मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २७५१ ते २८००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २७५१ ते २८००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


येर हे बुद्ध्य़ादिक वृत्ति । इंद्रियद्वारा विषय घेती ।
अथवा निर्विकल्प जे स्फूर्ती । परप्रकाशकत्वें ॥५१॥
ऐशिया वृत्तिविरहित । जें का चिद्रूप असें व्याप्त ।
तें अनुभवा ये टळटळित । साक्षी रूप जाणतां ॥५२॥
परी जीवाचेंही जाणतेपण । प्रतिबिंबित मिथ्या असून ।
शुद्ध ज्ञानामाजी असे मिळून । तें निवडितां न ये ॥५३॥
एवं चिद्रूपाचें कळणें ऐसें । अनुभविलें तें निवेदिलेंसें ।
आतां आनंदरूपही कळलें जैसें । तैसें निवेदूं ॥५४॥
देह प्राण इंद्रिय मन । अथवा द्वेषादि सर्व जन ।
आत्मा आवडता यां सर्वांहून । प्रतीति असे ॥५५॥
येरांची आवडी क्षण क्षण । उठे विटत असे म्हणून ।
हे प्रियचि न होती संपूर्ण । खरा आवडता आत्मा ॥५६॥
सुषुप्तिमाजी तो सर्वांचा लय । होतां सुखदुःखाचा क्षय ।
येक सुखरूपचि अद्वय । असे निजात्मा ॥५७॥
उगेपणींही सामान्य वृत्तीसी । सुखाकरिता वाटे कांहीशी ।
परी सर्वां विलक्षण सुखैकराशी । अनुभवा न ये ॥५८॥
एवं सच्चिदानंद आत्मा पूर्ण । यथामति होय जो वेदन ।
तो श्रीगुरुचरणीं केला निवेदन ।
आणीक विनंती येक हे सर्व असज्जड दुःखात्मक ।
बत्तीस तत्त्वें सर्व मायीक । उत्पन्नचि नसतां कांहीं येक ।
मावळती तरी काय ॥६०॥
रज्जूवरी सर्प नसतां । दवडावा वधावा केउता ।
तैसा लयचि व्हावा समस्तां । इच्छी कवण ॥६१॥
जेवीं असती तेवीं पूर्व रीतीं । असेनात कां सहजगती ।
अथवा स्वस्वव्यापारीं प्रवर्तती । तरीही संशय असेना ॥६२॥
परी आपुलें असंगत्व पूर्ण । क्षणांक्षणां त्यांचें विस्मरण ।
या मिथ्यासीच होतसे मीपण । आपण ते नसतांही ॥६३॥
जेधवां मीपण देहादिकाचें । तेधवां विस्मरण असंगाचें ।
जेधवा विस्मरण आत्मयाचें । तेंव्हा मी म्हणे देहा ॥६४॥
एवं मीपणा जो देहादिकांचा । तेव्हांचि घात पूर्णत्वाचा ।
हा विक्षेप निपटून जाईल साचा ।
ऐसें केलें पाहिजे ऐशी प्रार्थना करूनि रविदत्त ।
साष्टांग नमून प्रदक्षणा करित ।
हे जाणोनि आचार्यें त्वरिता उचलोनी आलंगिला बापा तुला सर्व आशय ।
कळला कोणकोणता तो संशय । आणि बाणला जो जो प्रत्यय ।
तोही विदित झाला ॥
जे जे तुला संशय असती । ते ते अनुक्रमें फेडूं भ्रांति ।
आणि तुजला तुझी स्वात्मप्रताति । यथार्थ बाणवूं ॥६८॥
आतां निरूपणीं चित्त द्यावें । आणि सांगू तैसें अभ्यासावें ।
तरी तुझें तुजसी बाणवावें । निःसंशय समाधान ॥६९॥
प्रथम तुजला आत्मा जीव । येकचि वाटला उभय स्वभाव ।
स्फूर्ति जीवाची आणि स्वयमेव ।
चिद्रूपता येकवटली ते आधीं देऊं निवडून ।
सत्य मिथ्या ह भिन्न भिन्न । पुढें आणीकही तुझे प्रश्र्न ।
साकल्य निरोपूं ॥७१॥
आतां सावधान सावधान । बहु तत्पर ऐके निरूपण ।
ऐसें ऐकतां रविदत्त आपण बद्धांजलि बैसला ॥७२॥
येथें रविदत्ताचिये पांतीं । सावध असावें श्रवणार्थी श्रोतीं ।
आचार्य ओळले कृपामूर्ति । भाग्यार्थ मुमुक्षूच्या ॥७३॥

मुक्तासुमत्तुत्रवद्विद्विविकल्पोषुचितिस्तथा ॥९॥
मुक्ताभिरावृतंसूत्रंमूक्तयोर्मध्यईक्षते ॥
तथावृत्तिविकल्पौश्चित्स्पष्टामध्यविकल्पयोः ॥१०॥

जैशी मुक्ताफळांची माला । माजीं तंतु असे गोविला ।
तैसा बुद्धिविकल्पामध्यें संचला । सामान्य चित्प्रकाश ॥७४॥
मुक्तें सूत्र जेवीं आच्छादत । तेवीं चिद्रूप विकल्पीं गुप्त ।
मोतीं सारितां सूत्र दिसत ।
तेवीं विकल्पामध्यें चिद्रूप मोतीं एक उपलक्षण ।
परी मणिजात संपूर्ण । अंतरी सूत्र ते अविच्छिन्न । येकचि असे ॥७६॥
परी येकेक मणि ठेलून बैसतां । माजील सूत्र न दिसे वरुतां ।
तोचि मणि मागें पुढें सारितां । मध्य संधीसी तंतु दिसे ॥७७॥
तैसा ब्रह्म आत्मा सर्वों व्यापक । अनंत अपरिमित एक ।
सूत्रा ऐसा दृष्टांत कौतुक । दिधला असे ॥७८॥
मणी बहु अनेकापरी । परी सूत्र एकचि निर्धारी ।
ब्रह्मात्मा सर्व तत्त्वांमाझारीं । एकचि अनुस्युत ॥७९॥
ब्रह्मात्मा तो पहिलाचि संचला । आकाशवत् व्यापक कोंदला ।
बुद्धि वृत्तीपासून उठती । इंद्रियद्वारा विषयीं आदळती ।
तेथून येथवरि चंचळ गति । परी समाप्ति तत्क्षणीं ॥८०॥
इकडे तो समाप्ति तत्क्षणीं जाहली । परी दुसरी कल्पना ठेपून आली ।
ते आदळून जरी मावळली । तरी तिसरी सिद्ध ॥८१॥
ऐसे विकल्प बुद्धीवृत्तीचे ।
येका संलग्न येक उठती म्हणोनि मणि जैसे ठेपिले माळेचे ।
तैसे विकल्पासी  विकल्प परी मणि असे एकदेशी ।
विकल्प बुद्धीपासून उठतां वेगेशी ।
विषयांत आदळतां जाऊन त्यासी समानता न घडे परंतु मणि जैसे बहुत असोनि ।
येकमेकां राहिले ठेपोनी ।
तैसें विकल्प येकमेकां लागोनी । संधीविण मिळाले म्हणोनि मुक्तें दृष्टांतासी ।
दिधलीं असतीं चमत्कारासी । परी तो तंतु आणि मणी यासी ।
साहित्य कैचें ॥८५॥
तंतु आंतचि राहिला । आत्मा तो अंतर्बाह्य संचला ।
परी एक म्हणून दृष्टांत दिधला । येरव्हीं साम्य कैचें ॥८६॥
मणीही तैसेच साकार । संकल्प तो आकारेंवीण उद्गार ।
परी दृष्टांत दिधला येकत्र । मिनले मणिया ऐसे ॥८७॥
आणिकहि येक असे कारण । सूत्रातें मणि करिती आच्छादन ।
तैसें विकल्पाचें जाळें मिळून ।
चिद्रूप आच्छादिलें यास्तव दृष्टांतासी दिधलें ।
म्हणून साम्य न पाहिजे कल्पिलें । चिद्रूप सूत्रा ऐसें नाहीं वळलें ।
कीं मुक्ता ऐसे विकल्प असती ॥८९॥
कोणी मानील शंकाकार । कीं साम्य दृष्टांत काय नसती येर ।
परी दृष्टांताच्चा चमत्कार । असे तो बोलूं ॥२७९०॥
मुक्तमाळा असे स्वाधीन । मणि सारितां ये स्वकरेंकडून ।
तंतु दिसतसे संधी मधून । स्पष्ट अपरोक्ष ॥९१॥
तैसे विकल्प रोधितां यती । तेव्हां स्पष्ट चिद्रूप ये प्रतीति ।
येर दृष्टांत बहु असती । परी पराधीन ॥९२॥
तेही साम्य जे दृष्टांत । बोलिजेती सावचित्त ।
आणि ते पराधीनही असत तेंही कळेल ॥९३॥
आकाश एक परिपूर्ण सघन । तैसा आत्मा चिद्रूप आपण ।
तया आकाशा बहु मेघ मिळून । आच्छादिती पाणी ॥९५॥
पाणी अथवा गगनासी । सर्व साम्यता घडे आत्मयासी ।
व्यापकत्व आणि निराकारासी । साहित्य पडे ॥९६॥
परी एका पराधीनत्वामुळें । दृष्टांतासी नाहीं योजिलें ।
कीं मेघ अथवा तरंग जाळें । स्वतां सारितां न येती ॥९७॥
विकल्प रोधन पाहूं येती । मध्यें चिद्रूप येतसे प्रतीती ।
मणि जैसें करें चाळिती । जेव्हां टळटळीत सूत्र ॥९८॥
इतुकिया हेतू मुक्ताफळांचा । दृष्टांत दिधला असे साचा ।
कीं साधकें अभ्यास विकल्पाचा । रोध करोनी पहावें ॥९९॥
सर्व साम्य जरी पहाणें । तरी आकाशाचा दृष्टांत घेणें ।
विकल्पाचा जरी रोध करणें । तरी स्वीकार मुक्तांचा ॥२८००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP