सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २१५१ ते २२००
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
बत्तीस तत्त्वात्मक पंचकोश । तेचि हे देहत्रय अशेष ।
अन्नमय तो स्थूल विशेष । साकार पंचीकृताचा ॥५१॥
प्राण मन विज्ञान तिन्ही । असती सूक्ष्म देहालागुनी ।
सप्तदश तत्त्वें स्थूलीं राहूनी । व्यापार करिती ॥५२॥
आनंदमय तोचि कारण । या देहत्रयाचें उत्पत्तिस्थान ।
एवं देहत्रय जीवालागून । उपाधि असे ॥५३॥
या देहत्रयाचे दोषगुण । व्यापार होताती भिन्न भिन्न ।
तोचि जागृदादि अवस्था तीन । विहार जीवाचे ॥५४॥
स्थूललिंगाचिये आधारें । क्रिया होतसे विषयानुकारें ।
तेचि जागृति पंच व्यापारें । जे स्थूल चाले बोले ॥५५॥
येऱ्हवीं पाहतां या जडासी । अवस्था असे तरी कायसी ।
सूक्ष्मास्तव चळणें देहासी । म्हणोनी बोलिली ॥५६॥
जागृति स्वप्न किंवा सुषुप्ति । या तिन्ही अवस्था बुद्धीप्रती ।
परी स्थूल वावरे ते जागृती । स्थूलाची बोलावी ॥५७॥
बुद्धि मन हें अंतःकरण । पंचप्राणें पावें चळण ।
पांच ज्ञानेंद्रियद्वारा निघोन । शब्दादि विषय घेती ॥५८॥
तेवींच कर्मेंद्रियसहवासें । वचन गमनादि क्रिया होतसे ।
एवं दशधा व्यापारा नाम आलेसें । जागृति ऐशी ॥५९॥
या जागृतीसी नेत्रस्थान । बोलिलें हें एक उपलक्षण ।
परी सर्वांगीं असे वर्तन । श्रोत्रादि द्वारा ॥२१६०॥
श्रवणीं ऐकावें नेत्रें पहावें । जिव्हा रस सेवी घ्राणी हुंगावें ।
त्वचीं स्पर्शावें वाणीनें बोलावें । शब्दमातृकांसी ॥६१॥
पहिला आठव ते परा वाचा । दुजा आभास ते पश्यंति साचा ।
तिसरा भाव जो मननाचा । ती मध्यमा वाणी पुढें वैखरी तें बोलणें ।
मातृकांचा उच्चार करणें । एवं सर्वांगें जागृतीचीं स्थानें ।
घेणें देणेंही कराचें ॥६३॥
पादांचें गमन उपस्थेंद्रिया । रतिसुख भोगाची घडे क्रिया ।
गुदीं विसर्ग जो होणें यया ।
जागृतिस्थान म्हणावें असो सर्वांगें देह वर्तता ।
जागृति अवस्था हे तत्त्वता । इतुकाही बहिर्व्यापार त्यागितां ।
तेचि अवस्था स्वप्न ॥६५॥
नुसधें मन बुद्धि हें अंतःकरण । इंद्रिय प्रत्यक्ष विषयावांचून ।
अंतरींच वर्ते ध्यास घेऊन ।
इंद्रिय विषयादिकांचे नेत्र झांकुन मनन करी ।
अथवा अन्यथा पाहे झोंपेमाझारीं । स्वप्नचि बोलिजे दोहीं परी ।
आंतिचा आंतु क्रीडे मनन तें कंठगत उद्भवे ।
यास्तव कंठस्थान स्वप्नासी म्हणावें । एवं स्वप्न अवस्थेसी जाणावें ।
सूक्ष्मदेहाचें ॥६८॥
हेचि बुद्धि मन लीन होती । श्रम पाऊन निचेष्टित पडती ।
उगीच सुखाकार जे स्थिति । ते सुषुप्ति अवस्था ॥६९॥
गाढ झोंप किंवा उगेपणा । परी ते सुषुप्ति अवस्थेची लक्षणा ।
देहद्वयाचिया अवसाना ।
नेणीव स्फूर्ति उरे जे नेणीव तेचि अविद्या अज्ञान ।
तोचि डोहो हृदयस्थान । एवं सुषुप्तीचें केलें लक्षण ।
स्थानासहित ॥७१॥
यापरी जागृति स्वप्न सुषुप्ति । अवस्था बुद्धीच्या सहजगति ।
परी बोलाव्या तिहीं देहाप्रती । व्यापारभेदें ॥७२॥
या तिहीं अवस्थांचे तीन । नेत्र कंठ हृदय स्थान ।
आतां बोलिजे तिहीं लागून । प्रणव त्रिप्रकारें ॥७३॥
स्थूलदेह जागृति स्थान नेत्र । हा साकार दृश्य समग्र ।
हेचि मात्रा म्हणावी अकार । पहिली प्रणवाची ॥७४॥
सूक्ष्मदेह स्वप्नअवस्था । कंठस्थानीं मनन संस्था ।
हेचि उकार मात्राव्यवस्था । दुजी प्रणवाची ॥७५॥
नेणीव कारण अवस्था सुषुप्ति । हृदयस्थान जें तयेप्रति ।
हेचि मकार मात्रा निश्चिती ं तिजी प्रणवाची ॥७६॥
या तिहीं अवस्थांचे अभिमान । एक मीपणा परी असती तीन ।
तया तिहींचें भिन्न भिन्न लक्षण । बोलिजे ऐकावें स्वस्वरूपाचें अज्ञान ।
स्वयें न कळे असंग आपण । परी अहंब्रह्मास्मि जें स्फुरण ।
तेणें देखिलें देहादिकां ॥७८॥
तेव्हां मी देहचि दृढ धरिलें । ते ते धर्मही आपणासीच कल्पिले ।
ऐसे अनंत कल्प जरी गेले ।
तरी क्षीण नोव्हे जो जो जे क्षणीं देह प्राप्त ।
तो मी म्हणून सदृढ धरित । तो त्यागिला जरी अकस्मात ।
परी मीपण न त्यागी आधीं दुजिया देहातें धरी ।
मग प्रस्तुत देहाचा त्याग करी । ऐसे अनंत जन्म जातां निर्धारी ।
न त्यागी हा मीपणा तोचि एक देहीं तीन अवस्थांसी ।
धरोनि बैसला तिहीं देहांसी । जागृति या साकारासी ।
सदृढ धरिलें ॥८२॥
हाचि मी आणि हें हें माझें । हें किंचितही न त्यागी ओझें ।
हाचि विश्र्वाभिमानी बुझे । नाम पावला ॥८३॥
मी पाहतों ऐकतों बोलतों । मी खातों पितों स्पर्शतों ।
चालतों भोगितों सुखी होतों । मीच जागेपणें ॥८४॥
ऐसा मीपणा सर्व शरीराचा । प्रत्यक्ष घेऊन बैसला साचा ।
तैसाचि साभिमान माझेपणाचा । आमरण न सोडी ॥८५॥
हें म्यां किती प्रयत्नें मिळविलें । हें वडिलीं संपादिलें ।
ऐसिया पदार्थमात्र म्हणे आपुले । स्त्रीपुत्रादिकां ॥८६॥
एवं ऐसें जें मी माझेपण । हाचि जागृति विश्र्वाभिमान ।
यासीच साधकें त्यागावें विचारून । अत्यागें मोक्ष कैंचा ॥८७॥
हाच स्वप्नींही भास देहासी । मी म्हणून बैसला अपेशी ।
परी तैजस नाम आलें तयासी । तये समयीं ॥८८॥
उगें बैसताही मनना आंत । म्यां हें केलें करीन अद्भूत ।
पूर्वी केलें तें असें भोगित । आतांचें भोगीन पुढें ॥८९॥
ऐसा ध्यास कर्तेपणाचा । विषयाभावीं मननात्मकाचा ।
तोचि ध्यास झोंपेंत साचा । घेणें हा तैजस ॥२१९०॥
एवं ध्यासकाळीं कीं उगेपणीं । कर्तृत्व कीं भोक्तृत्व ध्यानीं ।
हे तैजस अभिमानाची करणी । बंधनरूप जीवा ॥९१॥
हें असो विश्र्व तैजस । साभिमानिया देहद्वयास ।
परी कारणरूप या उभय यांस । तो प्राज्ञ अभिमानी ॥९२॥
गाढ झोंपेंत कीं उगेपणा आंत । मी नेणता असे सदोदीत ।
हाचि प्राज्ञ अभिमानी निश्चित । कारणशरीरीं ॥९३॥
हे नेणतपण जोंवरी न फिटे । तों कालज्ञानें केवी आत्मा भेटे ।
भवसागर हा कैसा आटे । केंवीं तुटे बंधन ॥९४॥
असो ऐसा एकचि अभिमान । अवस्थाभेदें जाहला भिन्न ।
तयाचें सांगितलें लक्षण । आतां भोग तीन अवधारा ॥९५॥
प्रत्यक्ष देहासी प्रत्यक्ष विषय । दृश्याकारें भोग्य जरी होय ।
तरीच भोगिले ऐसा प्रत्यय । हा स्थूल भोग स्थूलासी ॥९६॥
मनें आठवून भासती । अंतरींच सुखदुःखें उमटती ।
हा प्रविविक्त भोग तैजसाप्रति । भासरूपें होतसे ॥९७॥
विकारजात सर्व निमावें । उगेंचि सहज सुखी असावें ।
हेंचि वास्तविक रूप जाणावें । आनंदभोगाचें ॥९८॥
सत्वगुणें जागृति होतसे । कारण कीं सर्व जाणतेपणा असे ।
स्वप्नीं कांहीं जाणीव कांही नेणीव दिसे । म्हणून रजोगुण ॥९९॥
हा अवस्थेचा असे प्रकार । परी रजोगुणाचें स्थूल शरीर ।
तैजस विष्णु साचार । पालनधर्मी सत्वगुण ॥२२००॥
N/A
References : N/A
Last Updated : October 20, 2010
TOP