय तेथें ॥५२॥
त्या आनंदमयीं विद्या अवद्यिा दोन्ही । तिजी स्फूर्ति मायारूपिणी ।
जीवेश तेथें प्रतिबिंबोनी । राहिले असती ॥५३॥
इतुक्यासह जो आनंदमय । प्रवेशाउपरि तो व्यष्टिरूप होय ।
प्रवेशापूर्वीं जो समाविष्टमय ।
तेथून सर्व भूतें जाहलीं एथें कोणी विरोध मानिती ।
कीं ईशासहित देहींच वस्ती । बाहेरी नसे ऐशी ववचनोक्ति ।
पूर्वींची असतां ॥५५॥
तरी याचें उत्तर तें ऐसें । देहाबाहेरी तों स्फूर्त्यादि नसे ।
परी जों काल खाणींत न प्रवेशे । आणि न होती निर्माण ॥५६॥
खणीच मुळीं निर्माण नसतां । प्रवेश केवीं होय आंतौता ।
परी भूतें पंचीकृत अपंची कृतता । पूर्वींच जाहली असती ॥५६॥
पूर्वीं भूतसूष्टि जाहली म्हणून । तयासी मायास्फूर्ति असे कारण ।
तोचि आनंदमय समसृष्टिमय पूर्ण । जीवेशविद्याअविद्यात्मक ॥५८॥
तो साकारापूर्वीं केवीं असे । हे शंकाचि कोणीं न कीजे मानसें ।
या मायादेवीचे स्वभावचि ऐसे । अघटन घडवावया ॥५९॥
असो आनंदमय जो समाविष्टमय । तेथून हें सर्व जाहलें भूतकार्य ।
अविद्याप्राधान्यें उत्पादान होय ।
विद्याप्राधान्यें निमित्त जरी कारणत्वया आनंदमया ।
असतां ब्रह्मत्व न म्हणे श्रुति तया । ऐशियाही पहावें तात्पर्या ।
विचारवंतें ॥६१॥
माया अविद्या जीव शिव । पांचवी मायास्फूर्ति स्वयमेव ।
हें निर्माण जाहलें जें रूपनांव । तें भूतांत आलें ॥६२॥
हें इतूकेंही कोठें उद्भवती । तें अधिष्ठान ब्रह्म निश्चिती ।
जेथून या सर्वांची लय स्थिति उत्पत्ति । तें अभिन्न करण एक ॥६३॥
अभिन्न करण नव्हे ईश्र्वर । उपादानेंविण निमित्तमात्र ।
तेवींच निमित्तेंविण माया अनेश्र्वर । उपादान भिन्नत्वें ॥६४॥
तस्मात् माया आणि ईश्र्वरासी । एकचि अधिष्ठान उभयांसी ।
तेंचि अभिन्न निमित्त उपादानासी ।
मुख्य कारण ब्रह्म ऐसें हें श्रुतीचें तात्पर्य ।
बोलतसे उत्पत्ति स्थिति लय । या तिहीं कार्यासी जें अद्वय ।
तें ब्रह्म एकचि पूर्ण ॥६६॥
येर हे बत्तीस अनात्मजात । ते निरोपिले रूपासहित ।
आणि त्याचे धर्म ते गुणदोषयुक्त ।
या उभयां अतीत चिति तेंचि ब्रह्म तोचि आत्मा ।
ऐक्यत्वविषयीं श्रुत्यर्थसीमा । हेंचि जाणेल तो साधक महात्मा ।
खरा मुक्त होय ॥६८॥
एवं श्रुति युक्ति अनात्मजातासी । साह्य आरोपिली जेपंचकोशांसी ।
ते खंडिली मुख्य निर्धारेंशीं । आता अनुभूति कैशी ती पाहूं ॥६९॥
देहासी अथवा प्राणासी । मनोमय विज्ञान आनंदासी ।
आत्मत्व कल्पना जरी सर्वांसी । तरी अवधारावें साधकें ॥७०॥
मुळीं अज्ञान जें कां आपुलें ं तेणेंचि अनात्मया भाविलें ।
हें तों पूर्वींच आह्यीं निरोपिलें तरी हें सत्य कैसें ॥७१॥
मदिरा पिऊनियां भुलला । सत्य कोण मानी त्याचे बोलाला ।
तैसा देह बुद्धि जो घेऊन बसला । त्याचा अनुभव अनुपयोगी
तथापि तया देहात्मवादियासी । पुसावें कीं देहा आत्मा म्हणसी । तरी प्राण मन विज्ञानादिकांसी ।
आत्मत्व कल्पीसी कां एक आत्मा अससी निर्धार ।
कीं जाहला अससी पांच चार । ऐसा तो कोठें न देखे प्रकार ।
जरी उन्मत्तही भ्रमे ॥७४॥
स्वप्नीं जरी नाना उद्भववी । परी आपणातें एकचि भावी ।
दिसती बहुपरी येर आघवीं । दुजीं मजहूनी ॥७५॥
उन्मत्तकालीं कीं स्वप्नामाजी । एक रूपा मानिना दुजी ।
हे शाहणे केवीं मानिती सहजीं । बहुधा आत्मया ॥७६॥
मागुतीं तो देहात्मवादी । म्हणेल मी देह एकचि अनादि ।
प्राणादि बहुधा कोण प्रतिवादी । आत्मा म्हणोनि ॥७७॥
तरी पहा देहाहून प्राण । प्राणाहून मन विज्ञान ।
हे आवडीचें तारतम्य लक्षण । मागां निरोपिलें ॥७८॥
हें तारतम्य सारिखें सर्वांसी । तरी ते आवडी कासया धरिसी ।
देहाहून आवडी जरी प्राणासी ।
तरी प्राण आत्मा अर्थात देहासी अनात्मत्व आलें ।
कीं प्राण आवडून देहा उपेक्षिलें ।
उगेंचि बळें जें आत्मत्व मानिलें ।
तें उडे आपेआप तैसेंच प्राणाहून मन आवडे ।
 तेव्हां प्राणाचें आत्मत्व उडे ।
त्याहून विज्ञान प्रीति जोडे । तरी मनही अनात्मा ॥८१॥
सुप्तिकाळीं आनंद आवडता । येर बुद्धयादि सारी परता ।
ऐसें आवडीचें तारतम्य पाहतां । अकृत्रिम सर्वांसी ॥८२॥
ऐसें असतां हे मूढ कैसे । देहात्मवादाचें घेती पिसें ।
असो त्या भ्रामका काज नसे । परी सांगावें मुमुक्षा ॥८३॥
कीं हें उगेंचि भ्रमें मानिलें । जैसें पुत्रादिकां आत्मत्व कल्पिलें ।
स्त्रीसही अर्ध देह बोलिलें । तेवींच देहादिकां ॥८४॥
पुत्रादिकां गौणात्मा म्हणावें । देहादिकां मिथ्यात्मत्व समजावें ।
हें अवघे अज्ञानकृत्य कळावें । जया तरावें वाटे तया ॥
अज्ञान म्हणजे मुख्य आत्मयाचें । न कळणें होय स्वकीयत्वाचें ।
तेणेंचि देह मी म्हणून नाचे । जन्मावया मरावया ॥८६॥
ऐसा मिथ्यात्मयाचा प्रकार । उगाचि मानी असतां पर ।
जैसा सिंहचि कीं हा असे नर ।
तेवीं गौणात्मा पुत्रादि ऐसें असतां या अज्ञान जनीं ।
पुत्रात्मत्वही न त्यागिती कोणी ।
मा देहाचें आत्मत्व त्यागुनी । परते कोण ॥८८॥
असो रविदत्ता मुमुक्षूनें । निज स्वहित स्वतां करणें ।
ब्रह्म आत्मा निःसंशयपणें । येर अनात्मजात सर्व ॥८९॥
या पंचकोशांसी श्रुति बोले । ब्रह्मत्व म्हणोनि युक्तीनें स्थापिलें ।
जनाचे अनुभवही कल्पिले ।
परी विचारापुढें तुच्छ विचारितां श्रुत्यर्थही कळे ।
तात्पर्य समजून कुतर्क मावळे । हळूहळू अनुभवही निवळे ।
विचारवंता श्रवणें ॥९१॥
एक मुख्यात्मयाचा निर्धार । तीहीं प्रतीतीनें करावा विचार ।
येर अनात्मजात सविस्तर ।
पंचकोशात्मक बत्तीस जैसें मुख्यात्मया प्रमाणावास्तविक
श्रुति युक्ति अनुभवेंकडून ।
तैसें अनात्मया नसे पहा विचारून। श्रुति युक्ति नानाभूति
एवं अनात्मजात पंचकोश । ब्रह्मात्मा एकचि अविनाश ।
हा निर्धार झाला परी सारांश ।
श्रुतिचा निवडू मागुती जया निरुपणें साधकासी ।
मुख्यात्मत्व येईल निश्चयासी । आणि अनात्मत्व होईल येरांसी ।
देहादि बत्तीसां ॥९५॥
तेंचि ऐकावें सावधान । पंचकोशांचें विवेचन ।
श्रुत्यर्थाचाही सारांश पूर्ण । आकळे स्वानुभवा ॥९६॥
अज्ञान देह आत्मा मानिला। जो मांसादिकांचा अन्नमय बोलिला ।
अन्नचि ब्रह्म म्हणून नेम केला ।
परी तात्पर्य भिन्न कोशपंचका पक्ष्याकारता ।
बोलिलीं पांच पांच अंगें तत्त्वतां । इतुकें सर्व विचारें पाहतां ।
कळे कैसें अनात्मत्व ॥९८॥
अन्नमयाचें हेंचि शिर । हे हेचि पक्ष दक्षिणोत्तर ।
हाचि आत्मा हें पुच्छ निर्धार । श्रुतीनें केला ॥९९॥
ब्रह्म तरी सच्चिद्धन । निर्विकार अदृश्य पूर्ण ।
जेथें अमुक म्हणून निर्देश वचन । सहसा न करी श्रुति ॥२०००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP