सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २००१ ते २०५०
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
स्थूल साकार तरी दृश्य । ब्रह्म निराकार अदृश्य ।
येथें हें हें म्हणून निर्देश । तेथें वाणी मन मुरडे ॥१॥
जें जें दिसे तें तें नासे । दिसे तेंचि हें हें म्हणो येतसे ।
तस्मात् हें हें ब्रह्म होईल कैसें । अदृश्य अग्राह्य जें ॥२॥
ब्रह्म सत् देह असत् । जो क्षणक्षणांत असे नासत ।
ब्रह्म चिद्रूप देह जड समस्त । प्राणामुळें चळे ॥३॥
याचि हेतु श्रुति बोले वचन । कीं देहाहून अन्य आत्मा प्राण ।
तेणेंचि देहासी होतसे पोषण ।
तस्मात् प्राण कीं आत्मा प्रथम साधकाचें शुद्ध हृदय ।
असे कीं नसे पाहे निश्चय । म्हणून श्रुति होय कीं न होय ।
ब्रह्म हें पाहें विचारें श्रुति निर्धारें जरी सांगती ।
तरी विचार करी कासया म्हणती । ऐशी तों भलल्याची असे रीती ।
ज्याचे त्यामुखें निवडावें ॥६॥
साधक हेंचि खरें म्हणून बैसे । तेव्हां श्रुति अनधिकारी म्हणून त्रासे ।
जो विचारें नव्हे म्हणून पुसे । तया आल्हादें सांगे ॥७॥
अरे वास्तविक जर ब्रह्म नव्हे । अविद्या ज्यांत वास करून राहे ।
आतां प्राण ब्रह्म याहून आहे ।
तेंही पाहे विचारें पूर्वींचा आडाखा जो बोलिला ।
कीं भूतसंघ जाहला राहिला मेला । जेथें तें ब्रह्म तोचि बैसविला ।
कीं प्राणास्तव होती निमती ॥९॥
या प्राणमय कोशासीही पांच अंगें । विचार करावा म्हणून सांगें ।
हें पाहून साधकें लागवेगे ।
विचार कीजे प्राणाचा ॥२०१०॥
प्राणाचि प्राणमयाचें शिर । व्यान तोचि दक्षिण पक्ष थोर ।
समान तोचि पक्ष उत्तर । आकाश आत्मा ॥११॥
पृथ्वी पुच्छ प्राणमयासी । हेंचि आधीं विचारिजे मानसी ।
कीं देहाच्या आधारें वायूसी । उद्भव जाहला ॥१२॥
यंत्र जैसें कळासावें । तेवीं शिरांचे ओढीनें वायू उद्भवे ।
त्या ओढीनें जरी ढिलें पडावें । तरी जावें देह त्यागोनि ॥१३॥
व्यान समान आणि प्राण । हेंचि शिर येक पक्ष दोन ।
हें तव प्राणवायूचें लक्षण । व्यापारभेदें नामें ॥१४॥
परी संचार नव्हे पोकळविण । कठिनत्वा न जाय भेदून ।
म्हणून श्रुति बोलिली योजून । आकाश आत्मा ॥१५॥
ब्रह्म तरी निराकार । प्राणविकारें टाकी फूत्कार ।
ब्रह्म निराधारत्वें सर्वां आधार । प्राण देह तोंवरी दिसे ॥१६॥
ब्रह्म पदार्थमात्रीं व्यापलें । प्राण पोकळीत वास्तव्य केलें ।
प्राण वाहतसे दशांगुलें । ब्रह्म सर्वत्रीं सम ॥१७॥
ब्रह्म सद्रूप प्राण नासे । ब्रह्म चिद्रूप प्राण तो जड असे ।
झोपेंत निवारींना अल्पसें । वस्त्रें नेतां तस्करी ॥१८॥
हें असो प्राण सुखदुःखदायक । ब्रह्म आनंदघन एक ।
तस्मात् प्राण ब्रह्म निश्चयात्मक । नव्हे कल्पांतीं ॥१९॥
हा साधकें विचार पहावा । प्राण हा अविद्याकृत स्वभावा ।
तस्मात् अनात्मा म्हणून त्यागावा । ब्रह्म खरें जाणोनी ।
प्राणासी साह्य कर्मेंद्रिय । जडत्वें याची क्रिया होय ।
प्राणचि अनात्मा तरी निश्चय । अनात्मत्व कर्मेंद्रियां ॥२१॥
ब्रह्मलक्षणें प्राणासी नसती । ऐसा विचार जो करी सुमती ।
तया विचारवंता श्रुति मागुती । आल्हादें सांगें ॥२२॥
कीं प्राण नव्हे ब्रह्म परिपूर्ण । तरी अन्य आत्मा याहुन मन ।
मनेंचि हा व्यापिला प्राण । तस्मात् मन ब्रह्मचारी ॥२३॥
मनापासून सर्व भूतें जाहलीं । मनास्तव सर्व राहती मेलीं ।
हीं ब्रह्मलक्षणें मनावरी कल्पिलीं ।
कीं साधकें निवडावीं पांचचि अंगें मनोमयासी ।
यजुर्वेदचि शिर ययासी । ऋृग्दक्षिण पक्ष जयासी ।
उत्तर पक्ष साम ॥२५॥
उपदेश आत्मा बोलिला । अथर्वांगिरस पुच्छत्वीं स्थापिला ।
हें किन्निमत्त याचा विचार केला । पाहिजे साधकें ॥२६॥
मुख्य रूप मनाचें संकल्पात्मक । कांहीं संशयरूप करावा तर्क ।
होय नव्हे हें निश्चयात्मक । कदां नाहीं ॥२७॥
तया संशयाचे चिंतन । तेंचि चित्त परी मनाचे पोटीं लीन ।
या अंतर्वृत्तीचें निर्गमन । पांचा ज्ञानेंद्रियद्वारा गगनीं वायु जेवीं उठे ।
तेवीं आत्मत्वीं संकल्प उमटे । संशयात्मक चिंतन प्रगटे ।
श्रोत्रादि द्वारा ॥२९॥
चिंतन संशय उभय लक्षण । तें अंतर्वृत्ति येकरूप मन ।
आणि ज्ञानेंद्रियपंचक मिळोन । साही मनोमय कोश ॥३०॥
या मनोमय कोशामाझारी । विद्या अविद्या वास करी ।
म्हणून बंधमोक्ष दोन्ही उभारी । प्रवृत्तिनिवृत्तिरूप ॥३१॥
कामादि विषयासक्तीनें । जीवास बंध दृढ होणें ।
धर्मार्थ काम प्रवृत्तीच्या गुणें । कामादि अभावें मोक्ष ॥३२॥
धर्म अथवा अर्थ काम । हाही मनाचा मनोधर्म ।
परी कळेना केवीं कर्माकर्म । म्हणून वेदाज्ञा पाहिजे ॥३३॥
त्या वेदाज्ञे ऐसें प्रवर्तता । चारी पुरुषार्थ होती तत्वतां ।
परी जोंवरी विषयासक्तता । तोंवरी मोक्ष नाहीं ॥३४॥
असो विद्या अविद्यात्मकामुळें । प्रवृत्ति निवृत्ति दोन्ही निवळे ।
परी वेदाज्ञेवीण कांहीच न कळे । म्हणून वेदचि अंग मनाचें ॥३५॥
यजुर्वेद शिर ऋृग्दक्षिण पक्ष । साम तो मनाचा उत्तर पक्ष ।
हे वेदत्रयी प्रवृत्तिरूप प्रत्यक्ष । येणें धर्मार्थ काम ॥३६॥
येणें अविद्यात्मक विषयासक्ति । वाढूं लागे अधिक प्रवृत्ति ।
बंधनींच पडे अभिमान उन्नति ।
तेव्हां जीव जन्मे मरे प्रवृत्ति अथवा निवृत्तीचा ।
उपदेश मनोमयीं साचा । म्हणोनि आदेश आत्मा बोले वाचा ।
श्रुति मनोमयासी ॥३८॥
हें चवथें अंग मनोमयाचें । येथें वास्तव्य विद्या अविद्येचें ।
जरी बोधकत्व प्रवृत्तीचें । तरी धर्मार्थकाम वाढे ॥३९॥
निवृत्तीचा जेव्हां उपदेश । कीं आत्मा ब्रह्म हाचि निर्देश ।
वेदत्रयी त्यागे विशेष । या विद्यात्मकें मोक्ष लाभे ॥४०॥
पुढें जीवन्मुक्तिसुख हाणें । यास्तव अथर्वंगिरस पुच्छ म्हणे ।
परी हा निश्चय बुद्धीनें करणें । मनीं उपदेश मात्र ॥४१॥
याच हेतु मनोमयाहून । अन्य आत्मा कोशविज्ञान ।
तेणेंचि मनाची पूर्णता होणें । नातरी संशयीं पडे ॥४२॥
विज्ञान आत्मा जरी यथार्थं । तरी मनासी आत्मत्व वचन व्यर्थ ।
आणि मन विकारी एक पदार्थ ।
ब्रह्म तों निर्विकार मनासी तों संकल्प विकल्प ।
ब्रह्म तां सदा निर्विकल्प । मन उठे निमे असद्रूप ।
ब्रह्म तिहीं काळीं सत् ॥४४॥
मन जीवाचे प्रकाशें वर्ते । नातरी हें जडचि ऐतें ।
ब्रह्म तों स्वप्रकाशें सुप्तीतें । जाणें स्वप्रभें ॥४५॥
मन हें सुखदुःखें शीण पावे । ब्रह्म आनंदस्वरूप स्वभावें ।
तस्मात् मना ब्रह्मत्व न संभवे ।
बोलिले ते उपचारिक जरी मनचि ब्रह्म असतें ।
जीवा बंधन कासया करितें । मागुती निर्विषयत्वें सोडवितें ।
हें निर्विकारी विकार कां ऐसे नाना परीचे विरोध ।
मन ब्रह्म कल्पिता बहुविध । मना प्रत्यक्ष संकल्पविकल्प द्विविध ।
ब्रह्म तरी निर्विकल्प मन वृत्तिनिवृत्तीचे साधन ।
ब्रह्म साध्यरूप द्वैतेंविण । तस्मात् मन त्यागून समाधान ।
साधकें पावावें ॥४९॥
असो मनाचें अनात्मत्व जयासी । यथा कळलें निश्चयेसी ।
श्रुति माउली उपदेशी तयासी ।
कीं अन्य आत्मा विज्ञान विज्ञानास्तव सर्व होतें ॥२०५०॥
N/A
References : N/A
Last Updated : October 20, 2010
TOP