मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ६०१ ते ६५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६०१ ते ६५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


येणेंचि रीतीं । मी किती चांगुला । नखशिख आवडता जाला ।
हस्तपादादि शोभला । हेंचि विडंबन ॥१॥
श्रोत्रांचें ऐकणें चांगुलें । आवडे त्वचेनें स्पर्शलें ।
आकर्ण नेत्रें शुद्ध देखिलें । हेंचि विडंबन ॥२॥
रसनेची गोडी अति सुरस । अति चांगुला घेणं सुवास ।
माझें बोलणें किती नवरस । हेंचि विडंबन ॥३॥
ग्रहण दाना हस्त चांगुले । गमन गती सरळ पाद भलें ।
उपस्थ गुद किती शोभलें । हेंचि विडंबन ॥४॥
पंचप्राण चांगुले असती । अहंकार तो उत्तम अति ।
सावधानता चांगुली चित्तीं । हेंचि विडंबन ॥५॥
बुद्धि निश्चया अति उत्तम । मनही चांगुलें असे परम ।
अंतःकरण गुणही होती सम । हेंचि विडंबन ॥६॥
माझें करणें वर्तणें आचरणें । पाप कीं पुण्य न म्हणे ।
चांगुलें म्हणून भावी मनें । हेंचि विडंबन ॥७॥
ऐसे जागृतीचे व्यापार । वाईट कीं असोत सुंदर ।
परी चांगुलेंचि सविस्तर । हेंचि विडंबन ॥८॥
एवं अस्ति भाति प्रिय या रीतीं । जागृतींत आरोपी भासाप्रती ।
तैसेंचि स्वप्नीं भावी ध्यासावरुती । हेंचि विडंबन ॥९॥
भासदेह जो मने कल्पिला । तो आहे जाणे चांगुला ।
येरा भासा हर्षे कीं भ्याला । हेंचि विडंबन ॥६१०॥
या रीतीं स्वप्न आणि जागृती । माजी अस्ति भाति जे प्रीति ।
आपुलीं लक्षणें आभासावरुतीं । स्थापी बळें ॥
जैसा वृक्षीं बैसलियाचा । पाहणें प्रीति आहेपणा साचा ।
तो पडिलियावरी आरोप त्याचा । स्थापी बळें ॥१२॥
हस्तपादादि मस्तक आहे । पडिला कैसा टकमकां पाहे ।
आवडी त्याची धरोनि राहे । तेव्हां काढा म्हणे ॥१३॥
तैसाचि हाही वृत्तीपासोन । देहांत मीच ऐसा मानून ।
सोडवा म्हणे बंधांतून । हें विडंबन नव्हे ॥१४॥
अगा हे रविदत्ता तुजसी । निरोपिलें कळलें कीं मानसीं ।
एक तें सांगितलें अविनाशी । एक हें मिथ्या ॥१५॥
अस्ति भाति प्रियरूपता । जे मागील श्र्लोकीं आभास जीव ।
ज्याचा असज्जड दुःखात्मक स्वभाव ।
परी आरोपिलें अस्ति भाति प्रियत्व हा मिथ्या प्रतिबिंब ॥१७॥
ऐसे सत्य मिथ्या हे दोन । पदार्थ असती वेदांत प्रमाण ।
तिसरा नाहीं जरी नाना संपूर्ण । तरी अंतर्भूत दोहींत ॥१८॥
आत्मा ब्रह्म सच्चिदानंद । द्रष्टा साक्षी अद्वय अभेद ।
ऐसे नामाचे अनेकधा भेद । परी आब्रह्म एक ॥१९॥
माया गुण वृत्ति अंतःकरण । मनादि प्राण बहिःकरण ।
देहादि जीव आदिकरून । मिथ्या पदार्थं एक ॥६२०॥
तस्मात् दोन पदार्थाचि असती । सत्य मिथ्या मुख्य आभास भ्रांति ।
यास्तव मुमुक्षूनें विचारें निश्चिंतीं । सत्य मिथ्या निवडावें ॥२१॥
निवडणें म्हणजे विवेचन । सत्य तें सत्यत्वें घ्यावें आपण ।
मिथ्या तें मिथ्यात्वें त्यागून । सुखी व्हावें ॥२२॥
देह नासे इंद्रियें नासतीं । प्राण वाहती ते नासून जाती ।
मनादि तीं क्षणक्षणां पावती । स्वतांची नाश ॥२३॥
वृत्तीसहित जीव हारपे । जेवीं सतोय प्रतिबिंब लोपे ।
तस्मात् हा केवी होईल सद्रूपे । उद्भव लय जया ॥२४॥
ऐसा विचारून यया मिथ्याचा । आहेपणा जो असे सत्याचा ।
काढून निर्धार करावा साचा ।
अहमात्मा आभास त्यागें जेवीं वृक्षस्थावांचून ।
पडिलिया कैचें आहेपण । तैसा आत्मा जो सच्चिद्धन ।
तयाचें अस्तित्व यया ॥२६॥
आतां कळणें जें या सर्वांसी । देहादिकां वाटे आभासासी ।
परी जयाचिये प्रकाशीं । प्रकाशमान हें ॥२७॥
शब्दस्पर्शादि देहचि जाणत । तरी निद्रिस्थाचा देह पडे प्रेत ।
मागें पुढें असतां नेणत । स्त्री कीं सर्पं ॥२८॥
श्रोत्र असतां रायकती । स्पर्श न कळे त्वचेप्रति ।
नेत्र उघडे तरी न देखती । तम कीं प्रकाश ॥२९॥
जिव्हेवरी साकर असतां । गोडी न कळे कीं तत्त्वतां ।
कस्तुरी नासिकीं बांधितां । सुगंध नेघे ॥३०॥
वाचादि कर्मेंद्रिय सर्व । व्यापार न करिती स्वयमेव ।
वाणी वरळे जरी जाणीव । नसे त्या शब्दाची ॥३१॥
प्राण जरी देहीं वावरती । परी वस्त्रें हरितां ते नेणती ।
तस्मात् जडत्व प्राणप्रती । स्वतःसिद्ध असे ॥३२॥
मन बुद्धि चित्त अहंकार । जरी हीं जाणती तत्त्वें चत्वार ।
तरी करून पाहतां विचार । परप्रकाशक ॥३३॥
जैसें उपनेत्रें स्पष्ट दिसे । परी आंधळिया काय असे ।
तैसें आत्मत्वाचीये प्रकाशे विण वृति व्यर्थ ॥३४॥
एकीकडे वृत्ति लागतां । दुसरीया पदार्था समस्तां ।
न जाणती सन्निध असतां । म्हणोनि परप्रकाश ॥३५॥
अथवा वृत्तिविषयीं धांवे । तेधवांचि साक्षित्वा पहावें ।
साक्षी परततां स्वभावें । मग वृत्ति विषय नेघे ॥३६॥
आदळून जडत्वें पडे । परी आमुक हें न निवडे ।
ऐसें विचारितां हे जडे । प्रत्यया येती ॥३७॥
या एका वृत्तीचे प्रकार । कार्यपरत्वें चत्वार ।
मन बुद्धि चित्त अहंकार । भिन्न भिन्न दिसती ॥३८॥
संकल्प विकल्प नव्हे आहे । संशयात्मकें निश्चय न लाहे ।
तेंचि मन ओळखून पाहे । परप्रकाश ॥३९॥
निश्चय करी जो एक । होय कीं नव्हे हें अमुक हेंचि बुद्धीचें रूपक । परप्रकाश ॥६४०॥
दृष्ट श्रुत पदार्थांचा । छंद घेतसे चिंतनाचा । तेंचि चित्त नामें साचा । परप्रकाश ॥४१॥
अमुक करीन कीं न करीं । हाचि अहंकार निर्धारी ।
हेंही जाणतें तत्त्व परी । परप्रकाश ॥४२॥
एक वृत्ति परप्रकाश । कळतां जरी निश्चयात्मक ।
तरी चारीही भासला एक । कळे निर्धारें ॥४३॥
गुण तरी अंतःकरणाचे । कामादि धर्म तयाचे ।
यांसी जडत्व बोलणें साचें । नलगे वेगळें ॥४४॥
आतां वृत्तीमाजीं जो पडे । प्रतिबिंबत्वें जीव आतुडे ।
परी यासही ज्ञान न जोडे । आत्मप्रभेवीण ॥४५॥
जेवीं आदित्य गगनीं नासलिया । प्रतिबिंबचि न पडे आरसिया ।
मा झळझळ पडे कोठोनियां । भिंती वरुती ॥४६॥
तैसें मन जाऊन पदार्थीं आदळे । तया स्फुरवी किंचित् उजाळें ।
परी आदि अंतीं प्रकाशामुळें । मध्यें उठोनि निमे हे बोलणें पुढें असे ।
सामान्य विशेष निवडे ऐसें । प्रस्तुत येथें समजावें मानसें ।
कीं परप्रकाश जीव ॥४८॥
तस्मात् देहापासून जीव । पर्यंत हें जडचि सर्व ।
जाणती वाटती ते अपूर्व । व्यर्थ विडंबन ॥४९॥
जेवीं वृक्षस्थाचा हात पाय हाले । डोळे फिरती मान डोले ।
तेचि पडिलियावरी उमटले । कीं प्रत्यक्ष हालती ॥६५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP