मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १७५१ ते १८००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १७५१ ते १८००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


तरी व्यापार होतीलचि तत्त्वतां ।
परी मीपणें घेतसें बद्धता । सहज होतां मुक्ता ॥५१॥
आधीं सहज कैसे होत असती । तेंचि बोलिजे अल्प रीती ।
सहजचिं गुणदोष उमटती । सहज चिति वेगळी ॥५२॥
प्रथम स्थूल देह अन्नमय । जो रक्तरेतापासून होय ।
पंचवीस तत्वांचा समुदाय । पंचीकृताचा ॥५३॥
रक्तरेत मिळतां जठरीं । गर्भ वाढूं लागे अंतरीं ।
गुण वाढे सांग गर्भ जरी । सलादि होतां दोष ॥५४॥
जन्मकाळीं आडवा भरतां । हाचि दोष शिणतसे माता ।
यथा युक्त सहजीं जन्मतां । गुण होय स्वपरा ॥५५॥
स्वरूप सांग तरी तो गूण । अरूप व्यंग दोषाचें लक्षण ।
पुढें वाढूं लागतां विपरीतपण । हाचि दोष ॥५६॥
गुण होय सरळ वाढतां । पुढें पावला तारुण्यता ।
तेथेंही गुण होय युक्त वर्तता । अन्यथा दोष ॥५७॥
वृद्धकाळीं तो दोष बहुत । गुणही असती किंचित ।
मृत्यूकाळ तो कठिण अत्यंत । त्वरें मरतां गुण ॥५८॥
एवं जन्मापासून मरणवरी । सहजीं देह नाना विकारी ।
गुण दोष उमटतीच निर्धारी । हें अन्यथा नव्हे ॥५९॥
तितुके गुणदोष जरी सांगावे । तरी धरणी लिहितां न पुरवे ।
तस्मात अल्प संकेतें समजावें । गुणदोषांचें पात्र हें मग असो देव कीं मानव ।
कीटक अथवा गो अश्व । स्थावर कीं जंगम स्वयमेव ।
परी देह तेथें गुणदोष ॥६१॥
केचित गुणचि दोषाकार होती । केव्हां दोष गुणाऐसे उमटती ।
परी साकार । तितुकें जाहलें असती । सहजीं गुणदोषात्मक ॥६२॥
असो स्थूलदेहा अंतरीं प्राण । तेथेंही असती दोषागुण ।
गुण वाटे होतां पिंड पोषण । अन्यथा दोष ॥६३॥
हें असो दहाही इंद्रिय । मन बुद्धि स्फूर्ति मायामय ।
विद्या अविद्या जीवेश उभय । हें सर्वही जितुकें ॥६४॥
हें सर्वही मिथ्यस्वें जाहलें । जाहलें तया गुणदोष लागले ।
ते धर्मधर्मी पूर्वी सांगितले । धर्म तेथें गुणदोष ॥६५॥
सर्प चोर उमटतां भीति । रजत भासतां हर्षें मति ।
तैसे हे ईशादि तृणांतीं । बत्तीस गुणदोषात्मक ॥६६॥
व्यापारापूर्वीं वेगळाले । देहीं असतां स्थिर उगले ।
तेथेंही गुणदोष असती संचले । मा व्यापारी तो उत्कर्ष ॥६७॥
व्यापारी बहु तत्वें मिळती । जेव्हां जागृदादि अवस्था होती ।
तया समयीं तों अतिविकृति । गुणदोषाची ॥६८॥
अंतःकरणास्फूर्ति वायु व्यान । तयाचें द्वारें वाणी श्रवण ।
बोले ऐके परस्परेंकडोन । होऊन भोग्यभोक्ता ॥६९॥
अन्य बोलतां ऐके सावध । तो अंतःकरणीं आदळे शब्द ।
तेव्हांचि उठे प्रिति काम कीं क्रोध । हेचि अति गुणदोष येथें
रविदत्ता ऐसें मानिसी । कीं पांचचि तत्वें व्यापारासी ।
परी ईशादि देहांत बहु तत्वांसी ं अपेक्षा असे ॥७१॥
अंतःकरण व्यान श्रोत्र वाचा । पांचवा उच्चार शब्दाचा ।
हा व्यापार ययाची पांचांचा । परी अन्यासीही अपेक्षी साकार
देह तो पाहिजे। जीवे तो विषय हा स्फुरविजे ।
विद्या अविद्यात्मक स्फूर्ति सहजे । असे व्यापारीं ॥७३॥
मन बुद्धि चित्त अहंकार । हेही पाहिजेताति समग्र ।
हें असो ईशही निरहंकार । प्रेरी गुणदोषां ॥७४॥
जेवी सेनोचा जय पराजय । तो राजयासी आरोप होय ।
तैसे शुभ कीं अशुभ होतां कार्य । ईशावरी आरोप ॥७५॥
राजआज्ञेवत ईश प्रेरी । परी तो अकर्ता असे निरहंकारी ।
अन्यें कर्तृत्व आरोपिजे जरी । तरी तो नित्यमुक्त ॥७६॥
ईशाचि मुक्त ह्मणणें काय । जीवही बद्ध कदां न होय ।
परी अंकर्तृत्वाची नेणे सोय । ह्मोणोनि साभिमानें बद्ध ॥७७॥
असो जीवेश विद्या अविद्यास्फूर्ति । मनादि चत्वार अंतःकरणवृत्ति ।
व्यान श्रोत्र वाचा शब्द निश्चिती । हा इतुका संघ मिळे ॥७८॥
तेव्हां ऐकणें बोलणें दोन्ही । व्यापार होत असती जनीं ।
आणि गुणांचीही होय उभवणी । सत्वादिकांची ॥७९॥
बोलणार जो गुणें उठें । तरी ऐकणार कामक्रोधें दाटे ।
तेथें दोषचि अधिक पेटे । मग परस्परे कलह ॥१७८०॥
बोलका सत्वगुणीं मधुर । तरी शांतता पावे ऐकणार ।
तेव्हां गुणचि उमटे परस्पर । संवादसुख होय ॥८१॥
एवं संघ मिळतां गुणदोष उमटती । गुण तरी अतिशय उठे प्रीती ।
दोष तरी मारिती कीं मरती । ऐसें कार्य गुणदोषांचें ऐसा व्यापार गुणदोषात्मक ।
सांगितला संघाचा एक । ऐसेचि चारी होती आणिक ।
तेही संक्षेपें बोलूं ॥८३॥
मन समान त्वचा पाणी । स्पर्शविषय पांचवा मिळुनी ।
व्यापार स्पृष्टव्य देणीं घेणीं । अन्य तत्वें अपेक्षी ॥८४॥
देह बुद्धि अहंकार चित्त । विद्या अविद्या स्फूर्तिसहित ।
जीव ईशा साह्य असत । आणि गुणही तिन्ही ॥८५॥
डोळे झांकुन जरी बैसला । परी स्पर्श होतां अंतरीं कळला ।
सर्प जरी दचकुन मेला । स्त्री तरी सुखावे ॥८६॥
बुद्धि उदान नयन चरण । पांचवा रूप विषय पूर्ण ।
होत असे पाहणें चालणें । परी अन्य तत्वें अपेक्षी ॥८७॥
देह मन चित्त अहंकार । विद्या अविद्यात्मक स्फूर्ति प्रकार ।
त्रिगुण आणि जीव ईश्र्वर । साहाकारा असती ॥८८॥
सन्मुख देखतां रूप चांगुलें । तरी हर्षुन अति सुख जाहलें ।
विरूप पाहून भय घेतलें । एवं गुणदोषात्मक ॥८९॥
चित्त प्राण जिव्हा उपस्थ । पांचवा रसविषय यथार्थ ।
अशन रति होय उपस्थित । परी अन्य तत्त्वें अपेक्षी ॥१७९०॥
देह अहंकार मन बुद्धि । विद्या अविद्यात्मक स्फूर्ति आधीं ।
जीवेश त्रिगुणांची मांदी । साह्यत्वा असती ॥९१॥
चांगुला पदार्थ जिव्हा खाय तेव्हां सुखरूपता पुष्टि होय ।
अन्यथात्वें मरोनि जाय । ऐसा गुणदोष रसीं ॥९२॥
तैसेंचि रतिसुख भोगितां । उत्पत्ति होय कीं मरे अवचिता ।
ऐशी गुणदोषाची सहजता । असे व्यापारी ॥९३॥
अहंकार अपान घ्राण । गुद गंधविषय जाण ।
विसर्ग होय गंधग्रहण । परी अन्य तत्वें अपेक्षी ॥९४॥
देह मन बुद्धि आणि चित्त । विद्या अविद्या स्फूर्तिसाहित ।
जीवेश त्रिगुणादि उपेक्षित । मिळतां व्यापार घडे ॥९५॥
सुगंधें अत्यंतचि सुखावें । दुर्गंधें कासाविस व्हावें ।
विसर्गें वांचावें कां मरावें । एवं गुणदोष गंधीं ॥९६॥
जीव व्यापार उंदड करिती । कृष्यादि अथवा कर्में निपजती ।
परी अवघ्या पांचाचि वृत्ति । ब्रह्मादि कीटकांत ॥९७॥
एका देहाचे पांच समजतां । सर्वांचे अनुभवा येती तत्वां ।
असे पंचविषय जागृति असतां । होती गुणदोषात्मक हेचि पांच व्यापार स्वप्नीं ।
होत असती जीवा लागोनी ।
जरी देह विषय प्रत्यक्षपणीं । नसती तेथें ॥९९॥
परी देहाचा आणि विषयाचा । आभास घेऊनियां साचा ।
व्यापार करीत असे गुणदोषांचा । अन्य जो उरला संघ विद्या ॥१८००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP