मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ९५१ ते १०००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९५१ ते १०००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


बहु संशय तो संदेहो । वचनें न मानी तो दुराग्रहो ।
निग्रह ही घोरवृत्ती ॥५१॥
दंभ तोचि जनीं दाखवावा । आपुला चांगुलपणा मद जाणवा ।
मत्सर द्वेष साभिमान घ्यावा । हेही घोरवृत्ति ॥५२॥
स्वजनाचा कळवळा ते प्रीति । क्रीडा विहार विषयासक्ति ।
नटनाट्यादि आवडती । हेही वृत्ति घोर ॥५३॥
कामना असूया तिरस्कार । फलाविषयीं बहु आदर ।
प्रपंचाविषयीं बहू सादर । हेही घोरवृत्ति ॥५४॥
भय लज्जा निंदा प्रयत्न । शोक साक्षेप कृतघ्न ।
आर्जव मैत्री बहुभाषण । हही घोर वृत्ति ॥५५॥
ऐसें कोठवरीं बोलावें । प्रपंचाचें लक्षण बरवें ।
दान कर्म धर्म हीं आवघे । राजोगुणीं घोरवृत्ति ॥५६॥
आतां तमोगुण तो निरर्थक । प्रपंच ना परमार्थ ना लौकिक ।
वृथामात्र आयुष्याचा घातक । मूढवृत्ति ॥५७॥
सदां आळस असावा । असावधता प्रमाद जाणावा ।
किंवा काळ निद्रेंत जावा । हे मूढवृत्ति ॥५८॥
सत्त्वगुणाची शांतवृत्ति । क्षमा तितिक्षा दया शांति ।
विरक्ति श्रद्धादि संपत्ति । शम दम प्रकार ॥५९॥
श्रवण मनन सारासार । मुमुक्षुता परमार्थ उद्गार ।
त्यागाचि करी सर्व संवसार । हेचि शांतवृत्ति ॥९६०॥
सदा सत्संग आवडे । सच्छास्त्राचें अति कोडें ।
सर्वभूती आत्मता जोडे । हेचि शांतवृत्ति ॥६१॥
ऐसें हे चिन्ह शांतवृत्तीचें । हेलावे उठती सत्त्वगुणाचे ।
परी ते दोनी उत्पन्न सुखाचे । नाश पावनां दुःख ॥६२॥
तयासी केवळ सुख न म्हणावें । सुखदुःख वृत्तीनें शीण पावे ।
तस्मात् हे विकार जाणावे । सत्त्ववृत्तीचे ॥६३॥
हे वृत्ति रज तमा निर्दाळी । पाडी परमार्थाचिये सुकाळीं ।
उद्भवतां मात्र होय वेगळी । निमतां मेळवी सुखा ॥६४॥
तस्मात् उद्भवतां होतसे विकार । यास्तव केवळ सुख नोव्हे
 निर्विकार । एवं घोर मूढ शांत प्रकार । तीन त्रिगुणांचे जोवरी उद्गार त्रिगुणांचे ।
घोर मूढ कीं शांतवृृत्तीचे । हे दायक असती सुखदुःखाचे ।
तों काल कैचें आत्मसुख या तिहीं वेगळी उदास वृत्ति ।
उगीच समान वृत्तीची स्थिति । त्रिगुणाचीहि नव्हेचि उत्पत्ति ।
सहजपणें स्तब्धता इंद्रियाविषयांचें विस्मरण । विवेकादिकांहि नातळे मन ।
आळसादि नसतां सावधान । हे उदासवृत्ति ॥६८॥
स्तब्धता परी जड नव्हे । सावध परी न हेलावे ।
उगेपणही न स्मरावें । हे उदासवृत्ति ॥६९॥
ऐसिया सामान्य वृत्तिमाजीं । निजात्म सुख प्रगटे सहजीं ।
ते काळीं अनुभवावया दुजी । वृत्ति नसे ॥९७०॥
सुखकार वृत्ति गोचर । अनुभवितसे तदाकार ।
तेथें हेचि मुख ऐसा उद्गार । तरी तया सुखा मुके ॥७१॥
तेथें सुखरूप होऊनि असावें । आठवूं जातां भिन्न पडावें ।
परी तें सामान्यवृत्ती अनुभवे । मौनेंचि अंतरीं ॥७२॥
पुढें वृत्ति उद्भवतां करी मनन । म्हणे काय होतों सुखसंपन्न ।
तया सुखांतून हेलावून । वृत्ति उमटे ॥७३॥
जीवनावरून वायु जातां । किंचित् दूर धांवे शीतळता ।
तेवीं उगेपणापासून निघता । वृत्ति सुखाकार निघे ॥७४॥
अन्यपदार्थ वृत्ति धरी । तेव्हां तें सुख हरपे निर्धारी ।
वायु तेवीं जातां बहू दुरी । शीतळता लोपे ॥७५॥
जरी तैशीच वृत्ति हेलावून । पुन्हां त्या सुखीं होय लीन ।
न अवलंबी पदार्थ आन । तरी तें सुख न लोपे । ॥७६॥
जरी वायू जळींच भ्रमे । तरी शीतळता न गमे ।
तेवीं वारंवार अनुक्रमें । वृत्ति उठे विरे सुखीं ॥७७॥
तरी सुख तें न ओहटे । तदाकारत्वें स्वयें भेटे ।
वृत्ति हेलावून पुन्हां आटे । तया मुखामाजीं ॥७८॥
परी हा अभ्यास पाहिजे केला । तरीच साधका जाय अनुभवला ।
तो अभ्यास पुढें असे बोलिला । तेणें रीतीं कळे ॥७९॥
असो जागृतीमाजी ही बुद्धिवृत्तीचा । उगेपणा होय जेव्हां साचा ।
तत्काळीं स्वात्मसुखाचा । अनुभव होय ॥९८०॥
जरी वृत्ति होय गुणाकार । तरी त्या सुखाचा पडे विसर ।
सुखदुःखें शिणे विकार । धरी अन्याचा ॥८१॥
रविदत्ता तूं ऐसें म्हणसी । कीं सुख होतसे शांतवृत्तीसी ।
परी नाश होय जेव्हां तयेसी । म्हणोनि विकारी ॥८२॥
तैशीच उदासवृत्ति ह स्वयमेव । तेथें स्वसुखाचा अनुभव ।
इचाही नाश होय सदैव । तरी त्यातें अंतर कोणतें ॥८३॥
उगेपणा जे उदासवृत्ति । आणि सत्त्वगुणाची शांतवृत्ति ।
उद्भव सुखाचा दोहींप्रती । आणि नाशही सारिखा ॥८४॥
तस्मात् तिशीं इशीं कोण अंतर । कल्पिसी ऐसा निर्धार ।
तरी पाहें पुरतें महदंतर । तया ययासी ॥।८५॥
सत्त्वगुणाची जे शांतवृत्ति विकारसुखें सुखी होती ।
अथवा विवेकें जरी सुखानुभूति । घेऊन मी सुखी भावी ॥८६॥
तें सुख मीं घेतलें । मींच मुखरूप ऐसें भाविलें ।
परी तें सुख नव्हे जें संचलें । अनुभाव्यरूप ॥८७॥
मानिलें तें क्षणभरी राहे । पुन्हां दुःखरूपता लाहे ।
तस्मात् शांतवृत्तींत सुख आहे । म्हणे कवणु ॥८८॥
तैशी नव्हे उदासवृत्ति । उगेपणें त्या सुखा अतौती ।
मिळोन जाय सहजगति । वेगळी न निघे ॥८९॥
मी सुखी आहे हा उद्गार । नाहींच नेघे अणुमात्र ।
परी मी असे तत्सुखाकार । हेंही नाहीं ॥९९०॥
क्षणभरी तरी स्थिर राहे । परी त्या सुखीं ऐक्यता लाहे ।
उठून जरी हेलावे पाहे । तरी विकार न घेतां मिळे ॥९१॥
उठतांही अन्य सुखाचा विकार । नेघे म्हणोनि निर्विकार ।
पुन्हां होता तत्दाकार । ऐक्यत्वा मिळे ॥९२॥
मागृति म्हणसी कीं विकार पावतां । तें सुख न जाय तत्त्वता ।
परी पाहें अंतरीं पुरता । तें न नासे वृत्ति नासे ॥९३॥
पहिलें सुख अखंड भरलें । वृत्ति सुखदुःखीं तरी संचलें ।
मात्र वृत्तिसीच सुखदुःख जालें । वेगळी पडली म्हणानी ॥९४॥
जेव्हां वृत्तीनें विकार सांडिला । तिहीं गुणाचा अभाव जाला ।
सहजगति उगेपणा उरला । तेव्हां मिळे त्या सुखीं ॥९५॥
क्षणभरीं सुखीं समरसली । तदाकारत्वा अनुभूति बोलिली ।
पुन्हां तेथोनि विकार पावली । तें सुख त्यागोनी ॥९६॥
म्हणोनि सुख वृत्तीचें हरपलें । परी निजसुख नाहीं उणें झालें ।
तें नासे तरी विकार जातां भेटलें । वृत्तिस सुख केवीं तस्मात् तें सुख असे निबिड ।
जें सुषुप्तीमाजीं निरोपिलें वाड ।
तेथेंच जागृतीमाजीं होतसे पवाड । उदासवृत्ति ॥९८॥
तैसें शांतवृत्तींत कोठें । वाउगी सुखाचि म्हणून उठे ।
परी तें मुख नव्हे मानिलें गोमटें । तेही आटे सुखदुःखें ॥९९॥
तस्मात् तिन्हीही वृत्ति त्यागून बुद्धिवृत्तीचें उगेपण ।
त्या उदासवृत्तीच्या भावें कडून । जागरी सुख भेटे ॥१०००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP