मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १००१ ते १०५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १००१ ते १०५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


हें जागर सुप्तीचें मध्यस्थान । गाढ झोंप ना नव्हे जागरण ।
ते समयीं वासनेसी अविर्भवणें । निजात्मसुख ॥१॥
तयासी म्हणावे वासनानंद । गाढ सुप्तींत ब्रह्मानंद ।
हे उभय सांगितलें विशद । दोहीं ठायीं ॥२॥
जागें असतांही उगेपणाचा । भाव जो कां असे साचा ।
तोचि ठाव मध्य स्थानाचा । उभयां भेद नाहीं ॥३॥
आरंभी झोंपेचे जागर नसतां । सुख अविर्भवे तत्त्वतां ।
पुढें गाढ झोंप जेव्हां लागतां । केवळ ब्रह्मानंद उरे ॥४॥
म्हणोनि वासनेचा परिणाम । तो ब्रह्मानंदचि परम ।
तैसा कोठें म्हणसी आराम । जागरीं उगेपणा ॥५॥
तरी अभ्यासें उदासवृत्ति । चिरकाळ राहे स्थिरत्व गति ।
तरी लीनत्त्वें जें सुख सुप्तीं । तेंच होय येथें ॥६॥
तस्मात् परिणाम उदासवृत्तीचा । ब्रह्मानंदचि असे साचा ।
येथें भेदभाव कल्पनेचा । सहासा न करावा ॥७॥
येथेंही तू शंका करिसी । कीं जैसा परिणाम उदासवृत्तीसी ।
तैसाचि भाव शांतवृत्तीसी । कां न म्हणावा ॥८॥
शांतवृत्तीचा ब्रह्मानंद । परिणाम नव्हे परि विशद ।
उदासवृत्ति होऊन पुढें शुद्ध । मुख्य निजसुख उरे ॥९॥
तरी हे परंपरेने सुखातें पावे । यासी नाहीं म्हणे कोण बरवें ।
परी मुख्य ब्रह्मानंद तो नव्हे । परिणाम शांतवृत्तीचा ॥१०॥
ऐसाचि परंपराद्वारा । घोरवृत्तीसी होय थारा ।
मा शांतवृत्तीसी तो खरा । विवेक असे ॥११॥
काम हे घोरवृत्ती रजाची । जे इच्छा होणें अप्राप्त विषयाची ।
तो जरी विषय प्राप्त होतांची । सुखचि उफाळे ॥१२॥
काय हो केव्हढा लाभ जाला । न होणें तेंचि मजला ।
ऐसा उद्गार जो वृत्तीनें घेतला । आरंभी हर्षाचा ॥१३॥
तोचि हर्ष उद्गारतत्त्वतां । जिरे हळूहळू चिरकाल होतां ।
विषय असे परी उगेपणा आंतौता । परिणाम पावे ॥१४॥
उद्रार नसतांही वासनेसी । सुखाकारता अनयासी ।
विषयानंद म्हणावें तयासी । वासनानंद नव्हे ॥१५॥
एवं सुप्तिकाळींचा ब्रह्मानंद । उदासवृत्तींत वासनानंद ।
तिसरा जाणिजे विषयानंद । हे तीनच सर्व जगीं ॥१६॥
चौथा आनंद तिहीं लोकीं । जालाचि नाहीं नानात्व अनेकीं ।
येथें आशंका करिसी निकी । कीं असती सुखें बहु ॥१७॥
अद्वैतानंद आत्मानंद । निजानंद परमानंद । सहजानंद विद्यानंद । ऐसे प्रकार बहु ॥१८॥
परी अद्वैत आत्मा निजानंद । परमानंदादि नामभेद ।
तस्मात् एकचि ब्रह्मानंद । जो सुप्तिकालाचा ॥१९॥
सहजानंद तोचि विशद । जया बोलिजे वासनानंद ।
जो उदासवृत्तीचा स्वाद । जागृतीमाजीं ॥१०२०॥
विद्यानंद राज्यानंद । आदिकरून विरंचिपद ।
तो एकचि जाणिजे विषयानंद । बहु नामभेद जरी ॥२१॥
शांतवृत्तीचा जो विवेक । तो विद्यानंदची कौतुक ।
तयासीच विषयानंद एक । नाम बोलिजे ॥२२॥
जरी विवेकें बह्मसुख ग्रहण । परी वृत्ति घेतसे विषय म्हणोन ।
तस्मात् होय तो विषयानंद पूर्ण । निःसंशयें ॥२३॥
तस्मात् ब्रह्मानंद आणि वासना । तिजा विषयानंद जाणा ।
या तिहीं वेगळा चौथा असेना । आनंद जगीं ॥२४॥
या तिन्ही आनंदासी । दृष्टांत देऊ सावध मानसीं ।
श्रोत्रिय बालानंद तिजयासीं । राज्यानंद नाम ॥२५॥
श्रोत्रियाचे सुख ऐसें । सुप्तींत ब्रह्मानंद विलसे ।
वासनानंद तो बाल जैसें । स्तनांध सान ॥२६॥
राज्यानंद तो विषयानंद । हे तो एकचि नसे भेद ।
आतां हेचि वेगळाले विशद । करूनि दाऊं ॥२७॥
श्रोत्रिय म्हणावें ज्ञानियासी । ज्ञान तें ब्रह्मात्मा एकरसीं ।
कोणतेही अवस्थेंत यासी । सुखाचा लोप नाहीं ॥२८॥
जें सुप्त सुप्तीचें वर्णिलें । जें कां त्रिपुटरिहित संचलें ।
तेंचि निजांग होऊन धालें । पुन्हां वोहटे ना ॥२९॥
एवं श्रोत्रियसुख ब्रह्मानंदासी । कीं उपमिला अनंद श्रोत्रियासी ।
हा दृष्टांत दाष्टर्‌रांत एकरसी । परी देणें कळावया ॥३०॥
अति बाल स्तन पिवूनी । तृप्त होऊन मृदु आस्तणीं ।
निजविलें जें सुखें शयनीं । तें सहजे हंसे ॥३१॥
विधिनिषेध ना हर्ष शोक । क्षुधा तृषा ना वृत्त्यात्मक सहजीं सहजत्वें कौतुक ।
हांसे स्वानंद ॥३२॥
जो तूष्णीभाव जागृतीचा । तोचि सहज हर्ष बालाचा ।
दृष्टांत दिधला परी साचा । एकरूप असे ॥३३॥
महाराजा चक्रवर्ती । निवैंर राज्य सर्व जगतीं ।
अव्याहताज्ञ तो सुखमूर्ति । तिष्ठे स्वानंदें ॥३४॥
अमुक करणें उरलें नाहीं । पावावयाचें पावलें तेंही ।
तोचि विषयानंद पाहीं । जो राज्यानंद ॥३५॥
एवं तिन्ही आनंदा तीन उपमिले । या तीहींतून दोन जाती नासले ।
ब्रह्मानंदीं परिणाम पावले । वासना आणि विषय चक्रवर्तींचे सुख पाहतां ।
नाश पावे परें पीडितां । अथवा देवादिकांचें सुख इच्छितां । तुच्छ करी स्वमुख ॥३७॥
बालही दिवसेंदिवस वाढे । मनें सुखदुःखीं पवाडे ।
तेव्हां तें सहज सुख विघडे । वासनानंदरूप ॥३८॥
तैसे श्रोत्रियाचें सुख नसे । जें एकदां अभिन्न बाणलें जैसें ।
तें कालत्रयींही न नासे । भलतेही व्यापारीं ॥३९॥
धनाढ्य किंवा निष्कांचन । एकटा किंवा बहू स्वजन ।
धाला किंवा उपोषण । परी तो आनंदरूप ॥४०॥
वस्त्रालंकारी कीं उघडा । मंचकीं किंवा पडे उकरडां ।
पट्टनीं किंवा वनीं धडफुडा । परी तो आनंदरूप ॥४१॥
भलता आश्रम भलता वर्ण । भलता धर्म भलतें आचरण ।
जागृतीं स्वप्नीं कीं सुषुप्तीं पूर्ण । परी तो आनंदरूप ॥४२॥
एवं ब्रह्मानंद तो ऐसा । मायादि तृणांत उमटो ठसा ।
उद्भवो राहो कीं पावो नाशा । परी तें जैसें तैसें ॥४३॥
आतां वासना विषयानंद दोनी । जे नासती परोक्ष म्हणोनी ।
तेही विचारें पावती मिळणी । अभ्सासें ब्रह्मानंदा ॥४४॥
विवेकवैराग्याचेनि बळें । विषय तितुका सर्व निवळे ।
विवेचनें जरी मीपण गळे । तेव्हां भाग्य भोक्ता आटे ॥४५॥
देहाचें सुखदुःख समान । हर्षखेदें भंगे ना मन ।
मग सहजत्वें वृत्ति उदासीन । मिळे वासनानंदीं ॥४६॥
गुणाचे विकार मावळती । सुखरूप राहे सहजगती ।
या रीतीं विषयानंदाची समाप्ति । उदासवृत्तीमाजीं ॥४७॥
तैशीच उदासवृत्ति ही स्वभावें । जे सुखाकारें हेलावे ।
तेही अभ्यासें ऐक्य पावे । ब्रह्मानंदीं ॥४८॥
तो अभ्यास आणि विवेचन । कैसें तें पुढें निरूपण ।
तेणें रीतीं करावें अभ्यसन । मंदप्रज्ञें मुमुक्षें ॥४९॥
येथें सहजगती उगेपण होतां । तें सुख उमटे जागृती आंतौता ।
सांगितलें अगा रविदत्ता । सहज असे म्हणोनी ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP