सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १०५१ ते ११००
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
हेंही असो तृष्णी स्थिति । सुख असेंचि असे सहजती ।
परी व्यापारामाजीं ही सामान्यप्रती । लोप नाहीं ॥५१॥
तेंचि कैसें व्यापाराआंत । या सर्वत्रां सामान्य भासवीत ।
आणि जागरीं तिन्ही अवस्था उमटत । तेंही ध्वनितार्थें बोलूं
धीव्यापाराश्चतद्भास्य श्चिदाभासे न संयुताः ॥
बुद्धिचे व्यापार अनारिसे । चिदाभासासाहित विलसे ।
हें चिद्रूपें भासविल्या भासे । धर्म कीं धर्मीं ॥५३॥
जें निर्विकारीं चळण । वाउगें जालें न होऊन ।
जें मागां बोलिलें ज्ञानाज्ञान । विद्याअविद्यात्मक ॥५४॥
तेंचि अंतःकरणाची स्फूर्ति । जीव प्रतिबिंबासह वृत्ति ।
उमटली सगुणा अध्याकृति । हेतु या जगा ॥५५॥
तिचेच विभाग जाहले दोन । येक बुद्धि येक मन ।
तया दोन वृत्तींचें निर्गमन । पांचा द्वारां ॥५६॥
हेचि पांच ज्ञानेंद्रिय । येणें ग्रहण कीजे पंचविषय ।
परी मन बुद्धींत होती उभय । कळणें आणि चळणें ॥५७॥
त्यांतून कळणें ज्ञानेंद्रियाद्वारां । निघोनि भोगी पंचतन्मात्रा ।
चळण तेंचि राहिलें अंतरा । ते पंचप्राण ॥५८॥
तेणें स्थूलाचि क्रिया होणें । तेचि पांच कर्मेंद्रियाभिधानें ।
एवं दशधा व्यापार उद्भवणें एका बुद्धीचे ॥५९॥
जीवही ज्ञानाचा आभास । ज्ञानऐसा जो प्रतिभास ।
विषयापर्यंत सहवास । असे निर्गमाचा ॥१०६०॥
असो ऐसे एका वृत्तीचे । जीवासहित विकार साचे ।
सत्रा प्रकार व्यापार भेदाचे । जितुके होती ॥६१॥
तितुके धर्म धर्मीसहित । जो आपुले भासवीत ।
जीव हा आपणासम प्रतिबिंबित । त्यातेंही प्रकाश करी ॥६२॥
स्फूर्ति आणि स्फूर्तीचें चळण । हेचि धर्म आणि धर्मी दोन ।
संकल्पासहित उद्भवलें मन । त्यातेंही प्रकाश करी ॥६४॥
श्रोत्र ऐकणें त्वचा स्पर्शणें । चक्षू देखणें जिव्हा रस घेणें ।
घ्राण आणि सुगंध घेणें । त्यातेंही प्रकाश करी ॥६५॥
एवं धर्मधर्मीसहित । सत्रा प्रकार हे उमटत ।
जीवही त्यांत प्रतिबिंबत । त्यातेंही प्रकाश करी ॥६६॥
हे असो देहविषय । जडत्वेंहि जो समुदाय ।
सन्निध दूर व्यष्टिसमाष्टिमय । त्यातेंही प्रकाश करी ॥६७॥
अंतःकरणवृत्ति वायूच्या चळणें । पंचज्ञानेंद्रियद्वारां विषय घेणें
पंचक्रियेसहित जे जागृती म्हणणें त्यातेंही प्रकाशकरी प्रत्यक्ष स्थूलविषय त्यागून ।
अंतरीं वृत्तीचें सध्यास मनन ।
तया कल्पनेसी नांव स्वप्न । त्यातेंही प्रकाश करी ॥६९॥
कांहीही व्यापारन व्हावे । उगेंचि स्तब्धपणें असावें ।
सुषुष्ति बोलिजे याचि नावें । त्यातेंही प्रकाश करी ॥१०७०॥
उगाचि प्रकाश मात्र करावा । त्याचा विकार न घ्यावा ।
अथवा हें प्रकाशिलें म्यां सर्वां । हा हेतुही नसे ॥७१॥
हेंचि स्वप्रकाश चिद्रूप । तें सविकल्पना निर्विकल्प ।
जें जें महान अथवा अल्प । प्रकाशवावें ॥७२॥
दशधा व्यापार ते जागृती । नुसती कल्पना ते स्वप्नस्थिति ।
उगेपणा नेणीव ते सुप्ति । एवं जागरीं तिन्ही अवस्था ॥७३॥
ऐसिया कोणत्याही व्यापारा । जीवासहित या आभासमात्रा ।
प्रकाश करीतसे निर्धारा । येकले ज्ञान सामान्य ॥७४॥
येथें आशंका करिसी ऐशी । किंचित्प्रभा प्रकाशी सर्वांशी ।
तरी जीवें कीजे कोण कार्यासी । वृत्तींत प्रतिबिंबोनी ॥७५॥
तरी येके दृष्टांतयुक्त । बोलिजे जीवाचें जें कृत ।
आणि पराचे प्रकाशें वर्तत । तेंही स्पष्ट कळे ॥७६॥
वन्हितप्तं जलं तापयुक्त देहस्य तापकं । चिद्भास्याधस्तिदाभास
युक्तान्यान्भासयेत्तथा ॥
वन्हीनें जे जळ तापलें । तं उष्णयुक्त देहा तापक जाहलें ।
तैसें चिद्भास्या बुद्धीनें भासविलें । आनान आभासयुक्तें ॥
चिद्रूप सामान्य ज्ञानेकडून । सर्व पदार्थ होती प्रकाशमान ।
परी अन्यथा अमुक अमुक म्हणून । कल्पनेविण न दिसती जैसा
अग्निसन्निधीं देह पोळे । परी ओला नोव्हे विना जळें ।
तेवीं प्रकाशिलें परी न निवळे । आनान कल्पनेविण ॥
म्हणून कल्पनारूप जे वृत्ती । मन बुद्धि नाम जयेप्रती ।
संशयात्मक मन निश्चिती ं निश्चयात्म बुद्धि ॥१०८०॥
हे उभयरूपें एक कल्पना । अमुक अमुक कल्पी नाना ।
अन्यथा विपरीतपणें आनाना । नामरूपा कल्पी ॥८१॥
परी ते जड प्रकाशरहित । प्रकाशीना कवणा किंचित् ।
जळ जैसें शीतळ अत्यंत । कवणा पोळवीना ॥८२॥
स्वतां चंचळ परी प्रकाशहीन । ते कल्पना जेव्हां ज्ञानसंपन्न ।
तेचि जाणिजे भासमान । परप्रकाशें ॥८३॥
जैसें शीतळ जळ पोळूं लागे । तरी तें तप्त जालें अग्निसंगें ।
तैशी बुद्धि जाणे नानात्वा प्रसंगें । तरी हे चिद्रुपें भासविली ऐशी बुद्धि चिद्रुपेंकडून ।
भासली तें चिद्भास्या लक्षण ।
ते कल्पना आभासयुक्त होऊन । नानात्व कल्पी ॥८५॥
बुद्धिमाजीं ज्ञानासमान । ज्ञान उमटलें भासमान ।
तयासींच कल्पित नामाभिधान । बोधाभास जीव ॥८६॥
तापरूप अग्नि जैसा । जळही पोळवीत असे सहसा ।
तो उष्णभास जल सहवासा । तेवीं जीव कल्पनेआंत ॥८७॥
असो ऐसिया चिदाभासासहित । युक्त होऊनि बुद्धि विख्यात ।
नामारूपात्मक वस्तु समस्त । अन्यथात्वें भासवी ॥८८॥
जल तप्त पोळवी देहासी । फोड येती जाळी अवयवांसी ।
आभासयुक्त बुद्धिहि तैशी । नामरूपें कल्पी ॥८९॥
अग्नि तैसा प्रकाशक आत्मा । पाणियापरी बुद्धि या नामा ।
उष्णभास तैसा आभास या जीवात्मा । हे तिन्ही स्पष्ट जाले
परप्रकाशबुद्धि कळली । चित्प्रभा स्वप्रकाशें संचलीं आभास मिथ्या हे प्रतिति आली । यया दृष्टांतें ॥१०९१॥
परी याचें कल्पना करिसी । किं अन्यथा भासवणें शक्ति जीवासी ।
तापल्या जळीं प्रभा तैशी । कोठें अन्या प्रकाशक ॥९२॥
तरी याचें उत्तर ऐकावें । सूर्यकिरणें जळ तप्त व्हावें ।
आणि जळीं प्रतिबिंबही पडावें । तेणें झळझळिती भिंती ॥९३॥
अग्नि सूर्य तो एकरूप । तया भेद न कीजे अल्प ।
तैसा आत्मा स्वप्रकाश चिद्रूप । असावादित्योब्रह्म ॥९४॥
यया आत्मसूर्याचे प्रकाशीं । ठेविलें स्थूलदेहघटासी ।
बुद्धि पाणी आभासतस जीवासी । प्रतिबिंबत्वें आली ॥९५॥
तया प्रतिबिंबरूप जीवानें । नानात्व अन्यथा भासवणें ।
जळीं उमटलें जें मिथ्यापणें । तेणें भिंती झळझळिती ॥९६॥
सूर्य तैसा आत्मा प्रकाशक । सामान्यत्वें भासवी सकळिक ।
आभासयुक्त बुद्धि हे अनेक । भासवी जळ प्रभा जेवीं एवं आत्मा
सच्चिद्धन । बुद्धि आभास हे मिथ्या दोन । हे तिन्हीही स्पष्टत्वें
भिन्नभिन्न । दृष्टांतयुक्त सांगितले ॥९८॥
आतां बुद्धीनें कोणती कल्पना । करून दाखविली असे नाना ।
आणि त्या विकल्पीं आत्मा देखणा । असे तेंही बोलूं
रुपदौ गुणदोषादि विकल्पाबुद्धिगाः क्रिया ॥
॥ ताःक्रियाविषयैःसार्धे भासयंती चितिर्मता ॥
रूपरसादि दोषगुण । विकल्प हे बुद्धीचे विकार होणें ।
त्या क्रिया आणि विषय संपूर्ण । ज्ञान चित्प्रभा भासवी ॥११००॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP