सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९०१ ते ९५०
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
एवं मुळीं जे अहंब्रह्मस्फूर्ति । ते स्वरूपातें जाली विसरती ।
येथेंही कोणी शंका करिती । कीं ईश सर्वज्ञ कैसा ॥१॥
जरी नेणणें मूळ पुरुषासी । तरी ईषासी सर्वज्ञता कैशी ।
तरी नुसधी विद्या उपाधि जयासी । तेणें जाणें सर्वांतें ॥२॥
स्फुरणापासून जें जें जालें । ब्रह्मादि तृणांत उद्भवलें ।
तें तें जाणें ईक्षणें आपुलें । म्हणोनि सर्वज्ञ ॥३॥
न जाणणें जें कां ब्रह्मीचें । तें तों सर्वपणांत नवचे ।
त्याविरहित होणें जितुकियाचें । जाणणें घडे ॥४॥
मागुतीं म्हणसी ब्रह्म आसिकें । ईशासी न कळे निकें ।
तरी जीव केवीं जाणें कौतुकें । तरी अवधारी ॥५॥
स्फुरणापासून जे त्रिगुण । त्या त्रिगुणांचे अंशें ईशान ।
देह धरितां जाला आपण । मानसिक साकार ॥६॥
पुढें चारी खाणीही होती । पांचवी मानसिक योनी निश्चिती ।
एवं जे जे देवादि कीटकांत उद्भूति । इतुकीही साकार इतुक्याही आकारीं प्रवेश ।
जीवरूपें करी ईश । तेव्हां ज्ञानाज्ञान हें विशेष । प्रगटतें जालें ॥८॥
विष्णु सदाशिव हे दोन्ही । तेथें अज्ञान नसे निपटूनी ।
स्वस्वरूपज्ञान ऐक्यपाणी । अपसयाची जाहलें ॥९॥
नाहीं गुरु ना सच्छास्त्र । उत्पन्न होतांचि स्वरूप निर्धार ।
होता जाला कीं निर्विकार । अहंब्रह्मास्मिरूपें ॥९१०॥
ऐसें स्वयेंचि ज्ञान जालें । किंचित् नेणणें तें निपटून गेलें ।
तयासी नित्यमुक्त असें बोलिले । सृष्ट्यादिही व्यापारीं ॥११॥
पुढें गुरुमुखें एकमेकां । ज्ञानानुभूति निश्चयात्मका ।
प्रगटती जाली तया कौतुका । जीवन्मुक्ति नाम ॥१२॥
तस्मात् जो कोणी विचारवंत । गुरुमुखें ज्ञान आकळित ।
तयाचें अज्ञान सर्व नासत । ब्रह्मात्मत्वीं । ऐक्य पावे ॥१३॥
जया वृत्तीसी अज्ञान आलें । तया वृत्तीसीच ज्ञान उद्भवलें ।
त्या दोन्हीसहित स्फुरण मावळलें । पुढें अभिन्नता ऐशी कोणताही पदार्थ पाहतां ।
आरंभीं त्याची अज्ञातता ।
तो अमुक ऐसा वृत्तीसी कळतां । अज्ञान नासे ॥१५॥
अज्ञान नासून ज्ञान जालें । तेंही ज्ञान स्फूर्तिरूप मावळलें ।
पुढें पदार्थमात्र स्वयें उरलें । हा स्वभावचि वृत्तीचा ॥१६॥
तैशी गुरुमुखें बहिर्मुखता । वृत्तीची मोडून तत्त्वंतां ।
होय जेव्हां स्वरूपाकारता । अंतर्मुखत्वें ॥१७॥
तेव्हां निरूपाचें अज्ञान । फिटोन वृत्तीसी होय ज्ञान ।
ते ज्ञानस्फूर्तीही मावळून । केवळ ब्रह्मात्मा उरे ॥१८॥
यासीच बोलिजे अभिन्नता । हेचि बापा जीवनमुक्तता ।
तस्मात् जीवही पावे अपरोक्षता । तेथें संदेह नाहीं ॥१९॥
एकदा सांगता नाहीं कळलें । तरी वारंवार पाहिजे श्रवण केलें ।
तैसेंचि मनन निदिध्यासन आपुलें । केलेंचि पुन्हां करावें याचि हेतु अतिप्रयत्नेंशीं ।
अभ्यासावें दिवा कीं निशीं । मागें बोलिलों आम्ही तुजसीं । तस्मात् मुमुक्षें यत्न करावा ॥२१॥
ऐसें गुरुमुखें वचन ऐकतां । रविदत्त घाली दंडवता ।
अति सप्रेमें झाला विनविता । जी जी ताता सद्गुरु ॥२२॥
अहो धन्य मी सर्व उपेक्षून । श्रीचरणा आलों शरण ।
आतां कृतकृत्य जालों हें अप्रमाण । न घडे कल्पांतीं ॥२३॥
कामधेनूचें वासरूं । भुकेलें न राहे निर्धारु । तेवीं मज वोळलासी सद्गुरु । आतां सांकडें काय ॥२४॥
मी जरी मंदप्रज्ञ असे । तरी वारंवार श्रवण अभ्यासें ।
ऐक्यता पावेन कृपेसरिसें । मज चिंता कासया ॥२५॥
मज पुसावें काय न पुसावें । हेहीं कळेना स्वभावें ।
परी गुरुमायेनें लेववावें । अपत्या वाक्यनगें ॥२६॥
तथापि आर्षपणें तें लेकरूं । छंद घे भलताचि अंलकारू ।
भलते स्थानीं परिकरू । लेववीं ह्मणे ॥२७॥
तें स्थान नव्हे त्या नगाचें । परी जननीस कौतुक बाळाचें ।
तेवीं माझिये आर्षप्रश्र्नाचें । कोडें पुरवावें ॥२८॥
जागृति नाहीं स्वप्नाआंत । स्वप्न नसे सुषुप्तींत ।
तेवींच सुषुप्तिही नसे दोहींत । तेव्हां अवस्था मिथ्या ॥२९॥
अस्ति भाति प्रिय आत्मा । याची तिही अवस्थेंत गरिमा ।
तोचि सत्य या रूपनामा । वास्तवपणा नसे ॥९३०॥
जागृतींत अथवा स्वप्नामाजीं । आत्मा ज्ञानघन असे सहजीं ।
परी विशेषत्वें जें वृत्ति दुजी । ते आच्छादि सामान्या सुषुप्तींत जरी सामान्य प्रगटे ।
वृत्तीचें विशेषत्व वोहटे । परी अनुभवासी न भेटे । प्रत्यक्ष वृत्तीसी ॥३२॥
वृत्तीसी न कळतां सघन । केवीं जाईल हें अज्ञान ।
भ्रांतीच न फिटतां अन्यथा भान । न जाय सहसा ॥३३॥
एवं जागर स्वप्नीं विशेषामुळें । सच्चिदानंद वृत्तीसी न कळे ।
सुप्तींत तो स्वानुभवाचे डोळे । असून अनुपयोग ॥३४॥
तस्मात् सच्चिद्धन आत्मयाचें । वृत्तीसी ज्ञान केधवां साचें ।
होय यया बरळ या प्रश्र्नाचें । सांकडें फेडावें जी ॥३५॥
ऐशी रविदत्ताची ऐकतां वाणी । स्वामीसी अति हर्ष जाला मनीं । म्हणती भला अससी अवधानी ।
प्रश्र्नही करिसीं नेटका आतां असावें सावधान । जागृतीमाजीं सच्चिद्घन । दाखवूं ऐकावें निरूपण ।
एकाग्रभावें ॥३७॥
जागरेपि धियस्तूष्णीं भावः शुद्धेन भास्यते ॥
जागृति कालींही उगें असतां । गुणादि विकार किंचित् नसतां ।
आत्मस्वरूप सामान्यता । शुद्धभावें भासे ॥३८॥
परी गुणाचे विकार समजावे । जे किमपि जेथें नसावे ।
तरीच उगेपणाचें रूप फावे । उदासवृत्ति नामें ॥३९॥
सत्व रज तम तिन्ही गुण । यांचें अंतःकरणीं आरोहण ।
होतां भाव होती भिन्न भिन्न । एकल्या वृत्तीसी ॥९४०॥
परी येक येतां दोन जाती । तिहींची एकत्र नसे वस्ती ।
जेवीं दोन खालीं एक वरती । कांटे सराटियाचे ॥४१॥
तेवी सत्त्वगुण उभयतां । रजमता तळवटी खालुता ।
रजचि जेव्हां उदया येतां । तम सत्त्वा उठों नेदी ॥४२॥
तम जेव्हां येतां उदया । उद्भवू नेदी यया उभयां ।
ऐसे गुणाचे स्वभाव वृत्तीचिया । ठायीं असती ॥४३॥
तया तिहींचे स्वभाव तीन । भिन्न भिन्न तिहींचे लक्षण ।
धीर मूढ शांत विचक्षण । विवंचून पाहती ॥४४॥
घोर म्हणजे रजाची वृत्ति । मूढ तेचि तमाची गति ।
सत्त्वगुणाची असे शांति । परी विकाररूपें ॥४५॥
त्यांत घोरवृत्ती विकार । बोलिजताती सविस्तर ।
येणेंचि जनममरण वेरझार । जीवाची न चुके ॥४६॥
अमुक पदार्थ मज असावा । अप्राप्त तो प्राप्त व्हावा ।
दृष्ट श्रुत तो यत्नें साधावा । या इच्छा नांवी काम ॥४७॥
त्यासी प्रतिबंध जेणें केला । मग तो असो थोर धाकुला ।
परी तो वैरी वधीन पहिला । या नांव क्रोध ॥४८॥
प्रारब्धें प्राप्त जे जे विषय । यांचा कधीही न व्हावा क्षय ।
अति आवडीनें करी संचय । या नांव लोभ ॥४९॥
ऐसे हे काम क्रोध लोभ तिन्ही । जीवासी व्याघ्रचि अविद्यारानीं ।
बळें घोळसून जन्ममरणीं । कल्पांत बंधनीं घालिती कांहीं न सुचावें तो मोहो ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP