मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १ ते ५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १ ते ५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


जय जय स्वामी सद्गुरू । शंकराचार्य करुणाकरू ।
मोक्षध्वजा परपारू । पाववीं निज दासा ॥१॥
मी अज्ञानसागरीं पडिलों । मायाडोहींच सांपडलों ।
ममता मगरीनें गिळिलों । येथून कष्टें न सुटें ॥२॥
साधनेंही उदंड केलीं । कर्मंधर्मादि जीं आपुलीं ।
परि तीं असतीं साह्य जालीं । अविद्येसी ॥३॥
जपतापादि पुरश्चरणें । अथवा व्रते नाना दानें ।
तीर्थयात्रा संतर्पणें । उद्यापनें शांती ॥४॥
इतुकेंही आदरें करितां । परी उपशम नसेचि चित्ता ।
मात्र अधिकच वाढे अहंता । म्यां केलें म्हणोनी ॥५॥
मी अमुक एक रविदत्त । माता पिता जें नाम ठेवित ।
हाचि देह मी असें निभा्रंत । सर्वदा दृढ ॥६॥
परि मी पूर्वीं असें कवण । जन्मलों आतां आलों कोठोन ।
मरतां कोणे स्थळा जाईन । हें नेणें मी सहसा ॥७॥
परी आपण कोण हे जाणावें । ऐसा हेतु उद्भवला जीवें ।
येर साधन जितुकें आघवें । तृणतुल्य जालें ॥८॥
यास्तव देवी देव धुंडिले । अति निग्रहें प्रसन्न झाले ।
तंव ते वर माग म्हणों लागले । देहबुद्धिच बळावया ॥९॥
मग मी सर्वांसी उपेक्षून । गेलों सदाशिवासी शरण ।
तिहीं स्वप्नामाजीं येऊन । सांगितले मज ॥१०॥
कीं उठीं उठीं गा रविदत्ता । तूं भवभयाची न करी चिंता ।
सद्गुरूसी शरण जाईं आतां । ममाज्ञेवरूनी ॥११॥
प्रस्तुत मीच जगदोद्धारा । प्रगटलों असें निर्धारा ।
ऐसिया अज्ञान कली माझारा । श्रीशंकर नामें ॥१२॥
तस्मात् तया शंकरस्वामीसी । शरण जाऊनि या समयासी ।
उपदेश धरूनियां मानसीं । अज्ञान जिंकीं ॥१३॥
ऐशिया स्वप्नांतीं जागृती । पावोनी विस्मयापन्न जालों चित्तीं ।
मग धांवोनी आलों सत्वरगती । शरण श्रीचरणा आतां
सद्गुरूराया मज । अंगीकारावें महाराज ।
धन्य धन्य हा सुदिन आज । देखिले चरण ॥१५॥
हा देह आणि मन । गुरूचरणीं केलें अर्पण ।
यांत किमपि जरी घडे प्रतरण । तरी चूर्ण होवो मस्तक ॥१६॥
जरी वाणी हे आणिका स्तवी । तरी ते तत्क्षणीं तुटावी ।
चित्तें जरी अन्य कांहीं आठवीं ।
तरी घडावी ब्रह्महत्या या रीतींकरुनी निर्धार ।
साष्टांग घालित नमस्कार । तारीं तारीं हा निज किंकर ।
स्वकीय ब्रीद रक्षुनी ॥१८॥
ऐसा अधिकारी पाहुनी । विचारें परीक्षिती अंतःकरणीं ।
हा चतुष्टय संपन्नत्व पावोनी । शरण आला असे ॥१९॥
सत्य मिथ्या यासि कळलें । म्हणोनि असत्यासी मन विटलें ।
हेंचि नित्यानित्य विचारिलें ।
सत्य कळावें इच्छितां ब्रह्म जाणावें जें इच्छा होणें ।
हेंचि मुमुक्षुत्वाचीं लक्षणें । आणि इह पर भोगासि उबगणें ।
हेचि विरक्ति ॥२१॥
अन्य मनाचे सांडोनि तर्क । आत्मा वोळखून धरावा एक ।
हाचि शम निश्चयात्मक । इंद्रियनिग्रह तो दम ॥२२॥
सर्वांपासून तो परतला । हाचि असे कीं उपरम झाला ।
न भी कदां सुखदुःखाला । हेचि तितिक्षा ॥२३॥
सद्गुरुवचनापरतें कांही । यासि दुजेंच उरलें नाहीं ।
हेहि श्रद्धा निःसंदेही । समाधान एकाग्रता ॥२४॥
तस्मात् साधन चतुष्टयता । अर्थात् आली याचिया हातां ।
ऐशिया अधिकारिया उपदेशिता । दोष हा कवण प्रज्ञा जरी मंद असे ।
तरी उपदेशांवें सदभ्यासें । वृत्ति खलितां दृढ विश्र्वासें ।
अपरोक्षता बाणे ॥२६॥
ऐसा हेत ठेऊनि अंतरीं । उठविती रविदत्ता करीं ।
नाभी नाभी बोलती उत्तरीं । मनोरथसिद्धि होय ॥२७॥
परी आम्ही उपदेशूं आतां । तें दृढ विश्र्वासें धरी चित्ता ।
आणि अभ्यासें हें वृत्ति खलितां । अपरोक्ष पावसी ॥२८॥
अपरोक्ष म्हणजे आपण कोण । तें निजरूप आंगेचि होणें ।
परोक्ष म्हणजे आपण । ओळखावें आपणा ॥२९॥
गुरुवचनीं विश्र्वास । तरी पाविजे परोक्ष ज्ञानास ।
तस्मात् श्रद्धा असावी चित्तास । तरी आत्मत्व ओळखसी ॥३०॥
मात्र अपरोक्ष ज्ञान व्हावया । विचार पाहिजे शिष्यराया ।
तोही अभ्यासें पावेल उदया ।
निःसंशय आपणाची प्रस्तुत तुज परोक्षज्ञान ।
उपदेशिजे घे ओळखून । तेंचि विश्र्वासें दृढ करून अभ्यास करी ॥३१॥
तूं हेतु धरोनि जो आलासी । कीं जाणावें आपआपणासी ।
तो तूं कोण या समयासीं । बोलिजे अवधारी ॥३३॥
चहूं वेदांचीं वाक्यें चार । याचा अर्थ तो एक साचार ।
कीं जीवनब्रह्मऐक्य निर्धार । हा विषय वेदांतींचा ॥३४॥
त्यांत उपदेश वाक्य तत्त्वमसी । तें विचारून घ्यावें गुरूपाशीं ।
मग अहंब्रह्मास्मि या वाक्यासी ।
वृत्तीनें दृढ धरावें तरी अवधारीं एकाग्र भावें ।
तें तूं ब्रह्म अससी स्वभावें । अहंकारादि देहांत आघवें ।
आपण नव्हें सत्य सत्य ॥३६॥
मी ब्रह्म आत्मा स्वतःसिद्ध । एकरूप असंग अभेद ।
ओळखून घेईं प्रभाद । देहबुद्धीचा सांडुनी ॥३७॥
हेचि अहंब्रह्मास्मि निश्चिती । वाक्यार्थाची जे अनुभूती ।
ऐशी वृत्ति ते वाक्यवृत्ति । हा वृत्तीसी अभ्यास ॥३८॥
कायिक वाचिक मानसिक । शास्त्रीय अथवा जी लौकिक ।
कर्में घडतांहि अनेक । परी अभ्सास सोडूं नये ॥३९॥
अभ्यास म्हणजे मी ब्रह्म आपण । या अर्थाचें अनुसंधान ।
कदापि न पडावें विस्मरण । अहर्निशीं सदा ॥४०॥
तूं म्हणसी आत्मा ब्रह्मपूर्ण । याचें किमात्मक असें लक्षण ।
तें यथार्थं ओळखिल्यावांचून ।
अनुसंधान केवीं घडे तरी अवधारावें निश्चित ।
अहंकारादि जितुकें देहांत । यांत आत्माही झाला मिश्रित ।
अज्ञान वसे कडोनी ॥४२॥
यासी विवेचन पाहिजे झालें । देहादि मिथ्यात्व जरी त्यागिलें ।
तरी आत्मत्व जाय निवडिलें ।
त्रिविधा प्रतीतीनें तेंचि विवेचन म्हणसी कैसें ।
बोलिजेत असे अपैसें । तरी सावधान असावें मानसें ।
दुश्चित्त न होतां ॥४४॥
जैसा माळेंतून तंतु निवडावा । कीं मणीच तंतूवरील ओढावा ।
तैसा देहादिकाहून ओळखावा । आत्मा भिन्न ॥४५॥
अथवा देहादिक हे ओळखुनी । भिन्न करावे आत्मयाहूनी ।
हें सर्व कळेल निरूपणीं ।
अती सावधान जरी होसी ऐसें बोलतां आचार्य माउली ।
रविदत्तें वृत्ति सावध केली । शब्दासरशी झेंप घाली ।
मनें अर्थावरी ॥४७॥
रविदत्त एक उपलक्षण । परी जे जे असती अधिकारी पूर्ण ।
तेही असावें सावधान । आचार्य गुरुवचनीं ॥४८॥
चातकासाठीं वर्षे घन । परी सर्वांसीच होय जीवन ।
तेवीं रविदत्ताचे निमित्तें कडोन । सर्वही अवधारा ॥४९॥
परी भूमीचा सांडून चारा । जो घन लक्षी तो चातक खरा ।
तेवीं देहादि विषय हे अव्हेरा ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP