मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २७०१ ते २७५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २७०१ ते २७५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


मुख्य प्रत्यगात्मा ब्रह्म पूर्ण । सच्चिदानंद सघन ।
तेंचि निजांगें स्वयें आपण । अखंडैकरस ॥१॥
तेथें न होऊन माया उद्भवली । विद्या अविद्यात्मक नाथिली ।
तेचि बत्तिसां प्रकारें विभागली । ईशादि तृणांत ॥२॥
त्या बत्तिसांत प्रकार तीन । जड चंचळ तिसरें चेतन ।
परी तें मिथ्यारूप संपूर्ण । रज्जुसर्पापरी ॥३॥
स्थावरजंगमात्मक पांच खाणी । हें तो केवळ असती जडपणीं ।
चंचळामाजीही प्रकार तिनी । असती वेगळाले ॥४॥
प्राण आणि कर्मेंद्रिय । हें चंचळत्वें जडमय ।
ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धि द्वय । चंचळत्वें जाणती ॥५॥
परी जाणणें नव्हे मनबुद्धीचें । तें स्फोरकत्व प्रतिबिंब जीवाचें ।
म्हणोनि परप्रकाशत्व साचें । बुद्धयादिकां चंचळा ॥६॥
यया चंचळाचा तिजा प्रकार । वृत्तिरूप स्फूर्तिमात्र ।
ते निर्विकल्पत्वें जाहला विकार । परी ते जडरूप ॥७॥
विद्या अविद्या तया स्फुरणीं । जडरूप असती दोनी ।
जीवेशास्तव दिसती झळपणीं । चेतनत्वा ऐशी ॥८॥
परी ते स्फूर्ति ते परप्रकाशक । एवं चंचलाचा प्रकार एक ।
आतां तिसरें चेतन रूपक । जीवेश दोनी ॥९॥
हे जरी चेतनत्वें दिसती । परी यासी रूपचि नसे निश्चितीं ।
वाउगी मुख्य बिंबा ऐशी आकृति ।
भासली प्रतिबिंबा एवं चेतनहि जया नांव ।
तेहि परप्रकाशक ईश जीव । मा येर तो चंचळ जड स्वभाव ।
तथा सांगणें नको ॥१०॥
या रीतीं हे बत्तीस प्रकारें । प्रगटले असती हे सारे ।
ऐशियासी कोण म्हणे खरे । भ्रमावांचोनी ॥१२॥
जैसा प्रवाहीं वृक्षावरी बैसला । तो आपणातें असून विसरला ।
जळीं पाहत असे जो पडिला । आपणचि जैसा ॥१३॥
परी पडिला तो खरा असेना । खरा नाहीं तो कदा दिसेना ।
नसे तो प्रियही होईना । तीं प्रकारें वृक्षस्थ ॥१४॥
वृक्षस्थ बैसला जो आहे । तयामुळें पडिला दिसत आहे ।
म्यां न पडावें जें वाटताहे । हें वृक्षस्थामुळें ॥१५॥
तस्मात् आहे दिसे आणि प्रियकर तो एक वृक्षस्थचि साचार ।
येर जो पडिला तो भासमात्र । नसे न दिसे अप्रिय ॥१६॥
ऐशिया दृष्टांतासम । येक वास्तविक आत्मा ब्रह्म ।
येर हा बत्तीस तत्वांचा भ्रम । दिसे परी जाहला नाहीं ॥१७॥
तयाचे अस्तित्वें हे आहेती । तयाच्या भासे हे दिसती ।
तयाच्या प्रियास्तव प्रिय होती । उत्पत्तीकाळींही ॥१८॥
वेगळे सत्यत्वचि यासी नसतां । आहे असें म्हणावें केउता ।
तस्मात् वास्तविक यासी असत्यता ।
सप्रत्यय असे नाहीं ते कदा दिसतीना ।
तरी केवीं वर्तती सचेतनपणा । म्हणोनि जडरूपता संपूर्णा ।
असे अकृत्रिम ॥२७७०॥
क्षणां आवडती क्षणां विटती । तरी प्रियत्व कोठें ययाप्रती ।
आणि सदा सुखःदुखें शिणती । म्हणोनि दुःखरूप ॥२१॥
एवं असज्जड दुःखात्मक । हे अनात्मजात सकळिक ।
जरी जीवेश हे चेतनरूपक । परी समान सर्व ॥२२॥
ब्रह्मात्मा एक सच्चिदानंद । पूर्णपणें एक अभेद ।
या सर्वांमाजीही विषद । अस्ति भाति प्रियरूपें ॥२३॥
सर्वत्रीं असे आहेपणा । सर्वत्रीं ब्रह्मात्मा देखणा ।
सर्वीं प्रिय अकृत्रिमपणा । असे स्वतः सिद्ध ॥२४॥
याचा उत्पत्ति स्थिति संहार । पर तिहीं काळीं आत्मा निर्विकार ।
अथवा सुषुप्ति स्वप्न जागर ।
या तिहींमाजी अखंड पांचचि कोश सर्व तत्वांचे ।
पंचकोशात्मक देहत्रय साचे । देहत्रयीं नाम व्यापाराचें ।
जागर स्वप्न सुषुप्ति ॥२६॥
देहादि स्फूर्ति यया सर्वीं । रूपीं व्यापून चिन्मात्र गोसावी ।
इतुकीयाची वर्तणूक व्हावी ।
या गुणदोषींहि व्यापक एवं धर्म धर्मीरूप गुण ।
सर्वत्रीं व्यापला सच्चिद्घन ।
परी त्या त्या विकारा न स्पर्शीं आपण । परीपूर्ण जैसातैसा
तिहीं अवस्थेंत एकरूप । कधींच नव्हे अधिक अल्प ।
अवस्थाचि पालटती आपोआप । येक येतां दोनी जाती ॥२९॥
असो रूपीं अथवा गुणदोषीं । ब्रह्मात्मा येक निर्विशेषीं ।
व्यापकत्व असोनि अशेषीं । धर्मधर्मीं ऐसा नव्हे ॥२७३०॥
ऐसा असंग ब्रह्मात्मा पूर्ण । असोन कैसें जाहलें विस्मरण ।
व्यर्थ सर्व तादात्म्याचा अभिमान ।
घेऊनि बंधनीं पडे मी माझे आणि कर्ता भोक्ता ।
हे वाउगीच घेतली अहंता । पापपुण्य कल्पून योनी अनंता ।
भ्रमें जन्मे मरे ॥३२॥
जरी ऐसें अज्ञानेकडून । जीव भोगी जन्ममरण ।
परी ब्रह्मात्मा जो सच्चिद्घन । निर्विकारत्वें सदा ॥३३॥
ऐसा वाउगाच नसोनि बंधनीं । पडिला जीव अभिमान घेऊनी ।
हा भ्रम जाईल जेव्हां निपटूनी ।
तेव्हांचि मोक्ष ऐसा बंधमोक्षाचा निश्चितार्थ ।
मज बाणविला कृपायुक्त । परी मी मंदप्रज्ञ असे जो सिद्धांत ।
निश्चय बाणेना कारण कीं ब्रह्मात्मा जो असंग ।
सर्वांहून विलक्षण अंग । प्रतीतीस आला नाहीं अभंग ।
स्फूर्तिअभावीं कैसा ॥३६॥
माया विद्या अविद्यात्मक स्फूर्ती । मावळतां असे जो सच्चिन्मूर्ती ।
तो स्वानुभवें अपरोक्ष रीती । कैसा तो निश्चय नव्हे ॥३७॥
तो ब्रह्मात्मा तरी आपण । येर हीं अनात्मजात तत्त्वें संपूर्ण ।
येविशीं कांही नसे अनुमान ।
परी सर्वांतीत कैसा न कळे स्फूर्तिपासून ऐलीकडे ।
ज्या ज्या रीतीं स्वानुभवें आतुडे । तें निवेदूं गुरुचरणापुढें ।
यथामति कळलें तें ॥३९॥
सर्वांमाजी जो आहेपणा । स्वतःसिद्ध असे पूर्णपणा ।
त्यावीण या सर्वांसी असेना । रूपचि कांहीं ॥२७४०॥
सर्प नाहीं अतर्बाह्य दोरी । तैसा सर्वी ब्रह्मात्मा निर्विकारी ।
सर्व नाहींतचि व्यर्थ भासली सारीं । भ्रमेंकडोनी ॥४१॥
आहे ते अंतर्बाह्य सघन । सद्रूप ब्रह्मचि परिपूर्ण ।
तिहीं अवस्थेंतही येकपण । भेदावेना ॥४२॥
ऐशी सद्रूपाची प्रतीति । गुरुकृपें बाणली निश्चतीं ।
चिद्रूप अनुभविले तें यथामती । निवेदूं चरणी ॥४३॥
जागृतीचे पंचव्यापार । शब्दस्पर्शादि विकार ।
ते शब्द स्पर्श सांडून दूर । ज्ञान एक निवडिलें ॥४४॥
तेंचि ज्ञान स्वप्नंकाळीं । अविच्छिन्नभास विषयमेळीं ।
तया ज्ञानासी विकार समूळीं । सहसा असेना ॥४५॥
तेंचि सुषुप्तिकाळीं नेणिवेंत । नेणपणासी अवलोकित ।
हा प्रत्यय उत्थानकाळीं येत । सामान्यत्वाचा ॥४६॥
गुण विकाररहित उगेपणीं । ज्ञान प्रत्यय येतें स्फुरणीं ।
परी स्फुरण जातां मावळूनी । शून्यदशा होय ॥४७॥
दृश्यामाजीं दृश्याचा देखता । तो द्रष्टा अनुभविला दृश्यापरता ।
भासामाजील भासाचा जाणता । भासातीत साक्षी ॥४८॥
एवं चिद्रूपस्फुरण उद्भवतां कळे । परी स्फुरण जेधवां मावळे ।
ते वेळीं लया साक्षी न कळे । तळमळ यास्तव ॥४९॥
आणीकही येक संशय थोर । स्फूर्तिकाळीं जे ज्ञान साचार ।
तें ज्ञान आणि जीवविकार । कालवले वाटे ॥२७५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP