सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २०५१ ते २१००
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
विज्ञान आहें तों राहतें । शेवटीं ज्ञानीं लया जातें ।
तरी पाहें होय कीं नव्हे ॥५१॥
हें लक्षण ब्रह्मीचें बुद्धीवरी । योजना घडे परी निर्धारी ।
बुद्धी नुरेचि मुप्तीमाझारीं । आणि पुन्हां उद्भवे ॥५२॥
उद्भवतां मनाच्या सहवासें । संकल्पविकल्पा साह्य होतसे ।
निश्चय करी परी विश्र्वासें ।
सत्यत्व स्थापी मिथ्यत्वा मी देह म्हणून दृढतर ।
निश्चयें घेतसे अहंकार । म्हणोनि अहंता धर्म साचार ।
बुद्धीचा असे ॥५४॥
हेही पंचज्ञानेंद्रियद्वारा । बाह्य वर्ते विषयाकारा ।
परी मन संशया मोडोनि निर्धारा । अमुकसा निश्चय करी ॥५५॥
मनासी इच्छा कामादिकांची । तरी तैशीच आज्ञा पाळी वेदाची ।
त्याच रीतीं बुद्धि घे रुचि । प्रवृत्तीकडे ॥५६॥
अथवा मनें मोक्षाची इच्छा घेतां । आज्ञा तेचि मानी त्रयी परता ।
तैशीच बुद्धीसी होय निश्चयात्मकता ।
यास्तव श्रद्धा शिर प्रवृत्तीकडे जरी आवडी ।
तरी स्वर्गादिकां सत्यता स्थापी प्रौढी ।
अथवा मोक्षाकडे निश्चयाची वोढी ।
तरी सत्यता ब्रह्मींची हा निर्धार बुद्धीचा पाहिला ।
म्हणून श्रुतीनें असे नेम केला । ऋृत म्हणतसे दक्षिणपक्षाला ।
सत्य उत्तर पक्ष ॥५९॥
जें का सत्य म्हणून मानिलें । तेथेंचि अनुसंधान दृढ केलें ।
हे बुद्धीचे स्वभावचि देखिले ।
तेव्हां योग आत्मा श्रुति म्हणे जे कां सत्य म्हणून मानिलें ।
तेथेंचि अनुसंधान दृढ केलें । हे बुद्धीचे स्वभावाचि देखिले ।
तेव्हां योग आत्मा श्रुति म्हणे योग म्हणजे अखंड उद्योग ।
सत्य वस्तूचा ध्यानें संयोग । कदांही होऊं नेदी वियोग ।
हें चवथें अंग विज्ञानाचें ॥६१॥
त्या संयोगें जें अप्राप्त । तेंचि करून घेतसे प्राप्त । मग
साभिमानें मानी कृतकृत्य । यास्तव महा पुच्छ बोलिलें ॥६२॥
धन्य मी जें हृदयीं धरिलें । त्या वस्तूसी प्राप्त करून घेतलें ।
ऐसें बुद्धीनें महत्त्व स्वीकारिलें ।
तस्मात् महा पुच्छ खरें एवं श्रद्धाचि विज्ञानाचें शिर ।
ऋृत सत्य पक्ष दक्षिणोत्तर । योग आत्मा हा निर्धार ।
महा पुच्छ प्रतिष्ठा ॥६४॥
ऐसा विज्ञानाचा प्रकार । श्रुति सांगतसे निर्धार ।
याचा साधकें अंतरीं विचार । या रीतीं केला पाहिजे ॥६५॥
जैसें पंचज्ञानेंद्रियसहवासें । मन हें विषयाकार होतसे ।
तैसेंचि विज्ञाना साहायत्व असे । पंचज्ञानेंद्रियांचें ॥६६॥
तस्मात् पंचज्ञानेंद्रिय बुद्धि एक । हा विज्ञानकोश मिळून षट्क ।
हा आनंदमयासी आच्छादक । कारण मनाचें ॥६७॥
जरी बुद्धीस्तव सर्व जाहलें राहिलें । बुद्धि अभावीं लया गेलें ।
परी यासी ब्रह्मत्व नाथिलें । नाश होय म्हणोनी ॥६८॥
जैसें मन एक विषयग्रहणा । साधन असे भक्त ते विधाना ।
तेवींच साधनता यया विज्ञाना । असे साध्यचि ॥६९॥
तमात् विज्ञानात्मा कल्पूं नये । कोश हा अनात्मा निःसंशय ।
परी विज्ञानयोगें कार्य । साधून घ्यावें ॥२०७०॥
श्रद्धा शिर जें विज्ञानाचें । जें कां आवडतेपण स्वर्गादिकांचें ।
तेंचि त्यागावें इहपर साचें । दोषदृष्टीनें विचारें ॥७१॥
एक वेदांतप्रसिद्ध जें ब्रह्म । तेंचि गुरुमुखें आकळावें वर्म ।
तेथेंचि बुद्धीची श्रद्धा परम ।
येर अनात्मजात त्यागा तेंचि ऋृत तेंचि सत्य साचाराशब्द दोन परी अर्थ एक हा निर्धार ।
तस्मात् ब्रह्म सत्यत्वें बत्तीस हे येर ।
मिथ्यात्वें समजावें मिथ्यात्व कळतां श्रद्धा उडे ।
आणि सत्य ते सत्यत्वें जोडे । बुद्धीचा निश्चय धांवे तिकडे ।
तेव्हां श्रद्धा ही सत्याची ॥७२॥
मग देहबुद्धीचा करी त्याग । बह्मात्मयाचा अखंड योग ।
सदां ध्यानाचा लागवेग । विसरचि पडो नेदी ॥७५॥
ऐसा अभ्यास दृढ होती । शनैःदेहबुद्धि होय त्यागिता ।
मग आपुलें महत्त्व स्फुरे तत्त्वतां । जें पुच्छत्वीं प्रतिष्ठिलें ॥७६॥
अहंबह्मास्मि तरी स्फुरे । परी त्रिपुटी साधकत्वें उरे ।
तेंचि महत्त्व विज्ञानानुकारें । निश्चयरूप ठसावें ॥७७॥
येऱ्हवीं बुद्धि बंधासी कारण । परी विवेचनें मोक्षद होय आपण ।
म्हणूनि मुमुक्षें जावें शरण । यया बुद्धीसी ॥७८॥
देहबुद्धीचा निश्चय त्यागी । आत्मा ब्रह्म प्रतिपादी वेगीं ।
मग मनही संशयातें त्यागी । एवं उपयोगी परमार्था ॥७९॥
परी विज्ञानमय ब्रह्म साधावया । साधन असे गा शिष्यराया ।
तस्मात् साधकत्व असे जया ।
तें साध्य ब्रह्म नव्हे साध्य तें उर्वरित उरावें ।
साधकें तत्क्षणीं नसावें । म्हणून विज्ञान तें ब्रह्म नव्हे ।
कवणे काळीं ॥८१॥
ब्रह्म सत् बुद्धि असत् । ब्रह्म चित् विज्ञान जड उद्भवत ।
विज्ञान सदां सुखदुःखें शिणत । ब्रह्म सुखैधन ॥८२॥
ऐसें विलक्षण परस्परें । म्हणोन विज्ञान ब्रह्म नव्हे खरें ।
हें साधकें पहावें विचारें । निःसंशयपणें ॥८३॥
जरी विज्ञान कारण सर्वांसी । लय स्थिति कीं उद्भवासी ।
परी कार्यरूपता विज्ञानासी । कारण आनंदमय ॥८४॥
श्रुति बोले या विज्ञानाहून । अन्य आत्मा आनंदमय पूर्ण ।
तेणेंची बुद्धीची पूर्णता होणें ।
तस्मात् विज्ञान अनात्मा आतां आनंदमय कोश हा पूर्ण ।
कार्य करणासीही कारण । बुद्धीसहीत सर्व भूतें निर्माण ।
होतीं राहतीं नासतीं ॥८५॥
येर अन्नादि विज्ञानांत चारी । कारणें कल्पिलीं असतीं निर्धारी ।
परी आनंमयाची नये सरी । कारणत्वाविशीं ॥८६॥
आनंदेवीण भूतें नाना । कदापि उत्पन्न होतीना ।
आणि आनंदेवीण राहतीना । क्षणभरी जीवत्वे ॥८८॥
सुप्तिकाळीं विज्ञानासहित । त्यागून अन्नमयादि समस्त ।
प्राण जरी असती वावरत । परी सद्भाव नाहीं ॥८९॥
एवं चारीही कोशांवांचून । सर्व भूतें सुप्तींत पूर्ण ।
असतां आनंदमयामाजीं लीन । वंचतीं सुप्तिसुखें ॥२०९०॥
एवं चारी असतां येका आनदें । वांचतीं भूतें सुखस्वादें ।
परी एक आनंदेविण चारी विशदें ।
असतां भूतें न वांचतीं तस्मात् मुख्य कारण आनंदमय ।
आणि आनंद कोणाचें नव्हें कार्य । येरांशी कारणाचा आरोप होय ।
परी कार्यरूपी चारी ऐसा आनंदमय मुख्य कारण ।
परी याचाही विचार साधकें करणें । ऐसें श्रुतीही बोलिली जें वचन ।
तेव्हां उणीवता वाटे आणि कोश ऐसे आनंदा म्हणतां ।
हें तों प्रत्यक्ष आच्छादकता । परी आच्छादिले असेल आंतौता ।
तें तों भिन्न याहुनी ऐसा विचार साधकें करावा ।
या आच्छादनीं कोण स्वभावा । तो निवडुन येर त्यागावा गोंवा ।
कोश नामाचा ॥९५॥
याही कोशासी पांच अंगें । पक्षा ऐसींच श्रुति सांगे ।
हेंचि किमर्थ हा लागवेगें । विचार करावा ॥९६॥
जरी अतिसूक्ष्म विचारवंत । तरीच आनंदमयातें निरसित ।
येऱ्हवीं मागुतीं बंधनीं पडत ।
जरी चारी कोश निरसिले जैसें तृण वरचिल जळालें ।
भूमीपोटीं बीज उरलें । तेवीं विज्ञानादि चारी निरसिले ।
परी अज्ञान उरे आनंदीं ॥९७॥
वर्षांकाठीं पुन्हां तें तृण । पूर्ववत् होतसे निर्माण ।
तैसी विज्ञानादि भूतें संपूर्ण । उद्भवती पूर्णपरी ॥९९॥
ते कां निरसिलें ऐसें म्हणावें । जरी पुन्हां मागुतीं बाधक उद्भवें ।
असो साधकें येथें विचारें पहावें ॥२१००॥
N/A
References : N/A
Last Updated : October 20, 2010
TOP