मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २३५१ ते २४००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २३५१ ते २४००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


एवं दशधा जड प्रकार । आकाशापरी निस्तत्त्व समग्र ।
हें नाहींच एक निर्विकार । अस्तिभातिरूपें ॥५१॥
तया एकेक देहीं भिन्न भिन्न । राहिला वर्ते जागरीं स्वप्न ।
तया सूक्ष्मदेहाचें लक्षण । सत्रा प्रकारें ॥५२॥
ते एकचि वृत्ति विभागली । भिन्न भिन्न सत्रा प्रकारें जाहली ।
ते साकल्यत्वें पूर्वीं निरोपिली । जीवत्वासहित ॥
असो चंचळ सत्रा प्रकार । हेही निस्तत्त्व पाहतां विचार ।
वाउगा भास मात्र दिसे विखार । जैसा रज्जूवरी ॥५४॥
स्वरूपाचे अस्तित्वें आहे । स्वरूपाचे भानें दिसूं लाहे ।
स्वरूप निर्धारितां यासी न साहे । आहेपणा किमपि ॥५५॥
मग सत्राही निस्तत्त्वरूप । भासतीही न किंचित् अल्प ।
एक ब्रह्मात्मा सच्चिद्रूप । आदि अंतीं तेवीं मध्यें ॥५६॥
एवं बत्तीस तत्त्वें भिन्नभिन्न । निस्तत्त्वपणें भासमान ।
या इतुकियांतही परिपूर्ण । चित्प्रभा वर्ते ॥५७॥
स्फूर्तीपासून कीटकापर्यंत । बत्तीस तत्त्वांचा केला संकेत ।
परी त्रिगुण नाहीं आले आंत । कल्पील कोणी ॥५८॥
तरी गुण हे धर्मवृत्तीचे ।
जेवीं विकार कामादिकांचे तेवी गुणदोषांत गणन त्यांचें ।
परी रूपें बत्तीस ॥५९॥
असा बत्तीसही नामरूपात्मक । सर्वही असज्जड दुःखात्मक ।
ब्रह्मात्मा परिपूर्ण व्यापक । अनुस्यूत सर्वत्रीं ॥
व्यापक म्हणतां भावील कोणी । कीं हे पदार्थही असती सत्यपणीं ।
या अंतबार्ह्य राहिला व्यापोनी । तरी ऐसें नव्हे ॥६१॥
जैसें सुवर्ण नगा आंत । कीं अंतर्बाह्य मृत्तिका घटांत ।
घट नग नाहींतचि किंचित् । सुवर्ण मातीच सारी ॥६२॥
तैसें परब्रह्म पदार्थमात्रीं । पदार्थ नाहींतचि तिळभरी ।
रजत नाहींच शिंपचि सारी । कीं तरंगीं जीवन ॥६३॥
ऐशिया दृष्टांता पडिपाडें । ब्रह्मात्म तत्त्वचि उघडें ।
अन्य पदार्थ किंचित न जोडे । परी भ्रमें भासती ॥६४॥
यासी विवर्तात्मक म्हणावें । न होतां वाउगेंचि कल्पावें ।
परी कारणचि अंतर्बाह्य आघवें । भ्रमें दिसताही ॥६५॥
या भ्रमाचें मात्र निरसन । व्हावें यथार्थाचें ज्ञान होऊन ।
तेव्हां नामरूपें जाती निपटून ।
मग उघड आत्मा ब्रह्म एवं स्फूर्तीपासून देहापर्यंत ।
बत्तीस तत्त्वांचा संघात । नामरूपें मात्र दिसत ।
परी एक ब्रह्म आत्मा ॥६७॥
यापरी बत्तिसांचे रूपी । अनुस्युत ब्रह्मात्मा चिद्रूपी ।
तैसाचि गुणदोषांचेही संकल्पीं । अन्वयरूपें असे ॥६८॥
जो जया योनींत जन्मला । तितुका देह भोक्तेपणें जाहला ।
येर खाणीसी कीं भूतांला । भोग्यत्वें कल्पी ॥६९॥
तेचि रसादि पंचविषय । भोग्य करून भोगिता होय ।
इकडे एका देहीं जितुका समुदाय । एक होऊन भोक्ता जाहाला ॥७०॥
आनंदमयींच कोश भोक्ता । परी तेथें असे निर्विकल्पता ।
म्हणोनि सत्रा तत्वें मानितां । भोक्ता होय सूक्ष्म ॥७१॥
परी सूक्ष्मासीही स्थूलाविण । व्यापारीं न घडेचि वर्तन ।
म्हणून स्थूलासहित संपूर्ण । भोक्ता जाला ॥७२॥
वृत्ति उठोन इंद्रियद्वारा । येत असे विषया सामोरा ।
तेथें चांगुलें वाईट करी त्वरा । हे कल्पना जीवित्वाची ॥७३॥
हेचि गुणदोषात्मक जागृति । तैशीच स्वप्नाचीही रीती ।
कल्पनेचे अभावीं ते सुषुप्ति । परी तेही गुणदोषात्मक ॥
एवं तिहीं स्थळींची जे क्रीडा । विकल्पीं ब्रह्मात्मा उघडा ।
व्यापक परी विकल्पाचा शिंतोडा । न स्पर्शे सहसा ॥७५॥
ऐसा बत्तीस तत्त्वांचे रूपीं । अथवा गुणदोषांचे विकल्पीं ।
आत्मा ब्रह्म सच्चिद्रूपी । अंतबाह्य व्यापक ॥७६॥
इतुकी व्यापकता असे कवणासी । जरी ईशासहित या बत्तिसी ।
स्थूल तो असे एकदेशी । जो हा मांसमय ॥७७॥
ऐसाचि चारी खाणीसह मानसिक ।
म्यां योनी निर्मिल्या पृथक पृथक । त्या कधींच न होती व्यापक ।
संचरती एकदेशी ॥७८॥
सप्तद्वीपवती पृथ्वी । त्रिलोकात्मक आघवी ।
परी सीमा सरतां पुढें नसावी । तरी व्यापक नव्हे ॥७९॥
जीवन कोठें असे कोठें नसे । जरी आवरणही विस्तीर्ण दिसे ।
परी पुढें मागें पाहतां नसे । म्हणोन व्यापक नव्हे ॥
प्रगटे विझे तो हा अग्र । आवरणरूपी जो भासमान ।
परी अमुक ऐशी होय गणन । दशगुणें उणा वायूसी ॥८१॥
वायूही उत्पन्न होय तेव्हां असे । वितळून जातां कोठें न दिसे ।
आवरणासिही सीमा दिसे ।
म्हणोनि व्यापक नव्हे आकाश जरी स्वरूप सम ।
तरी तें भासलें ब्रह्मासी नाम । परी शब्दगुणी गगनाचा नेम ।
तें तो व्यापक नव्हे ॥८३॥
असो देह आंत जो प्राण । जो पंचधा पावला चळण ।
तो देहाबाहेरी न करी गमन । तरी व्यापकता कैंची ॥८४॥
कर्मेंद्रियांची गोलकीं वस्ती । तेथूनिचि क्रिया करिती ।
तैशींच ज्ञानेंद्रियें विषय घेती । ठाईंच राहूनी ॥८५॥
मन धांवे ब्रह्मांडा आंत । परी एकदेशीं उसळूनि मरत ।
अष्ट दिशांसी व्यापिना समस्त ।
तरी तें व्यापक कैसें मना ऐसाचि बुद्धीचा निश्चय ।
एकदेशीच होतसे प्रत्यय । तयेसी व्यापकत्व म्हणूं नये ।
जे नासे क्षणक्षणीं ॥८७॥
आतां बुद्धिगत जो जीव । येणें स्फुरवावा किंचिद्भाव ।
परी तेव्हांचि लय होतसे सदैव । नाहीं आणि एकदेशीं ॥
विद्या अविद्या माया स्फूर्ति । याची तों एकदेशी उत्पत्ति ।
तरी ते सर्वत्रीं कैंची व्याप्ति । म्हणोनि अव्यापक ॥८९॥
ईश नुसधी करी प्रेरणा । परी बुद्धि ऐलीकडे असेना ।
मायेपैलीकडे दिसेना । तरी व्यापकता कैंची ॥२३९०॥
ईशाऐसाचि कारणरूप जीव । एकदेशीय होतसे उद्भव ।
तस्मात् बत्तीस जे हें रूप नांव स्वरूपीं एकदेशी ॥९१॥
आणि हे असज्जड दुःखात्मक । वाउगेंचि भासलें अनेक ।
तें कैसें होईल व्यापक । ब्रह्मात्मयासम ॥९२॥
आपुले अस्तिभातिप्रियत्वानें । मायेपासून तृणांत व्यापणें ।
शेखीं असंभाव्य परिपूर्णपणें । अगणित मायातीत ॥९३॥
तयाची कोण करील मर्यादा । बोलतां मौन पडे वेदा ।
तेथें एकदेशी वाणीचे संवादा । आकळे कैसा ॥९४॥
परी बोलल्यावीण कळेना । म्हणोनि यथामति कीजे वल्गना ।
अगा रविदत्ता सावध मना । ऐसा ब्रह्मात्मा तूं एक ॥
हे बत्तीस नाहींतचि तुजवरी । तूंचि एकला एकचि निर्विकारी ।
पाहे उघडा आणि अससी अंतरीं ।
जेवीं अळंकारीं हेम सुवर्ण उघडें कीं नग उघडे ।
ऐसें विचारें पाहें कोडें । या बत्तिसांसी अस्तित्व न जोडे ।
तूंचि सघन एकरसी ॥९७॥
आतां तुझी कल्पना ऐशी । कीं प्रत्यक्ष अनुभवावें आपणासी ।
तरी तो अनुभव व्हावा कवणासी ।
तुजसी किंवा बत्तिसां जरी बत्तिसांतून एकादिया ।
शक्ति होईल जाणावया । तरी उणीवता येईल वेदराया ।
आणि अनुभव युक्तीसीही ॥
जेणें सवा स्वप्रकाशें जाणिजे । तो कवणें जडें पाहों लाहिजे ।
ऐशी वेदवचनें असती जें जें । तयां बाध आला ॥२४००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP