मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २५५१ ते २६००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५५१ ते २६००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


तोंवरीच देवदानव मानवादिक । स्त्री पुरुष कीं नपूंसक ।
जोंवरी ब्रह्मात्मा निश्चयात्मक । अपरोक्षें न कळे ॥५१॥
तोंवरीच शब्दाची खटपट । शास्त्रीय लौकिकाचे बोभाट ।
जोंवरी ब्रह्मात्मा निघोट । अपरोक्षें न कळे ॥५२॥
तोंवरीच मी कर्ता भोक्ता सकळां । ध्याता ज्ञाता अनुभविता वेगळा ।
जोंवरी ब्रह्मात्मा स्वलीळा अपरोक्षें न कळे ॥५३॥
तोंवरीच किंचिज्ज्ञ हा जीव । ईशा सर्वज्ञपणाचा भाव ।
जोंवरी ब्रह्मात्मा स्वयमेव । अपरोक्षें न कळे ॥५४॥
तोंवरीच जीव हा भा्रमक । ईश्र्वर असे यासी प्रेरक ।
जोंवरी ब्रह्मात्मा उभयीं एक । अपरोक्षें न कळे ॥५५॥
तोंवरी संचित प्रारब्ध क्रियमाण । ईश करी बलात्कारें प्रेरण ।
जोंवरी ब्रह्म परमात्मा आपण । अपरोक्षें न कळे ॥५६॥
तोंवरीच बंध मोक्ष हे वार्ता । सिद्ध साधक कीं मुमुक्षुता ।
जोंवरी ब्रह्म परमात्मा तत्वता । अपरोक्षें न कळे ॥५७॥
तोंवरीच गुरुशिष्य हे दोन । श्रवण मनन निदिध्यासन ।
जोंवरी ब्रह्म आत्मा सघन । अपरोक्षें न कळे ॥५८॥
असो ऐसे कोठवरी बोलावें । द्वैत तोंवरीच हें आघवें ।
जोंवरी ब्रह्म आत्मा स्वानुभवें । अपरोक्षें न कळे ॥५९॥
ऐसा अपरोक्ष उत्तमाधिकारी । गुरु शास्त्रविचाराचे अनुकारीं ।
विवेचनें पावला निःसंशय अंतरीं समाधि ।
उत्थानरहित ब्रह्मात्मा अपरोक्ष पहिलाचि असे ।
आजि नवा कवणा करणें नसे । परी वाउगेंचि अज्ञानें लाविलें पिसें ।
भिनत्वदेहबुद्धीचें चित्प्रभा जे अनेकधा बोलिली ।
आणि हे ईशादि जड बत्तीस उद्भवली ।
हे दोन्ही येकचि म्हणून भाविलीं येकत्र जाहली नसतां ॥६२॥
हेंचि चिद्ग्रंथीचें रूप । एकचि जाहले दोरी सर्प ।
परी हा वाउगाचि आरोप । अज्ञानकार्य ॥६३॥
ऐशिया ग्रंथीचें भेदन । जो करी विचारें निःसंशय पूर्ण ।
तोचि उत्तम अधिकारी आपण ।
पुन्हा ग्रंथी पडो नेदी ग्रंथी म्हणजे पुन्हां जडासी ।
चिद्रूपता न येचि बुद्धीसी ।
आणि चिद्रूप ब्रह्म जें अविनाशि । तें जडसें न वाटे ॥६५॥
चिद्रूप ब्रह्म तेंचि आपण । येर हे बत्तीस आपणाहून भिन्न ।
निवडिले तया स्वप्नींहि मीपण । येऊं नेदी सहसा ॥६६॥
जरी देहादिकांचे व्यापार होती । परी असंग आपण अचळस्थिती ।
हेचि सहज समाधि निश्चिती ।
समाधि उत्थानरहित भलतिये अवस्थेमाझारी ।
असंग आपण निर्धारी । ईशादि तृणांत हे सारी ।
मिथ्या परोक्ष ॥६८॥
देह जन्मला आपण जन्मेना । देहा ऐसा आपण असेना ।
देह वाढतां आपण वाढेना । स्वयें चिद्रूप आत्मा ॥६९॥
देह तरुण भोगी । आपण असंग विषयालागीं ।
देह क्षीण होता न होय प्रसंगीं । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७०॥
देह मरतां आपण न मरे । देहायेवढा नोव्हे साचोकारे ।
तरी होईल कैसा जडआकारें । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७१॥
देह चालतां आपण चालेना । देह बोलता आपण बोलेना ।
देतां घेतां न देई घेईना । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७२॥
रति भोगितां आपण अभोक्ता । असंगचि स्वयें विसर्ग करिता ।
भलतिया क्रियेमाजी समस्ता ।
स्वयें चिद्रूप आत्मा कर्ण ऐके आपण ऐकेना ।
स्पर्श घेतां आपण स्पर्शेना । डोळा देखतां आपण देखेना ।
स्वयें चिद्रूप आत्मा ॥७४॥
जिव्हा रसज्ञ आपण अजिव्ह । घ्राण घेतां आपण स्यमेव ।
आपण असंग अगंध सदैव । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७६॥
चित्त चिंतिता अचिंत्य आपण । अहंकाराचे न घे अहंपण ।
बुद्धि निश्चयामाजी परिपूर्ण । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७७॥
मन संकल्पा जरी निर्के । परी न पडे कदा संशयात्मकें ।
आपण परिपूर्ण निश्चयात्मकें । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७८॥
हें असो संघ हा जागृत । सर्व क्रिया असती होत ।
परी आपण जागा ना व्यापारत । स्वयें चिद्रूप आत्मा ॥७९॥
ब्रह्मादि तृणांत सर्वां पाहे । परी सत्यत्व किंचितही न लाहे ।
सर्वाधिष्ठान आहे तें आहे । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८०॥
उंच नीच कीं सान थोर । हा नव्हेचि किमपि उद्रार ।
येकत्वें परिपूर्ण अपार । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८१॥
ऐसा जागृतीमाजी देह हा क्रीडे । परी कर्तेपणाची न जोडे ।
तरी सुखदुःख भोग कवणा आतुडे । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८२॥
वाउगें मनन करितां क्षणीं । कीं स्वप्नभासातें देखोनी ।
भिन्न पाहे सर्व आपणाहूनी । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८३॥
गाढ जरी झोंप लागतां । नेणिवेची नसे वार्ता ।
सर्व काळ देखणा तत्त्वतां । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८४॥
तैसेंचि समाधिकाळीं आपणा । येऊं नेदी ध्यातृध्याना ।
ध्येयरूपचि अनुभवाविना । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८५॥
एवं जागृतीमाजीं मी माझिया । स्पर्शो नेदी विश्र्वाभिमानिया ।
एकरूप पाहतसे अद्वयां । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८६॥
ध्यासेंही कर्तृत्वा नातळे । भोक्तेपणाही न उफाळे ।
तैजस ठायींचा ठाईं गळे । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८७॥
सुप्तींत किंवा समाधींत । भिन्नत्वाची नेणेचि मात ।
प्राज्ञ अभिमानाचा होता निःपात। स्वयें चिद्रूप आत्मा ॥८८॥
ऐसा निजांगें ब्रह्म जाहला । संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला ।
द्वैताचा कांटाचि उपटिला । स्वयें चिद्रूप आत्मा ॥८९॥
स्फूर्तीपासून देहापर्यंत । मी म्हणोन स्वप्नींही नातळत ।
तेवींच ब्रह्मादि तृणांत । सत्यत्वें नाढळती ॥२५९०॥
ब्रह्मचि सत्य तोचि आपण । या सर्वांसि नुद्भवेचि मीपण ।
तरी सत्यत्व कैचें जरी भासमान ।
मृगजळापरी जग एवं सत्य तें मिथ्या न होय ।
मिथ्यालागीं सत्यत्व न ये ।
अहंकारादि देहांत न जाय । कदा मीपणें ॥९२॥
हेचि सहज समाधीची स्थिती । उत्थानचि नव्हे कल्पांतीं ।
संशय ग्रासून सहजगति । आठवावीण ब्रह्म अंगें ॥९३॥
ब्रह्मींचें अभाव असावें । तरी तया अविद्या अज्ञान म्हणावे ।
अविद्येविण जीवासी रूप नव्हे ।
तरी साभिमान कैंचा अज्ञान जातां ज्ञानहि मावळे ।
नुसधें विज्ञान ब्रह्मचि निवळे । तस्मात् विद्येसहित ईशत्व गळे ।
प्रेरकत्व त्यागूनी ऐसे कारणरूपें जीवेश गेले ।
कार्यरूपें देहादि उरले । तया स्फूर्ति मात्रें जीवें स्फुरविलें ।
परी साभिमान मेला ॥
देह इंद्रिय प्राण बुद्धि मन । आणि स्फूर्तीही तया असे कारण ।
परी अज्ञान गेलेंचि निपटून । आतां उरती मृगजळवत् ॥९७॥
याची क्रियाही प्रारब्धवशें । तिहीं अवस्थेची होतसे ।
परी कवणेंकाळींही न उमसे । ययासी मीपण ॥९८॥
तेवींच ब्रह्मादि तृणांत जग । ज्ञान जाहलियाचि दिसती मग ।
वरी सत्यता न येचि असंग । आस्ति भाति प्रिय ब्रह्म ॥९९॥
ऐसा निश्चयचि होऊन गेला । उत्थान नव्हे तिहीं अवस्थेला ।
जग सत्यत्वा की देहाचे मीपणाला । न स्पर्शे ब्रह्मात्माहूनी ॥२६००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP