मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १७०१ ते १७५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १७०१ ते १७५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


परी शब्द असे ध्वनिरूपी ।
म्हणूनियां अशब्द चिद्रूपीं । तया असाम्यता गगना ॥१॥
एवं भूतें भौतिकें ही साकार । आकाशादि तृणांत समग्र ।
हा एक जिन्नस जड प्रकार । याहून भिन्न चिद्रूप ॥२॥
दुसरा जिन्नस जडचि असोनी । वाहणें असे चंचळपणीं ।
ऐसिये प्राणाचिये रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥३॥
परप्रकाशें जाणों लागती । हा तिसरा जिन्नस विशेष विकृति । ययाहूनीही आत्मा चिन्मूर्ती ।
भिन्न असे सहज मूळ स्फूर्ति चौथा जिन्नस । जो कां हेतु सर्व विकारास ।
तयाच्याही रूपाहून निराभास । चित्प्रभा वेगळी ॥५॥
प्रतिबिंबाचा प्रकार असे पांचवा । चित्तासारिखा आभास जाणावा । परी मुख्य चिद्रूपता स्वयमेवा ।
भिन्न ययाहुनी एवं मिथ्याभूत
जिन्नस पांचही । उद्भवले परी जाहलेचि नाहीं । इतुकेही विकारजात सर्वही ।
या विलक्षण चिद्रूप पंचभूतें चारी खाणी ।
पांचवी ते मानसिकयोनी । एवं हे दहा प्रकार मिळोनी ।
जिन्नस पहिला जडरूप ॥८॥
पंचप्राण कर्मेंद्रिय । हा दुसरा जिन्नस समुदाय ।
हा चंचळ असोनी जडमय । प्रकारें दाही ॥९॥
मन बुद्धि ज्ञानेंद्रियपंचक । परप्रकाशें जाणती सकळीक ।
हा तिसरा असे एक । सप्त प्रकारें ॥१७१०॥
चौथा जिन्नस मूळस्फूर्ति । माया अविद्या विद्या म्हणती ।
तयांसीच नाम आवरणादि शक्ति । परी प्रकार तीन एवं चार जिन्नस
वेगळाले । पांचवें चित्प्रतिबिंब पडिलें । तयाचे दोनचि रूपें उमटले । जीव आणि ईश ॥१२॥
एवं पांच जिन्नस सर्वे । पांचांचे बत्तीस होत अघवे ।
वेगळालीं रूपें आणि नांवें । ईशादि तृणांत ॥१३॥
जडरूप जो पहिला जिन्नस । द्रव्यशक्ति नाम तयास ।
दुसरिया जिन्नसानी यास । क्रियाशक्ति बोलिजे ॥१४॥
तिसरा जिन्नस ज्ञानशक्ति । चौथी स्फूर्ति आदिशक्ति ।
तयेशीच ह्मणावी इच्छाशक्ति । बीजरूप सर्वां ॥१५॥
पांचवा जिन्नस चिदाभास । शक्ति जयाच्या तो शक्त जीवेश ।
असो ऐसे हे पांच जिन्नस । बत्तीस नामरूपें ॥१६॥
पूर्व दृष्टांतीं स्मरावें । सजल घट सान थोर सर्वे ।
तैसेचि ब्रह्मादि कीटकांत आघवे । आणि महा भूतें जेवीं ॥१७॥
जल तैसे देह सूक्ष्म । ब्रह्मादि कीटकांत सम ।
या सर्व समष्टीसी असे नाम । वाउगें हिरण्यगर्भ ॥१८॥
या सूक्ष्माचे प्रकार तीन । प्राण आणि मन विज्ञान ।
चंचळ द्रव झळझळपण । जेवीं पाणी ॥१९॥
तीन कोश परी दोन शक्ति । ज्ञानक्रिया सूक्ष्मीं असती ।
घटीं जलें जैशीं सांठवती तेवीं सान थोर देहीं ॥१७२०॥
पाझर तैसें मूळ स्फुरण । जें चौथें जिनसाचें लक्षण ।
पांचवें ते जीवेशान । जलाकाशापरी ॥२१॥
एवं घट मठ पिंड ब्रह्मांड । हे स्थावर जंगमादि जड ।
या विलक्षण कीं आत्मा गगनवाड । प्रत्ययें पहावें ॥२२॥
सूक्ष्म देह वेगळाले । सान थोर पिंडी सांठवले ।
त्यांहून चिद्रूप प्रत्यया आले । जलाहून जेवीं गगन ॥२३॥
मूळ स्फूर्ति कारण सर्वांसी । जे पाणियाचे उद्भवाऐसी ।
तया साम्यता कवणे काळेंसी । चिदाकाशा न घडे ॥२४॥
हें असो प्रतिबिंब पडिलें । जलाकाशासम जीवेश उमटले ।
तें चिदाभासत्व न जाय उपमिलें । चिदाकाशाशीं ॥२५॥
एवं जीवेश मूळ स्फूर्ति । आनंदमयता इतुक्याप्रति ।
मन बुद्धि प्राण इंद्रिया ह्मणती । त्रिकोशात्मक सूक्ष्म ॥२६॥
स्थूलदेह तो अन्नमय । पंचकोश प्रकारें ऐशिये ।
जो पांच जिन्नसांचा समुदाय । बत्तीस प्रकार ॥२७॥
या बत्तिसां परता पदार्थ असेना । जरी नामें असतीं अनेकधा नाना ।
इतुक्यांचेही रूपाहूनि भिन्ना । चित्प्रभा वेगळी चित्प्रभा एक उपलक्षण ।
परी सच्चिदानंद ब्रह्मात्मा सघन । यया बत्तिसांहून विलक्षण । जेवीं गगन सजल घटा ॥२९॥
वेदांतशास्त्रीं जे पदार्थ दोन । एक सत्य एक मिथ्या संपूर्ण ।
मिथ्या तेचि बत्तीस भिन्नभिन्न । सत्य तो ब्रह्मात्मा ॥१७३०॥
ऐसे हे दोन्ही निवडिले । दृष्टांतासहित स्पष्ट केले ।
आत्त्मस्वरूप तें भिन्न संचलें । येर बत्तिसांहुनी ॥३१॥
ज्या रीतीं सजल सप्रतिबिंबाचा । दृष्टांत दिधला घटाचा ।
येणेंचि पाडें बोलिजेत वाचा । बहुधा दृष्टांत ॥३२॥
नदींत बैसला वृक्षावरी । तैसा ब्रह्मात्मा निर्विकारी ।
मूळ स्फूर्तीपासून बत्तीस रूपें सारीं । प्रवाहीं पडलिया ऐशीं  ब्रह्मात्मा जैसा सागर ।
बत्तीस रूपें तरंगाकार । ब्रह्मात्मा जेवीं गगन स्थिर । मेघादि सम बत्तीस ॥३४॥
आत्मा ब्रह्म जेवीं दोरी । सर्पाऐशीं बत्तिसें सारीं ।
स्थाणु समान वस्तु निर्विकारी । पुरुषासम बत्तीस ॥३५॥
ब्रह्मात्मा सघन जेवीं शिंप । रजतापरी बत्तिसासीं रूप ।
मृगजलवत सर्वांसी जल्प । सहस्रकर ब्रह्मात्मा ॥३६॥
सत्य मिथ्या कळावया उद्योगें । दृष्टांत देणें लगती प्रसंगें ।
येऱ्हवीं कोणतें निर्विकाराजोगें । बोलूं ये वाचे ॥३७॥
तस्मात् कोणेही रीतीं समजावें । मिथ्या तें मिथ्यात्वें त्यागावें ।
सत्य तें सत्य निश्चया आणावें । मुमुक्षें अंतरीं ॥३८॥
पाहें रविदत्ता सावधान । सर्व सारांश आला ओलांडून ।
सत्समिथ्या गेलें निवडून । हातींच्या आंवळ्यापरी ॥३९॥
ईशादि तृणांत हे बत्तीस । वाउगाचि भासला भास ।
या सर्वां विलक्षण निराभास । आत्मा ब्रह्म चिद्रूप ॥१७४०॥
यया बत्तिसांमाजी असोनी । विलक्षण ब्रह्मात्मा पूर्णपणीं ।
हे बत्तीस स्वस्वविकार पावोनी । आपेआप नासती ॥४१॥
हे उद्भवतां तया निर्विकारा । विकार करूं न शकती निर्धारा ।
लय पावतां तो ब्रह्म चिन्मात्रा ।
विकार कल्पी कोण असो सर्वांचे रूपाहूनी । आत्मा ब्रह्म पूर्णपणीं ।
मा बत्तिसाचे व्यापारालागोनी । आतळे कैसा ॥४३॥
अमुक अमुक तत्त्वें मिळतां । व्यापार होतसे कर्मापुरता ।
तया गुणदोषात्मकाची वार्ता । ब्रह्मात्मया केवी ॥४४॥
तथापि अज्ञान जनीं मानिली । तरी ही आत्मत्वीं नाहीं स्पर्शिली ।
वाउगीच स्वतां जाऊन पडली ।
जन्ममरणप्रवाहीं तेचि गुणदोष जीवें कल्पिलें ।
जे गत श्र्लोकीं निरोपिलें । तेचि मागुति पाहिजे बोलिले ।
मीपण त्यागावया ॥४६॥
जैसा आत्मा सर्व रूपाहूंन । सहजीं सहज परिपूर्ण ।
तैसाचि गुणदोषा विलक्षण । सहज परी बोलिजे ॥४७॥
गुणदोषाभ्यांकेवलचिति विविक्ता गुणदोषाहुंनी केवल चिति ।
वेगळाचि असे सहजगति ं बत्तीस जरी विकारा पावती ।
तरी ते निर्विकार ॥४८॥
येथेंही रविदत्ता सावधान । हें निष्कर्षाचें असे निरोपण ।
गुणदोषांहून विवेचन । होय आत्मरूपाचें ॥४९॥
गुणदोष म्हणजे व्यर्थ कल्पना । अज्ञानें माथां घे मीपणा ।
सहजीं होताती व्यापार नाना । ते ते आपणा मानीत तो मीपणा जरी न मानितां ॥१७५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP