मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २५१ ते ३००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


ऐसिया देखणें दशेसी । नाभें तीन ओळखिसी ।
जो कां जाणतसे दृश्यासी । तोचि द्रष्टा ॥५१॥
चंचळ भासासि जो जाणे । तया साक्षी नांव हीं वचनें ।
जो कां लयसाक्षी पूर्णपणें । त्या नांव ज्ञप्ति ॥५२॥
एवं ती प्रकारें जाणणें एक । तें कधीं नव्हे न्यूनाधिक ।
तेंचि चिद्रूप निश्चयात्मक । मुख्य रूपाचें ॥५३॥
मुख्य स्वरूप देहीं व्यापलें । जेवीं घटीं आकाश संचलें ।
निर्विकार पूर्ण दाटलें । तया संकेत कूटस्थ ॥५४॥
उपाधींत जो सधन । परि उपाधीहून विलक्षण ।
तया प्रत्यगात्मा अभिधान । परब्रह्मासी ॥५५॥
अगा रविदत्ता तो कवण म्हणसी । तरी तूंचि कीं गा निश्चयेंसी ।
सामान्यत्वें सर्वां प्रकाशी । सूर्य जेवीं जगा ॥५६॥
आकाशी जैसा सूर्य असे । सहजत्वें सर्वां प्रकाशितसे ।
ऊर्ण तंतु तोही भासे । आणि जडरूप भिंतीही ॥५७॥
आंगणे माड्या परवरें । बळदें खोल्या तळघरें ।
एकदांचि प्रकाशित सारें । तेवीं कूटस्थ भासवी ॥५८॥
स्थूलरूप जडत्वें भिंती । सूक्ष्मादि तळघरें असती ।
हें असो मुख्य जे कां स्फूर्ति । ऊर्णतंतूचे परी ॥५९॥
तेही जयाच्या भासें । मा स्थूळ चंचळ कां न दिसे ।
ऐसा आत्मा सर्वत्रीं असे । साक्षी बोधरूप ॥६०॥
सूर्याचा जो दृष्टांत दिधला । येथें अन्यथा भाव ज्यासी कल्पिला ।
कीं आत्मा देहाहून दूर असे राहिला ।
गगनीं जेवीं रवी एवं आत्मा ऐस दूर भावितां ।
अति दूषण असे तत्त्वतां । देहादि ठाव जाला
रिता । मग व्यापकत्वा बाध आला ॥६१॥
आणि देहामाजीं जरी नसे । तरी तें साधका प्राप्त कैसें ।
येणें श्रुती अनुभवा आला असे । बाध हा थोर ॥६३॥
तस्मात् नसे सूर्या ऐसा । उपमिला असे यथें सहसा ।
याचा भाव अनारिसा । बोलिजे तो ॥६४॥
सूर्य जेवीं सामान्य प्रकाशी । तेवीं आत्मा भासवी सर्वांसी ।
परी नपवे विकारासी । सूर्यासम आत्मा ॥६५॥
सामान्यामुळें सूर्य घेतला । तरी दूर भाव न जावा कल्पिला ।
यास्तव पूर्वीच असे दृष्टांत दिधला ।
आकाशापरी आकाश जैसें घटीं व्यापलें ।
तैसें आत्मसत्व देही संचलें ।
परी ते असंगत्वें राहिलें । सर्वां भासऊनी ॥६७॥
उगाचि प्रकाश मात्र सर्वां । लय उत्पत्तीसी करावा ।
परी त्या त्या विकाराचा न घ्यावा । भाव किमपी ॥६८॥
तरी विकारासी कोण पावला । कोण पुण्य पापाचा कर्ता जाला ।
ऐसा भाव जरी असे बुजला । तरी अवधारावें ॥६९॥
सूर्य प्रतिबिंबाची झळझळ । विशषत्वें भासे केवळ ।
तैसा बुद्धीमाजीं जो सफळ । प्रतिबिंबित जीव ॥२७०॥
ज्ञाना ऐसा बुद्धींत बिंबला । बोधाभास नाम तयाला ।
तो सत्य नव्हे पाहिजे कळला । परी दिसे साचा ऐसा ॥७१॥
चित्रासी रंगाचें वस्त्र केलें । तया वस्त्राभास नाम जालें ।
कीं दर्पणीं मुखा ऐसें दिसलें । त्या नांव मुखाभास ॥७२॥
ऐसाचि बुद्धींत प्रतिबिंबत । तो जीव चिदाभास विख्यात ।
यावत् बुद्धि तों काल दिसत । वृत्ति अभावीं मरे ॥७३॥
सूर्य प्रकाशीं दर्पण ठेविलें । त्यांत सूर्याचें प्रतिबिंब पडलें ।
तें भिंतीवरी विशेष दिसलें । सामान्य आच्छादुनी ॥७४॥
तैसाच बुद्धि आरसियांत । आत्मा सूर्य प्रतिबिंबित ।
तेणें विषयादि स्फुरविली भिंत । आच्छादुनी सामान्या ॥७५॥
हे विशेषत्वें जीवाचें रूप । सामान्य आत्मा तो चिद्रूप ।
ययाचें निरूपण साक्षेप । पुढें बहुधा असे ॥७६॥
परी अल्पमात्रें येथें बोलिलें । सामान्य विशेष निवडिलें ।
सामान्य तें सदा संचलें । निर्विकारत्वें ॥७७॥
विशेषत्वें जो हा जीव । बोधा ऐसा उमटला भाव ।
तोचि एका अभिमानास्तव । कर्ता जाला ॥७८॥
आपण तरी नाहीं जन्मला । उगाचि सताचा आहेपणा घेतला ।
आपण आहेसा भाव कल्पिला ।
आत्मा नाहींसा करोनी आत्मा असता तरी दिसता ।
मी दिसें म्हणोन आहें तत्त्वतां ।
मीच असें की सर्वां देखता । आत्मा जड न पाहे ॥।२८०॥
मी आपआपणा असे प्रिय । आत्मा दुःखरूप अप्रिय ।
एवं अस्ति भाति प्रिय जो होय । तें आपणा भाविलें ॥८१॥
आपण जो असज्जड दुःखरूप । तो आत्म्यावरी केला आरोप ।
ऐसा अन्योन्या ध्यास आपेआप । कल्पिला बळें ॥८२॥
याचि नांवे ग्रंथि पडिली । आत्मरूपता आभासें घेतली ।
आपुली अनात्मता घातली । आत्मयावरी ॥८३॥
ऐसा भाव जीवें कल्पिला । परी तो आत्मत्वीं नाहीं स्पर्शला ।
आत्मा जैसा तैसाचि संचला । अस्ति भाति प्रियात्मक देखोनि गुंजा
पुंज रक्त । अन्यें भाविला असे जळत ।
त्या कल्पनेनें भस्म पावत । काय तो ढोंग ॥८५॥
ऐसा आत्मा सच्चिद्घन । असे तैसा असे पूर्ण ।
जेणें भाविला तो जन्म मरण । पावला मात्र ॥८६॥
असो ऐसा जीव असत् असोनी । सत्यत्वचि आपणातें मानी ।
देहद्वयाचे अभिमानीं । तादात्म्य पावे ॥८७॥
स्थूलदेह मांसमायाचा । नेणोनि भाव तयाचा ।
मीच म्हणोनि मर्जे वाचा । त्याचे धर्मही माथां घे ॥८८॥
मी जन्मलों वाढू लागतों । आहें आणि तरुण होतों ।
वृद्धाप्य पावोनी मरतों । पुन्हां अन्मेन पुढें ॥८९॥
मी अमुक कुळीं जन्मलो । मी अमुक आश्रमातें पावलों ।
मी अमुक मेळवून राहिलों । सुखी वडिलां ऐसा ॥२९०॥
तैसेचि इंद्रियांचे धर्म । आपुले माथां घेतसे परम ।
मी बहिरा आंधळा कीं सूक्ष्म । ऐकें आणि देखें ॥९१॥
अजिव्ह की असे रसज्ञ । निर्नासिक कीं सध्राण ।
अस्पर्श कीं स्पर्शज्ञ । असे पूर्वकर्मा ऐसा ॥९२॥
मी बोलका चालका दानी । मीच भोगीं बहु कामिनी ।
मीच शौच सारीं अनुदिनीं । मजहुनि दुजा नसे ॥९३॥
मजचि क्षुधा तृषा लागे । तेव्हां पितों खातों निजांगें ।
एवं प्राणाचेही धर्म वेगें । घे अभिमानें माथां ॥९४॥
म्यां अमुकीया वचन दिधलें । कीं तुज रक्षीन सामर्थ्यें आपुलें ।
तरी मीं प्राणांतींही उपेक्षिलें । न जाय तया ॥९५॥
म्यां घोकिलें ते विसरेना । कधींही आळस मज असेना ।
किती रीतीं मज होती कल्पना । तें माझा मीच जाणें ॥९६॥
माझा निश्चय किती जाडा । येर झुडतार कोण बापुडा ।
मी आठव करणार केव्हडा । आपुले ठायीं ॥९७॥
एवं देहेंद्रिय प्राण कर्म । अथवा अंतःकरणाचे धर्म ।
आपुलेचि माथां घेऊन अधम । बैसला बळें ॥९८॥
जागृतीमाजीं इतुक्यांचा । अभिमान घेतसें मीच साचा ।
कर्म धर्म वर्ण आश्रमांचा । कीं व्यापार लौकिकीं ॥९९॥
हा मी आणि हें हें माझें । घेऊन बैसला तें न सांडी ओझें ।
हाचि विश्वाभिमानी बुझे । नाम जीवासी ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP